Home » Tesla : टेस्लाच्या Model Y कारचे भन्नाट फीचर्स

Tesla : टेस्लाच्या Model Y कारचे भन्नाट फीचर्स

by Jyotsna Kulkarni
0 comment
Tesla
Share

भारतात टेस्लाने धमाकेदार एन्ट्री केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतातील पहिल्यावहिल्या टेस्ला शोरुमचे मुंबईतमध्ये उदघाटन करण्यात आले. मुंबईतील बीकेसीमध्ये अतिशय अलिशान अशा ठिकाणी हे प्रशस्त शोरूम तयार करण्यात आले आहे. संपूर्ण जगातील अतिशय लक्झरी कर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेस्ला गाडीचे चाहते भारतात देखील आहे. भारतातील ऑटोमोबाइल इंडस्ट्री काबीज करण्यासाठी आता टेस्ला देखील सज्ज झाली आहे. (Marathi News)

जगातील प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार कंपनी अशी ओळख असलेल्या टेस्लाने भारतात पाऊल टाकत आपली पहिली कार Model Y भारतात लॉन्च केली आहे. ही एक एसयूव्ही (SUV) आहे ज्याची सुरुवातीची किंमत ६१ लाख रुपये आहे. ही किंमत तिच्या रिअर-व्हील ड्राइव्ह (RWD) मॉडेलची आहे. याचे कारचे दुसरे व्हेरिएंट, लाँग-रेंज रिअर-व्हील ड्राइव्ह असून ६९ लाख रुपयांना उपलब्ध आहे. या गाड्या परदेशातून आयात केल्यामुळे त्यांची किंमत जास्त आहे. (Todays Marathi HEadline)

Model Y या कारमध्ये एकापेक्षा एक अतिशय मस्त फीचर्स आहेत. याला स्टँडर्ड प्लस आणि लाँग रेंजमध्येही लाँच केले जाऊ शकते. टेस्लाच्या मॉडेल ३ चा वेग ताशी १६२ किलोमीटर आहे. या कारची खास गोष्ट म्हणजे ती केवळ ३ सेकंदात ० ते १०० किलोमीटर प्रतितासाचा वेग वाढवू शकते. यात मोठी १५.४ इंच टचस्क्रीन आणि ८ इंच मागील टचस्क्रीन असून, ५ सीट्स आणि सामान ठेवण्याची मोठी जागा देखील देण्यात आली आहे. सुपरचार्जिंगमुळे ही गाडी १५ मिनिटांत २६७ किमीसाठी चार्ज होते. अमेरिकेत टेस्ला मॉडेल ३ ची किंमत २९,९९० डॉलर भारतीय रुपयांमध्ये २५.९९ लाख रुपये इतकी आहे. भारतात याच गाडीची किंमत सुमारे २९.७९ लाख रुपये असू शकते. (Marathi Top News)

टेस्लाची BYD या चीनी कंपनीशी थेट स्पर्धा असणार आहे. BYD सील ही कार ५३ लाख रुपयांना उपलब्ध आहे. टेस्लाच्या सर्वात लोकप्रिय मॉडेल Y बद्दल बोलायचे झाले तर भारतात याची किंमत अमेरिकन बाजारपेठेपेक्षा १५,००० डॉलर जास्त आहे. अमेरिकेत या मॉडेलची किंमत ४४,९९० डॉलर (जवळपास ३८.७ लाख रुपये) आहे, तर भारतीय बाजारात याची किंमत ५९.८९ लाख रुपये एक्स-शोरूम किंमत आहे. मुंबईतील याची ऑन रोड किंमत सुमारे ६१ लाख रुपये आहे, जी अमेरिकन बाजारापेक्षा सुमारे २२ लाख रुपये महाग आहे. (Marathi Latest NEws)

Tesla
मॉडेल वाय ही जगातील सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक कार आहे, परंतु बहुतेक भारतीय खरेदीदारांच्या आवाक्याबाहेर राहण्याची अपेक्षा आहे. भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा अजूनही ५% पेक्षा कमी आहे आणि लक्झरी वाहनांचा वाटा देशातील एकूण वाहन विक्रीत फक्त १% आहे. भारतातील टेस्लाचे मुख्य स्पर्धक बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजी सारख्या मोठ्या कंपन्या असतील. टेस्ला टाटा मोटर्स, महिंद्रा किंवा एमजी मोटर सारख्या कमी किमतीच्या कंपन्यांशी स्पर्धा करेल अशी अपेक्षा नाही. (Social News)

या कार टेस्लाच्या शंघाई येथील कंपनीतून भारतात आणल्या जात आहे. कंपनीने ८.३ कोटी रुपयांची एक्सेसरीज, सुपरचार्जर आणि इक्विपमेंटसुद्धा चीन आणि अमेरिकेतून भारतात आयात केले आहेत. हे सुपरचार्जर मुंबईच्या जवळपासच्या भागात लावण्यात येणार आहे. ज्यामुळे ग्राहकांची सुविधा होणार आहे. टेस्लाचे Model Y SUV भारतात शंघाईमधून आयात केले जात आहे. त्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर आयात शुल्क लागत आहे. प्रत्येक कारवर जवळपास २१ लाख रुपयांपेक्षा जास्त कर द्यावा लागत असल्याने तिची किंमत जास्त आहे. याउलट जर ही कार भारतात तयार झाली असती तर तिची किंमत ४० हजार डॉलरपेक्षाही कमी (जवळपास ३५ लाख) असती. (Top Trending News)

==========

हे ही वाचा :  Tesla : भारतात टेस्लाचे पहिले शोरुम सुरु

==========

आयात शुल्काव्यतिरिक्त इतरही अनेक प्रकारचे कर भारतात भरावे लागतात. यात रोड टॅक्स, इन्शुरन्स आणि स्थानिक करांचाही समावेश होतो. या सर्व गोष्टी पाहिल्यास गाड्यांची ऑन रोड किंमत बरीच वाढते. भारतात आयात शुल्क १५ ते २० टक्क्यांनी कमी केले तरी येथे आयात होणाऱ्या गाड्यांच्या किंमती वाढतीलच. टेस्लाबद्दल बोलायचे झाले तर त्याची सर्वात कमी किंमतीची कार देखील ३५ ते ४० लाख रुपयांची असेल. (Top Stories)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.