Home » Shravan 2025 : महाराष्ट्रात श्रावण महिना उत्तर प्रदेशाच्या तुलनेत १५ दिवस उशिराने का सुरू होतो?

Shravan 2025 : महाराष्ट्रात श्रावण महिना उत्तर प्रदेशाच्या तुलनेत १५ दिवस उशिराने का सुरू होतो?

by Team Gajawaja
0 comment
Shravan 2025
Share

Shravan 2025 : भारत हा विविध संस्कृती, परंपरा आणि धार्मिक पद्धती असलेला देश आहे. या विविधतेचा प्रभाव आपण हिंदू पंचांगाच्या मासगणनेतही पाहतो. विशेषतः श्रावण महिन्याच्या सुरुवातीबाबत उत्तर भारत आणि महाराष्ट्र यांच्यात सुमारे १५ दिवसांचा फरक असतो. उदाहरणार्थ, उत्तर प्रदेशात श्रावण महिन्याची सुरुवात ज्या दिवशी होते, त्या दिवशी महाराष्ट्रात अजून आषाढ महिना चालू असतो. यामागे ज्योतिषशास्त्रीय आणि पंचांग रचनेशी संबंधित एक महत्त्वाचा फरक आहे – तो म्हणजे अमांत आणि पूर्णिमांत पद्धतीतील भेद.

उत्तर भारतात (उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, दिल्ली इत्यादी) पूर्णिमांत पद्धत वापरली जाते. या पद्धतीनुसार, मासाची गणना पूर्णिमेपासून सुरू होते आणि पुढील पूर्णिमेपर्यंत चालते. म्हणजेच, श्रावण महिना आषाढी पूर्णिमेनंतर दुसऱ्या दिवशी सुरू होतो. दुसरीकडे, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात अमांत पद्धत वापरली जाते. या पद्धतीनुसार, मासाची सुरुवात अमावास्येनंतरच्या प्रतिपदेला होते आणि पुढील अमावास्येपर्यंत तो महिना चालतो. त्यामुळेच जेव्हा उत्तर भारतात श्रावण सुरू होतो, तेव्हा महाराष्ट्रात अजून आषाढ महिना पूर्ण होत असतो. या दोन अमावास्यांमध्ये साधारणतः १५ दिवसांचे अंतर असल्यानेच श्रावण महिन्याची सुरुवात महाराष्ट्रात उशिराने होते.

Shravan 2025

Shravan 2025

या फरकामुळे काही सणसुद्धा वेगवेगळ्या दिवशी साजरे होतात. उदाहरणार्थ, नागपंचमी, रक्षा बंधन, गोपाळकाला किंवा जन्माष्टमी हे सण उत्तर भारतात आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या दिवशी साजरे होतात. मात्र, याचा अर्थ सण चुकीच्या दिवशी साजरे होतात असा नाही. कारण तिथी, नक्षत्र आणि योग हे समानच असतात . केवळ मासगणनेची प्रारंभ तारीख वेगवेगळी असते. खरंतर, दोन्ही पद्धती मान्य व योग्य असून, वेगवेगळ्या प्रदेशातील परंपरांनुसार त्यांचा वापर केला जातो. पद्धत वेगळी असली तरी तिथी, नक्षत्र, योग, करण हे सर्व समान असतात. त्यामुळे सणांचा आध्यात्मिक अर्थ आणि त्यामागचं तत्व एकच असतं, फक्त कालगणना वेगळी असते.(Shravan 2025)

=========

हे देखील वाचा : 

Shravan 2025 : श्रावणात शंकराची पूजा करताना महिलांनी कोणते नियम पाळावेत?

Ganesh Temple : तीन सोंड असलेल्या गणेशाचे ऐतिहासिक ‘त्रिशुंड गणपती मंदिर’

Amarnath Yatra : अमरनाथ गुहेचे आश्चर्यचकित करणारे रहस्य

========

दरम्यान, महाराष्ट्रात श्रावण महिना उशिरा सुरू होण्यामागे फक्त पंचांग मोजण्याची पद्धत वेगळी असणे हेच कारण आहे. ही कोणतीही अंधश्रद्धा, धार्मिक मतभेद किंवा चुका नसून, पारंपरिक गणना आणि स्थानिक परंपरांनुसार बनलेली स्वाभाविक पद्धत आहे. दोन्ही पद्धती धर्मशास्त्रानुसार मान्य आहेत आणि आपापल्या सांस्कृतिक चौकटीत योग्यच आहेत. त्यामुळे विविधतेतून एकता हीच भारतीय संस्कृतीची खरी ओळख ठरते.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.