प्रत्येक देश आपल्या देशातील नागरिकांच्या आणि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सजग असतो. देशाची सुरक्षा करणाऱ्या आर्मी, नेव्ही, एयरफोर्स मधील सर्वच युद्धजन्य शस्त्र, अस्त्र गोष्टी कायम उत्तम, अद्यावत राहतील याकडे देखील देश लक्ष देत असतो. यासाठी कायम देश आपली शक्ती वाढवत आपल्याकडे अधिकाधिक ताकदवर अशी उपकरणे, शस्त्रास्त्र कसे येतील हे बघत असतो. यासाठीच आता भारताने देखील आपली ताकद वाढवत नेव्हीमध्ये एका शक्तिशाली युद्धनौकेची भर घातली आहे. आज १८ जुलै रोजी भारतीय नौसेनेची ताकद अधिक वाढवण्यासाठी INS निस्तार या डायव्हिंग सपोर्ट वेसल (DSV) ला अधिकृतपणे नौदलात समाविष्ट करण्यात येणार आहे. (INS Nistar)
विशाखापट्टणममध्ये भारतीय नौदलात पहिल्यांदाच विकसित करण्यात आलेल्या हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडच्या विशाखापट्टणम यार्डमध्ये तयार करण्यात आलेल्या INS निस्तार या डायव्हिंग सपोर्ट वेसल (DSV) या जहाजामुळे भारताच्या सागरी सुरक्षा क्षमतेत मोठी भर पडणार आहे. ही गोष्ट भारतासाठी आणि भारतीयांसाठी खूपच अभिमानाची आणि मोठी आहे. (Marathi News)
या युद्धनौकेचे नाव ‘निस्तार’ हे संस्कृतमधून घेण्यात आले आहे. या नववंगा अर्थ “मुक्ती”, “बचाव” किंवा “मोक्ष” असा आहे. ‘निस्तार’ हे नाव १९७१ च्या भारत-पाक युद्धात ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या एका जहाजाच्या सन्मानार्थ ठेवण्यात आले आहे. मुख्य बाब म्हणजे ‘निस्तार’ ही युद्धनौका जवळपास ७५% स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केली आहे. त्यामुळेच ही युद्धनौका भारताच्या सागरी तंत्रज्ञानातील आपले सर्वात मोठे यश समजले जात आहे. ‘Make in India’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या उपक्रमांतर्गत, Indian Register of Shipping (IRS) च्या मान्यताप्राप्त नियमांनुसार तयार करण्यात आलेली INS Nistar, ही नौदलाच्या इतिहासातील एक ऐतिहासिक टप्पा मानली जात आहे. (Todays Marathi Headline)
निस्तार हे जहाज अनेक दृष्टीने भारतासाठी खास ठरणार आहे. एक मैलाचा टप्पा म्हणूनच या जहाजाकडे पाहिले जात आहे. असे असताना या जहाजाची अनेक वैशिष्ट्ये देखील आहे. या जहाजाची मुख्य बाब म्हणजे हे जहाज खोल समुद्रात पनडुब्ब्यांवरील आपत्कालीन परिस्थितींमध्ये मदत करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. INS निस्तार हे जहाज खोल समुद्रात ६० दिवसांपेक्षा अधिक काळ काम करण्यास सक्षम असून, ते विशेषतः पनडुब्बी बचाव मोहिमांमध्ये निर्णायक भूमिका बजावणार आहे. हे जहाज ‘डीप सबमर्जन्स रेस्क्यू वेसल’ (DSRV) साठी मदरशिप म्हणून काम करणार आहे. यामुळे खोल समुद्रात अडकलेल्या नौसैनिकांना बाहेर काढणे शक्य होईल. (TOp Marathi Headline)
INS निस्तारचे वजन सुमारे १०५०० टन असून, याची लांबी सुमारे १२० मीटर आणि रुंदी २० मीटर इतकी आहे. हे जहाज ३०० मीटर खोल समुद्रात सॅचुरेशन डाइविंग करण्यास पूर्ण सक्षम आहे. यामध्ये ७५ मीटर पर्यंत डाइविंगसाठी स्वतंत्र साइड डाइविंग स्टेज देखील आहे. खास गोष्ट म्हणजे या जहाजाची रचना अत्याधुनिक गोताखोरी उपकरणांनी युक्त असून, या जहाजामध्ये एक प्रगत डाइविंग कॉम्प्लेक्सही बसवण्यात आलेला आहे. (Latest Marathi News)
INS निस्तारमध्ये पाण्यातील बचाव कार्यांसाठी ‘रिमोटली ऑपरेटेड व्हेईकल’ (ROV), साइड स्कॅन सोनार, आणि १५ टन क्षमतेची सबसी क्रेन यांसारखी अत्याधुनिक उपकरणे बसवण्यात आली आहेत. यामुळे पाण्याच्या तळाशी जाऊन तपासणी करणे, वस्तूंचा शोध घेणे, विविध शोध मोहीमा बजावणे, बचावकार्य करणे अधिक अचूक आणि खात्रीदायक परिणाम होणारे असेल. निस्तार या जहाजाची खास गोष्ट म्हणजे, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये लवकरात लवकर प्रतिसादासाठी या जहाजावर हेलिकॉप्टरच्या लँडिंगचीही सुविधा देण्यात आली आहे. (Top Marathi News)
INS निस्तारची नियुक्ती भारतीय नौदलाच्या पूर्वी नौसेना कमांडमध्ये करण्यात येणार आहे. या विभागात हे जहाज खोल समुद्रात डाइविंग आणि पनडुब्बी बचाव कार्यांमध्ये सक्रिय भूमिका बजावेल. हे जहाज ६५० मीटर खोलवर अडकलेल्या पाणबुडीतील नौसैनिकांना वाचवण्यासाठी Deep Submergence Rescue Vehicle (DSRV) ने सुसज्ज असणार आहे. (Top Stories)
=========
हे ही वाचा : Britain : ब्रिटनचे आई-वडिल गुन्हेगारांच्या नावाच्या प्रेमात !
=========
मागील काही वर्षांमध्ये भारतीय महासागरात चिनी जहाजांच्या वाढत्या हालचाली भारतासाठी डोकेदुकी ठरत असताना आणि सुरक्षेची भारताला चिंता असताना INS निस्तारसारखे स्वदेशी जहाज एक महत्त्वाचे सागरी हत्यार ठरणार आहे. या जहाजाच्या माध्यमातुन चीनच्या सागरातील सर्वच हालचालींवर लक्ष ठेवणे सोपे जाणार आहे. आगामी काळात पश्चिम नौदल दलात याच वर्गातील ‘INS Nipun’ हे दुसरे जहाज लवकरच सामील होणार आहे. INS Nistar आणि लवकरच येणारी INS Nipun यांच्यामुळे भारताला स्वतःच्या तसेच सहयोगी देशांच्या पाणबुडी बचाव मोहिमांमध्ये आत्मनिर्भरता मिळणार आहे. (Social Updates)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics