Home » ‘द ग्रेट इंडियन किचन’ फेम निमिषा सजयन (Nimisha Sajayan) करतेय मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

‘द ग्रेट इंडियन किचन’ फेम निमिषा सजयन (Nimisha Sajayan) करतेय मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

by Team Gajawaja
0 comment
Nimisha Sajayan debut in Marathi industry Marathi info
Share

मल्याळम अभिनेत्री निमिषा सजयन (Nimisha Sajayan) या अनिभेत्रीने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. तिने ‘द ग्रेट इंडियन किचन’ या बहुचर्चित मल्याळम चित्रपटात मुख्य भूमिका साकाराली होती. ४ जानेवारी १९९७ रोजी महाराष्ट्रामधील मुंबईमध्ये राहणाऱ्या मल्याळम कुटुंबात जन्मलेल्या निमिषा सजयन हिचे संपूर्ण शिक्षण मुंबईत पूर्ण झाले आहे.

निमिषा सजयन (Nimisha Sajayan) हिने तिचे शालेय शिक्षण कारमेल कॉन्व्हेंट स्कूलमधून पूर्ण केले आणि के.जे. सोमय्या या महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आहे. त्यामुळे जन्माने मल्याळम असली तरी मराठमोळ्या मुंबईत वाढलेल्या निमिषाला मराठी चित्रपटसृष्टी नक्कीच नवीन नाही. 

निमिषाने तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट धारण केला आहे. तिने तायक्वांदो राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. इतकंच नाही, तर आठवीमध्ये  असताना तिला ब्लॅक बेल्ट मिळाला होता. महेश टिळेकर दिग्दर्शित आगामी ‘हवाहवाई’ या चित्रपटात ती दिसणार असून, हा चित्रपट १ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Nimisha Sajayan Wiki, Biography, Age, Movies, Family, Images - wikimylinks

निमिषा सजयन (Nimisha Sajayan) हिने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात दिलीश पोथन दिग्दर्शित ‘थोंडिमुथलम द्रिकसाक्षीयुम’ या चित्रपटाद्वारे केली. त्यांनी त्या चित्रपटात श्रीजा ही स्त्री मुख्य भूमिका साकारली. मधुपाल दिग्दर्शित ओरु कुप्रसिधा पाययान आणि सनल कुमार ससीधरन दिग्दर्शित चोला या चित्रपटांसाठी तिने २०१८ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ४९ वा केरळ राज्य चित्रपट पुरस्कार जिंकला. तसेच ईदा २०१८, स्टँड अप २०१९, द ग्रेट इंडियन किचन २०२१, नायट्टू २०२१ आणि मलिक २०२१ यांसारख्या इतर चित्रपटांमधून तिने प्रक्षेकांच्या मनात घर केले आहे. चोलमधील भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवीन दिली होती. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये त्याचा प्रीमियर झाला होता. 

====

हे देखील वाचा: अ’व्यक्त’ प्रेमाचा फुटलेला बांध

====

Drummer's Diaries : A movie and book review blog: The Great Indian Kitchen  : a movie review

मराठी तारका प्रॉडक्शन्सचे महेश टिळेकर आणि नाईंटी नाईन प्रॉडक्शनचे विजय शिंदे यांनी ‘हवाहवाई’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. “द ग्रेट इंडियन किचन” या चित्रपटातील निमिषा सजयनचा अभिनय आवडल्यामुळे महेश टिळेकर यांनी तिला मराठीत काम करण्याविषयी विचारणा केली. त्याला निमिषाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

====

हे देखील वाचा: ऑस्करचे नामांकन मिळालेला हा माहितीपट नक्की कशावर आधारित आहे?

====

यामुळे या कामासाठी होकार दिल्यामुळे आगामी “हवाहवाई” चित्रपचटात त्या दिसणार आहेत. निमिषाने २०१७ रोजी मल्याळम चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटात काम केले. “द ग्रेट इंडियन किचन” या चित्रपटासह निमिषाच्या नायट्टू, मालिक या चित्रपटांतील अभिनयाचे देखील कौतुक झाले आहे.

Hawa Hawai (2022) - Review, Star Cast, News, Photos | Cinestaan

निमिषाचा बहुचर्चित ‘द ग्रेट इंडियन किचन” हा चित्रपट मराठी प्रेक्षकांनीही आवर्जून पाहिलेला आहे. “हवाहवाई” या चित्रपटातील भूमिका तिला साजेशी असल्याने निमिषाला मराठीत पहिला ब्रेक देण्याचा निर्णय महेश टिळेकर यांनी घेतला. या चित्रपटाविषयी प्रक्षेकांना उत्सुकता निर्माण झाली आहे. आता निमिषा सजयनसारखी सशक्त अभिनेत्री या चित्रपटातून मराठीत पदार्पण करत असल्याने या चित्रपटाविषयीचे कुतुहल आणखी वाढले आहे. 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.