राजकारणातल्या अशा अनेक गोष्टी तुम्ही आजपर्यंत ऐकल्या असतील, ज्यात मोठमोठे नेते एखाद्या अंधश्रद्धेला फॉलो करताना दिसतात. राजकारणी माणसांना सगळ्यात जास्त भीती असते ती सत्ता गमावण्याची आणि म्ह्णूनच ते प्रत्येक पाऊल टाकताना दहा वेळा विचार करतात. त्यातलाच एक भाग म्हणजे काही लोक ठराविक अंधश्रद्धा खऱ्या मानून त्यावर विश्वास ठेवतात. अशीच एक अंधश्रद्धा म्हणजे, भारतातलं एक असं ठिकाणं, जिथे कुठलाही नेता, मुख्यमंत्री ते अगदी पंतप्रधानसुद्धा रहायला घाबरतात. पण असं का ? तर इथे कुठल्याही नेत्यानी किंवा मंत्र्यांनी रात्र घालवली तर ते आपली सत्ता गमावू शकतात असा समज आहे. कोणतं आहे हे ठिकाण आणि काय आहे यामागची गोष्ट जाणून घेऊ. (Mysterious Place)
तर राजकारणी ज्या ठिकाणी राहायला घाबरतात ते ठिकाण म्हणजे मध्यप्रदेशमधलं उज्जैन ! जिथे स्वतः काळावर राज्य करणारा महाकालेश्वर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एका रूपात विराजमान आहे. पण या पवित्र भूमीची एक गूढकथा किंवा अंधश्रद्धा अशी आहे, जी आजही राजकारण्यांच्या मनात धडकी भरवते. असं म्हणतात, इथे कोणताही राजा, नेता किंवा सत्ताधीश मुक्काम करण्याचं धाडस करत नाही. आता यामागे कारण काय ? तर महाकाल हा आजही उज्जैनचा राजा आहे आणि त्यामुळे इतर कोणत्याही राजाने तिथे राहणं योग्य नाही. असं केल्यास त्याला शिक्षा भोगावी लागू शकते. आता या गोष्टीकडे एखादा नेता कसा दुर्लक्ष करू शकतो? आणि त्यामुळेच बडे नेते भगवान महाकाल यांच्यापुढे नतमस्तक झाले तरी त्यांच्या महाकाल नगरीत, म्हणजेच उज्जैनमध्ये राहणं टाळतात. (Top Stories)
महाकालाच्या शहरात सत्ताधाऱ्यांना रात्रभर मुक्काम करणं अपशकुनी ठरतं असं म्हटलं जातं. म्हणजे, जर त्यांनी उज्जैनमध्ये एक रात्र काढली, तर त्यांची सत्ता जाते, खुर्ची जाते, किंवा राजकीय अडचणी निर्माण होतात. आता यावर विश्वास ठेवावा की ही फक्त अंधश्रद्धा आहे? याचं उत्तर गूढच आहे, पण काही कथा हे खरं असल्याची साक्ष देतात.(Mysterious Place)
१९७७ साली भारताचे चौथे पंतप्रधान मोरारजी देसाई उज्जैनला आले. त्यांनी महाकालेश्वराचं दर्शन घेतलं, रात्रभर मुक्काम केला, आणि मग दुसऱ्याच दिवशी त्यांचं सरकार कोसळलं. असाच प्रसंग कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यासोबत घडला. त्यांनी उज्जैनमध्ये एक रात्र घालवली, आणि अवघ्या काही आठवड्यांत त्यांना राजीनामा द्यावा लागला. ही ताजी उदाहरण आहेत, पण अगदी प्राचीन काळात राजा विक्रमादित्य यांच्यासकट कोणत्याच राजाने उज्जैनमध्ये कधी मुक्काम केला नाही.
या उज्जैन मंदिराच्या स्थापनेमागे एक पौराणिक कथा आहे. ती अशी की, खूप खूप वर्षांपूर्वी, जेव्हा उज्जैनला अवंतिका म्हणायचे, तेव्हा इथे चंद्रसेन नावाचा राजा राज्य करायचा. तो खूप मोठा शिवभक्त होता. त्याच्या भक्तिमुळे अवंतिका नगरी शिवमय झाली होती. गल्लीबोळातून “हर हर महादेव”चा नाद घुमायचा. पण दुसरीकडे, राक्षस लोकांना हे सगळं अजिबात आवडत नव्हतं. यातच दूषण नावाचा एक भयानक राक्षस होता. त्याला असं कळलं की उज्जैनमध्ये सगळीकडे शिवनामाचा जयघोष सुरू आहे. लोक आनंदात आहेत. याचा दूषणला राग आला. त्याने ठरवलं हे शिवभक्त लोक, आणि चंद्रसेन राजा, यांना मी धडा शिकवणार! मग काय दूषण राक्षस उज्जैनवर चाल करून आला. दूषणाने अवंतिकेत हाहाकार माजवला.(Mysterious Place)
===============
हे देखील वाचा : Kesarbai Kerkar : अंतराळात पोहोचलेली आपली मराठी भाषा
===============
यावेळी ‘शिवशंकर’चं नाव घेणाऱ्यांना तो मारू लागला. पण या राज्यातल्या लोकांची शिवभक्ती अफाट होती, इतकी की शिवशंकरांचं नाव घेत जप केल्यावर इथे महाकाल स्वतः प्रकट झाले! महाकालेश्वर महाराजांनी दूषण राक्षसावर आपल्या त्रिशुलाने प्रहार केला आणि त्याला ठार केलं. राक्षसांचा संहार झाला, उज्जैनचं रक्षण झालं. त्यानंतर, महाकालेश्वर महाराज याच भूमीत स्वयंभू ज्योतिर्लिंग रूपात स्थिर झाले. म्हणून उज्जैनमध्ये महाकालेश्वर ज्योतिर्लिंग स्थापन झालं. त्यामुळे इथल्या लोकांची अशी धारणा झाली कि जिथे खुद्द महाकाल विराजमान आहे, तिथे दुसरा कोणी शासक असूच शकत नाही. असाही म्हटलं जात कि महाकाल इथे विराजमान झाल्यापासून इथे दुसरा कुठलाही राजा झाला नाही. त्यामुळे आजही मोठमोठे नेते महाकालाचं दर्शन घेतात, नतमस्तक होतात, पण रात्र काढायची हिम्मत करत नाहीत! ही अंधश्रद्धा आहे की आणखी काही? तुम्हाला काय वाटतं?
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics