Home » Britain : ब्रिटनचे आई-वडिल गुन्हेगारांच्या नावाच्या प्रेमात !

Britain : ब्रिटनचे आई-वडिल गुन्हेगारांच्या नावाच्या प्रेमात !

by Team Gajawaja
0 comment
Britain
Share

विल्यम शेक्सपियर या प्रसिद्ध इंग्रजी कवी, नाटककाराच्या साहित्याचे चाहते जगभर आहेत. 1564 मध्ये इंग्लंडमधील स्ट्रॅटफोर्ड-अपॉन-एव्हॉन येथे शेक्सपिअर यांचा जन्म झाला आणि 1616 मध्ये त्याच ठिकाणी त्यांचे निधन झाले. इंग्रजी साहित्यातील महान लेखक म्हणून आजही शेक्सपिअर यांची ओळख आहे. त्यांचा नावात काय आहे, हा संवाद विशेष गाजला. ‘रोमियो आणि ज्युलिएट’ या प्रसिद्ध नाटकात जेव्हा ज्युलिएट तिच्या प्रियकराच्या म्हणजे, रोमियोच्या आडनावाबद्दल बोलत असते, तेव्हा ती म्हणते, “नावात काय आहे? ज्याला आपण गुलाब म्हणतो, तो इतर कोणत्याही नावाने ओळखला तरी त्याचा वास तेवढाच गोड येईल.” याचा अर्थ असा की, गोष्टींना दिलेली नावे फारशी महत्त्वाची नाहीत, त्या वस्तू किंवा व्यक्तीचे गुणधर्म आणि ओळखच खरी महत्त्वाची असते. पण शेक्सपिअरनं सांगितेला हा अर्थ खुद्द इंग्लडमधील रहिवाशांनी भलताच मनावर घेतल्याचे स्पष्ट होत आहे. कारण ब्रिटनमधील बहुतांश घरांमध्ये नवजात बाळांचे नाव हे गुन्हेगारांच्या नावावरुन ठेवण्यात येत आहे. (Britain)

धक्कादायक बाब म्हणजे, सिरीयल किलर, खुनी, चोर आणि अन्य भयानक गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेल्या गुन्हेगारांच्या नावाची मोहिनी ब्रिटनच्या पालकांना पडली आहे. आणि याच गुन्हेगारांच्या नावावर ते आपल्या बाळाला संबोधत आहेत. ब्रिटनमध्ये आलेला हा गुन्हेगारांच्या नावांचा ट्रेंड अत्यंत धोकायदायक असून यामुळे अनेक सामाजिक परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुळात जे गुन्हेगार गंभीर गुन्ह्यामध्ये जेलमध्ये आहेत, त्यांच्याप्रती लोकभावना बदलू शकते, असा इशारा काही सामाजिक संघटनांनी दिला आहे. नावात काय आहे, हे सांगणा-या शेक्सपिअरच्या देशातच नवजात बालकांच्या नावांचा एक विचित्र ट्रेंड व्हायरल झाला आहे. आता ब्रिटनमध्ये ज्या घरात लहान मुलांचा जन्म होत आहे, त्याचे नाव कुख्यात गुन्हेगाराच्या नावावरुन ठेवण्याची स्पर्धाच सुरु झाली आहे. येथील घरातून एक सिरीयल किलर किंवा खुनी बाहेर येईल, अशी परिस्थिती आहे. (International News)

ब्रिटनच्या पालकांचा हा आगळावेगळा ट्रेंड एवढा व्हायरल झाला की त्यावर आता सामाजिक संस्था अभ्यास करीत आहेत. शिवाय याबाबत एक अहवालही प्रसिद्ध करण्यात आला आहे. यातून ब्रिटनच्या पालकांना सल्ला आणि गंभीर इशाराही देण्यात आला आहे. या ट्रेंडनुसार ब्रिटनमध्ये नवजात बालकाचे नाव कुख्यात गुन्हेगार, सिरीयल किलर आणि गुंडांच्या नावावर ठेवण्यात येत आहे. पालक मुलांचे नाव शोधण्यासाठी कुठलेही चांगले साहित्य वाचत नसून गुन्हेगारी घटनांचा आढावा घेणारी मासिका आणि पुस्तकं वाचत आहेत. काही पालक तर यापुढे गेले आहेत. त्यांनी आपल्या मुलाचे नाव ठेवण्यासाठी नेटवरुन सर्वात मोठा सिरीअल किलर किंवा सर्वात मोठा भ्रष्टाचार करणारा गुन्हेगार असा शोध सुरु केला आहे. यामुळे येथील सामाजिक संस्थाही चिंता व्यक्त करु लागल्या आहेत. (Britain)

गुन्हेगारी घटनांचा मागोवा घेण्यास सुरुवात केल्याचा बेबे सेंटर युके 2025 मध्ये खुलासा करण्यात आला आहे. या अहवालानुसार बेबी सेंटरच्या 2025 च्या टॉप 100 बाळांच्या नावांच्या यादीतील नावे ही देशातील गंभीर गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या कैद्यांची आहेत. यात सिरीयल किलर, मनोरुग्ण, बलात्कारी, भ्रष्टाचारी आणि मारामारीच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या गुन्हेगारांचा समावेश आहे. यातील काही नावं तर पालकांची अत्यंत फेवरेट आहेत. ही नावं पालकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात निवडली आहेत, की भविष्यात ब्रिटनच्या घराघरातून हे गुन्हेगार प्रसिद्ध होणार आहेत. यात झोडियाक किलरमधील संशयित आर्थर ली अॅलन, वेलनेस स्कॅमर बेले गिब्सन, द मशरुम किलर म्हणून प्रसिद्ध असलेला एरिन पॅटरसन, सिरीयल किलर फ्रेड आणि रोज, आणखी एक कुप्रसिद्ध सिरीयल किलर टेडी अशा नावांचा समावेश आहे. (International News)

=============

हे ही वाचा : Elon Musk : द अमेरिका पार्टी !

=============

पालकांमध्ये हा ट्रेंड वाढल्यानंतर ब्रिटनमधील काही सामाजिक संस्थ्यांनी याबाबत अभ्यास केला. त्यातून टिव्ही शो, पॉडकास्ट आणि नेटफ्लिक्स सारख्या माध्यमांमुळे हे गुन्हेगार घराघरात पोहचले आहेत. आता त्यांच्या नावाबरोबर या पालकांचे एवढे नाते जुळले आहे, की त्यांनी ही नावं कुठलाही विचार न करता आपल्या मुलांना दिली आहेत. या सर्वामुळे आपल्या घरातील बालकांना खलनायक करु नका, असे आवाहन आता ब्रिटनच्या पालकांना करण्यात येत आहे. (Britain)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.