जगातील सर्वात आलिशान, लक्झरी आणि महागडी गाडी म्हणून ‘टेस्ला’ला ओळखले जाते. भारतात खूपच कमी लोकांकडे टेस्ला गाडी आहे. आधी ही गाडी घ्यायची म्हणजे लोकांना ती भारताबाहेरून मागवावी लागायची. मात्र आता ही टेस्ला गाडी भारतातच उपलब्ध होणार आहे. इलॉन मस्कची जगप्रसिद्ध कंपनी ‘टेस्ला’ने भारतात आपले शोरूम सुरु केले. मंगळवारी (१५ जुलै) रोजी मुंबईत या कंपनीच्या भारतातील पहिल्या शोरुमचे उद्घाटन झाले. भारतातील टेस्लाचे पहिले शोरुम देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबईत सुरू झाले आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) या पॉश परिसरात टेस्लाचे हे पहिले शोरुम सुरू झाले आहे. (Tesla)
या शोरुमचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून झाले. या शोरुममध्ये टेस्लाचे एकापेक्षा एक आकर्षक मॉडेल्स उपलब्ध झाले आहेत. त्यात मॉडेल ३, मॉडेल Y आणि मॉडेल X यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे भारतातील टेस्लाच्या पहिल्या शोरुमची पाटी मराठीत आहे. मुंबईत सुरू झालेल्या या शोरुमची पाटी मराठी भाषेत आहे. टेस्लाकडून महाराष्ट्र सरकारच्या नियमांचे पालन करण्यात आले आहे. मुंबईनंतर आता लवकरच दिल्लीतही ते टेस्लाचे एक शोरूम सुरू होणार आहेत. (Marathi News)
संपूर्णपणे ऑटोमॅटिक असलेल्या ‘टेस्ला’च्या गाड्यांची चर्चा भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रात देखील होतीच. मात्र मंगळवारी ही प्रतीक्षा संपली. ‘टेस्ला’ सुरुवातीला त्यांच्या मॉडेल वाय या गाडीच्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेत उतरत असून या गाडीच्या अगदी सुरुवातीच्या व्हेरियंटची किंमत ६० लाख रुपये एवढी आहे. या शोरूमच्या उद्घाटन वेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “टेस्लासारख्या जागतिक कंपनीचे महाराष्ट्रात आगमन हे राज्याच्या औद्योगिक प्रगतीला चालना देणारे आहे. टेस्लाने मराठी भाषेचा आदर राखत स्थानिक भाषा आणि संस्कृतीचा आदर केला आहे. ‘टेस्ला’ने लवकरच भारतात त्यांचे संशोधन आणि विकास व बांधणी केंद्र उभारावे. ‘टेस्ला’ नक्कीच त्याबाबत गांभीर्याने विचार करेल.” (Todays Marathi Headline)
भारताने इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य दिले असतानाच ‘टेस्ला’चा भारतीय बाजारपेठेतील प्रवेश कंपनीसाठी फायद्याचा ठरू शकतो, असा अंदाज ऑटोमोबाइल क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करतात. सध्या भारतीय बाजारपेठेत दरवर्षी विकल्या जाणाऱ्या गाड्यांपैकी दोन टक्के गाड्या इलेक्ट्रिक आहेत. पण हे प्रमाण वर्षागणिक वाढत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, टेस्ला कंपनीचे मुंबईत चार मोठे चार्जिंग स्टेशन आणि ३२ चार्जिंग इंफ्रास्टक्चर तयार करण्यात येणार आहेत. यात केवळ पंधरा मिनिटांमध्ये चार्जिंग आणि ६०० किमी चालणारी ही गाडी आहे. टेस्लाचा जगभरात एकही अपघात नाही असा रेकॉर्ड आहे. (Latest Marathi News)
भारत हे जगातील तिसरे सर्वात मोठे ऑटोमोबाईल बाजार असून देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या (EVs) विक्रीचा वेग झपाट्याने वाढतोय. भारतात टेस्लाची सुरुवात Model Y SUV पासून होत आहे. त्याच्या Model Y Rear-Wheel Drive ची किंमत ६० लाख रुपये आहे. या मॉडेलचे दुसरे व्हेरिएंट असलेल्या Long Range Rear-Wheel Drive ची किंमत ६८ लाख रुपये आहे. टेस्लाच्या शंघाई येथील कंपनीतून या कार भारतात आणल्या जात आहे. कंपनीने ८.३ कोटी रुपयांची एक्सेसरीज, सुपरचार्जर आणि इक्विपमेंटसुद्धा चीन आणि अमेरिकेतून भारतात आयात केले आहेत. हे सुपरचार्जर मुंबईच्या जवळपासच्या भागात लावण्यात येणार आहे. ज्यामुळे ग्राहकांची सुविधा होणार आहे. (Top Marathi News)
चिनी कंपनी BYD, कोरियाच्या KIA, जर्मनीच्या BMW आणि मर्सिडीजच्या इलेक्ट्रिक कार सध्या भारतीय मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. मात्र टेस्लासमोर सर्वात मोठे आव्हान असणार आहे, तिची भलीमोठी किंमत. कारण सध्या ही कार पूर्णपणे आयातीवर अवलंबून आहे.
=============
हे ही वाचा : Pakistan : जेव्हा पाकिस्तानमध्ये श्रीरामांचा जयघोष होतो….
==========
टेस्ला Model Y ची बुकींग कशी करावी?
> SUV Model Y ची ऑनलाइन बुकींग टेस्लाच्या ऑफिशियल वेबसाइट Tesla India वरुन करता येईल. वेबसाइटवर जाऊन Model Y वर क्लिक करा. व्हेरिएंटची निवड करा. जसे Rear-Wheel Drive किंवा Long Range
> कारचा रंग, इंटीरियर डिजाइन, व्हिल्स आणि सॉफ्टवेअर फीचर्स जसे FSD (Full Self Driving) ची निवड करा.
> बुकींगसाठी लागणारी रक्कम ऑनलाइन भरा.
> पेमेंट केल्यावर ऑनलाइन कन्फर्मेशन मेल किंवा SMS येईल. टेस्लाची टीम तुमचे टेस्ट ड्राइव्ह शेड्यूल करतील. कार उपलब्ध होताच तुम्हाला डिलिव्हरी तारीख सांगितली जाईल.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics