एखाद्या व्यक्तीने गुन्हा केल्यानंतर त्याला शिक्षा म्हणून तुरुंगात पाठवले जाते. तुरुंगात जायला तर सगळेच घाबरतात पण, भारतातील एक तुरुंग असा होता (Most Dangerous Prison in India) ज्याचा नामोल्लेख केल्यावर अगदी सराईत गुन्हेगारांचाही थरकाप उडतो.
भारतातील सर्वात भयंकर तुरुंग (Most Dangerous Prison in India) म्हणजे अंदमान निकोबार बेटावरचा तुरुंग. ब्रिटिशांच्या काळात या तुरुंगांमध्ये कैद्यांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली जात असे. ही शिक्षा भोगणारे कैदी हे स्वातंत्र्याच्या रणसंग्रामातील क्रांतिकारक होते. तुरुंगातून पळून जाण्यासाठी आवश्यक असणारी हिम्मत, शारीरिक क्षमता आणि बुद्धिमत्ता या सर्व गोष्टी त्यांच्याकडे होत्या. पण तरीही ते तेथून बाहेर पडू शकले नाहीत, कारण त्या तुरुंगाची रचनाच तशी करण्यात आली होती. अपवाद फक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांचा!
स्वातंत्र्यापूर्वी काळ खूप मागासलेला होता. असं म्हटले जाते की, त्या काळी जो माणूस जमीन सोडून समुद्रात जात असे त्याला घर दार, जात धर्मातून बहिष्क्रुत केले जात असे. भारतातील सर्वात भयंकर समजला जाणारा तुरुंग (Most Dangerous Prison in India) अंदमान निकोबार येथे पोर्टब्लेअरच्या काठावर वसलेला आहे.
इंग्रजांची सत्ता असलेल्या भारतात इंग्रज सरकारच्या विरोधात क्रांतिकारकांनी बंड पुकारले होते. तेव्हा भारतीयांनी केलेल्या प्रतिकारामुळे इंग्रज अस्वस्थ झाले होते. पुन्हा अशा प्रकारची क्रांती होऊ नये म्हणून इंग्रज सरकारने नवीन तुरुंग बांधण्याचा निर्णय घेतला. त्या तुरुंगामुळे भारतीय क्रांतिकारक आपल्या मातृभूमीपासून लांब राहतील आणि त्यांच्या मनात भीती निर्माण होईल, अशी योजना करण्यात आली. (Most Dangerous Prison in India)
ऑगस्ट १८८९ मध्ये चार्ल्स जेम्स आणि ए एस लेथ ब्रिज यांच्या आदेशानुसार तुरुंग बांधण्यास सुरुवात करण्यात आली. हिंदुस्थानी जनतेच्या मनात क्रांतीची ज्योत पेटली होती त्यामुळे ब्रिटिशांची भीती पळून गेली होती. ती भीती पुन्हा निर्माण व्हावी म्हणून हा तुरुंग बांधण्यात येणार होता. (Most Dangerous Prison in India)
या तुरुंगाचे बांधकाम १८९६ साली सुरु करण्यात आले. ते जवळपास १० वर्ष चालले होते. त्या तुरुंगात ४.५ बाय २.७ मीटर आकाराच्या बराकी कैद्यांसाठी काढण्यात आल्या होत्या. त्यात एक पाण्याने भरलेला आणि एक शौचालयासाठी अशी दोन छोटी मडकी ठेवण्यात आली होती. कैद्याचे जेवण, शौचालय आणि झोपायची जागा एकाच ठिकाणी होती.
या तुरुंगाबद्दल असे सांगितले जाते की, या ठिकाणी स्पोक्स ऑफ व्हील पद्धतीचे बांधकाम करण्यात आले. त्यामुळे कैद्यांना तुरुंगाच्या बाहेर जाणे शक्यच नव्हते. ‘पेनॉप्टिकन थेअरी’ नावाचे बांधकाम तुरुंगाच्या मधोमध करण्यात आले. त्याच्या मदतीने तुरुंगाच्या सभोवार लक्ष ठेवण्यास मदत मिळू लागली.
भारतीय क्रांतिकारकांना कैदी बनवून काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला या तुरुंगात पाठविण्यात आले. तिथे या कैद्यांकडून कष्टाची काम करून घेतली गेली. त्यांना नारळाच्या वाळलेल्या काथ्यांपासून फॅब्रिक बनवावे लागत होते. घाणा फिरवून ३० पाउंड्स तेल काढावे लागत होते.
दिवाण सिंग, फझेन्द्र एहकल, योगेंद्र शुक्ला, बटुकेश्वर दत्त, सोहम सिंग, नंदगोपाल आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना याच तुरुंगात ठेवण्यात आले होते. या प्रकारची कठीण कामे हे क्रांतिकारक करत असत. ज्यांना नेमून दिलेली कामे पूर्ण करता येत नव्हती त्यांना भिंतीला अडकवले जात असे. हे कमी म्हणून की काय, चाबकाने मारले जात होते. यामुळे कैद्यांच्या मनात काळ्या पाण्याच्या शिक्षेची भीती निर्माण झाली होती.
या तुरुंगातील कैद्यांना अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असे. या जेवणामुळे अनेक कैद्यांनी आपला जीव गमावला होता. तुरुंगातील अत्याचारांविरोधात १२ मार्च १८८३ रोजी क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांनी सहकाऱ्यांसोबत तुरुंगातच उपोषण पुकारले होते.
====
हे नक्की वाचा: पाकिस्तानी आतंकवादाचा भयानक चेहरा
====
क्रांतिकारकांनी आंदोलनातून दोन मागण्या मागितल्या होत्या, एक कैद्यांना व्यवस्थित जेवण देण्यात यावे आणि दुसरी म्हणजे त्यांच्यासाठी शौचालयांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी. त्यांच्या उपोषणाकडे ४५ दिवस ब्रिटिश सरकारने दुर्लक्ष केले, पण नंतर त्यांना बळजबरीने ज्यूस पाजण्यात आला. त्यावेळी फुफुस्सात संसर्ग झाल्यामुळे महावीर सिंह, मोहन किशोर रामदास आणि मोहित मोईत्रा यांचा मृत्यू झाला. त्यानंतर इतर कैद्यांनी सामंजस्याने उपोषण मागे घेतले.
१९४२ साली जपान सरकारने या तुरुंगवार हल्ला करून ब्रिटिश सरकारला नामोहरण केले. त्यानंतर महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या विनंतीवरून सर्व भारतीय क्रांतिवीरांना सोडून देण्यात आले. त्यानंतर १९४५ साली जपानी सरकारने या तुरुंगाचा ताबा सुभाषचंद्र बोस यांच्याकडे दिला. त्यानंतर तिथे काळे पाणी संग्रहालय विकसित करण्यात आले.
====
हे नक्की वाचा: ‘या’ राजकारणी महिलेने कोरोनामुळे दुसऱ्यांदा लग्नाची तारीख पुढे ढकलली
====
अंदमान निकोबार बेटावर आजही हे संग्रालय जतन केलेले आहे. पर्यटक आवर्जून या संग्रहालयाला भेट देतात. त्या निमित्ताने स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिकारकांच्या आठवणींना उजाळा मिळतो त्यांची काय काय भोग भोगले असतील याची कल्पना येते आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या प्रत्येक देशभक्तांविषयीचा मनातला आदर द्विगुणीत होतो.
– विवेक पानमंद