शांततेचा नोबेल पुरस्कार कधी नाही तो यावर्षी अधिक औत्सुक्याचा विषय ठरला आहे. कारण या पुरस्कारासाठी सर्वप्रथम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला दावेदार म्हणून जाहीर केले. ट्रम्प यांच्या पाठोपाठ रशियातून युलिया नवलनी यांचे नाव पुढे आले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादेमिर पुतिन यांच्याविरोधात एकाकी लढा देणा-या युलिया नवलनी या यावर्षीच्या नोबेल पुरस्काराच्या प्रबळ दावेदार मानल्या जातात. याशिवाय संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस आणि संयुक्त राष्ट्रांच्या वतीने पॅलेस्टाईनमधील काम पाहणारे जनरल फिलिप लाझारिनी यांचे नावही 2025 च्या शांततेच्या नोबल पुरस्कारासाठी चर्चेत आहे. पण या सर्व नावांपाठोपाठ अफगाणिस्तानमध्ये सत्तेत असलेल्या तालिबाननंही या नोबेलच्या स्पर्धेत एन्ट्री केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. (Taliban)
तालिबानने नोबेल पुरस्कारावर दावा करत, डोनाल्ड ट्रम्पना खलनायक म्हटले आहे. तालिबाननं सोशल मिडियावर यासाठी विशेष मोहीम सुरु केली असून त्यांचे सर्वोच्च नेते अखुंदजादा हेच शांततेच्या नोबेल पुरस्काराचे खरे दावेदार असल्याचे म्हटले आहे. अफगाणिस्तानमधील महिलांवर अत्याचार करणा-या तालिबाननं शांततेच्या नोबेल पुरस्कारावर दावा ठोकल्यामुळे जगभर खळबळ उडाली आहे. शिवाय या दाव्यामुळे नोबेल पुरस्कार आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे मीम्सही मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागले आहेत. या सर्वांवर नोबेल पुरस्कार समितीनं अद्याप आपलं मत व्यक्त केलेलं नाही. (International News)
जगभर सध्या एकच चर्चा आहे, ती म्हणजे, यावर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळणार याची. जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक मानला जाणारा नोबेल शांतता पुरस्कार सध्यातरी वादाच्या स्थानी आला आहे. कारण या पुरस्कारावर रोज एक व्यक्ती दावा करीत आहे. आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी या पुरस्कारासाठी जगभर शांतता निर्माण केल्याचा दावा केला. त्यांना पाकिस्तान आणि इस्रायल सारख्या देशांनी पाठिंबाही दिला. त्यापाठोपाठ आता तालिबाननंही या पुरस्कारावर आपला दावा ठोकला आहे. तालिबाननं डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देऊ नये, यासाठी सोशल मिडियावर स्वतंत्र आघाडीच सुरु केली आहे. यात ट्रम्प यांचा जगातील सर्वात मोठा खलनायक असा उल्लेख केला आहे. शिवाय गाजामध्ये जी हिंसा चालू आहे, त्यामागे ट्रम्प असल्याचेही म्हणण्यात आले आहे. गाजामध्ये एक लाखाहून अधिक लोकांना मारण्यात आलं आहे. यात मोठ्या संख्येने महिला आणि मुलांचा समावेश आहे. शिवाय बाल लैंगिक गुन्हेगार असलेल्या जेफ्री एपस्टाईनशी मैत्री ठेवणा-या डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार कसा दिला जाऊ शकतो, असा प्रश्नही तालिबाननं विचारला आहे. (Taliban)
ट्रम्प यांना खलनायक म्हणणा-या तालिबाननं स्वतःला मात्र नोबेल पुरस्कारासाठी पात्र म्हणून घोषित केले आहे. यावर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार तालिबानचे सर्वोच्च नेते हिबतुल्लाह अखुंदजादा यांनाच मिळायला हवा, असे स्पष्ट केले आहे. हिजतुल्लाह हे कशाप्रकारे या पुरस्काराठी पात्र आहेत, हे सांगताना तालिबाननं त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची जंत्री सांगितली आहे. यात प्रथम अफगाणिस्तानला परकीय कब्ज्यातून मुक्त केल्याचे सांगितले आहे. शिवाय चार दशकांच्या युद्धानंतर अफगाणिस्तानला केंद्रीकृत सरकारखाली एकत्र केल्याचेही सांगितले आहे. (International News)
तालिबानमध्ये अफगाणिस्तानमध्ये प्रगत सरकार स्थापन केल्याचेही या दाव्यात स्पष्ट करण्यात आले आहे. एकेकाळी काबुलचा एक भाग ड्रग्ज आणि गुन्हेगारांचा अड्डा झाला होता, तिथे आज सार्वजनिक ग्रंथालय असून यात मोफत पुस्तके दिली जात असल्याचेही सांगितले आहे. या सर्वांमागे तालिबानचे सर्वोच्च नेते हिबतुल्लाह अखुंदजादा यांची प्रगत विचारसरणी असल्याचेही सांगण्यात आले आहे. ज्या हिबतुल्लाह अखुंदजादाचे नाव शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी तालिबाननं पुढे केले आहे, तो कोण आहे, हे जाणणंही गरजेचे आहे. मे 2016 मध्ये तालिबान नेतृत्व परिषदेने हिबतुल्लाह अखुंदजादा यांची सर्वोच्च नेता म्हणून नियुक्ती केली. (Taliban)
==========
हे ही वाचा : Dubai : जेव्हा अख्खं दुबई भारतातून operate व्हायचं!
============
15 ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूल ताब्यात घेतल्यापासून, हिबतुल्लाहचा उल्लेख अफगाण अमिरातीचा सर्वोच्च धार्मिक आणि राजकीय नेता म्हणून करण्यात येऊ लागला. हिबतुल्लाहला मुल्ला म्हणूनही ओळखले जाते. त्याचा एक मुलगा, अब्दुल रहमान खालिद आत्मघातकी बॉम्बर होता. जुलै 2017 मध्ये हेलमंड प्रांतातील गिरिश्क येथील अफगाण लष्करी तळावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात तो मारला गेला. हिबतुल्लाहवरही आत्तापर्यंत तीन हल्ले झाले आहेत. मात्र त्यातून तो वाचला आहे. अमेरिकेचा कट्टर विरोधक असलेला हा हिबतुल्लाह आता नोबेल पुरस्कारावर आपला दावा सांगत आहे. एकूण यावर्षीचा नोबेल पुरस्कार जाहीर होण्यापूर्वीच अधिक चर्चेत आला आहे. (International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics