Home » Ganesh Temple : तीन सोंड असलेल्या गणेशाचे ऐतिहासिक ‘त्रिशुंड गणपती मंदिर’

Ganesh Temple : तीन सोंड असलेल्या गणेशाचे ऐतिहासिक ‘त्रिशुंड गणपती मंदिर’

by Jyotsna Kulkarni
0 comment
Ganesh Temple
Share

मंदिरांचा देश म्हणून प्रसिद्ध असलेल्या भारतातील प्रत्येक मंदिराची एक खासियत आहे, ज्यामुळे तर मंदिर कायमच लोकांमध्ये चर्चेचा विषय असते. भारतातील मंदिरं त्यांचा इतिहास, त्यांच्या प्रथा, त्यांचे रहस्य आदी सर्वच गोष्टी जगभर प्रसिद्ध आहेत. सध्या पुण्यातील एक मंदिर कमालीचे गाजत आहे. सोशल मीडियावर देखील या मंदिराचे व्हिडिओ कमालीचे व्हायरल होत आहे. हे मंदिर आहे, ‘त्रिशुंड गणपती मंदिर’. विद्येचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या या पुण्यामध्ये एक असे गणेश मंदिर आहे, ज्याची ख्याती फक्त पुण्यातच नाही तर जगात प्रसिद्ध आहे. (Marathi News)

पेशव्यांची आणि आपल्या महान इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक गोष्टी पुण्यामध्ये आहेत. यापैकीच एक महत्वाचे ठिकाण म्हणजे, सोमवार पेठेतील त्रिशुंड गणपती मंदिर. अकल्पनीय शिल्पकला आणि मूर्तीकला दाखवणारे हे मंदिर अतिशय जाज्वल्य आहे. गणपती म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य आणि लाडके दैवत. गणेशाचे आणि पुण्याचे खूपच जुने आणि जवळचे नाते आहे. याच पुण्यामध्ये टिळकांनी सार्वजनिक गणपतीची सुरुवात केली आहे. कायमच विद्येची देवता असलेल्या गणेशाची पुण्यावर कृपा राहिलेली आहे. कदाचित यासाठीच पुण्याला विद्येचे माहेघर म्हटले जाते. अशा या पुण्यामध्ये असलेल्या त्रिशुंड गणपती मंदिराची माहिती आज आपण घेणार आहोत. हे मंदिर आणि या मंदिरातील गणेशाची मूर्ती खूपच वेगळी आहे. (Todays Marathi Headline)

Ganesh Temple

त्रिशुंड गणपती मंदिरातील गणपतीची मूर्ती तीन सोंडेची आणि रिद्धी-सिद्धीचा थाट असल्याने वेगळी ठरते. त्रिशुंड मयुरेश्वर गणपती मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरातील रहस्यमी तळघर वर्षातून एकदाच उघडते. हे मंदिर जेवढे वरती आकर्षक आहे तितकेच शांत आणि सुंदर या मंदिराचे तळघर आहे. त्रिशुंड गणेशमूर्तीच्या अगदी खाली दलपतगिरी गोसावी यांची समाधी आहे. संपूर्णवेळ पाण्यामध्ये असणाऱ्या या तळघराचे दरवाजे वर्षातून एकदा केवळ गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर उघडण्यात येतात. गणपती बाप्पाचे हे मंदिर भक्तांसाठी रोज खुले असते मात्र याच मंदिराच्या खाली असलेल्या तळघरातील दलपतगिरी गोसावी याचे मंदिर मात्र गुरु पौर्णिमेच्या दिवशीच उघडले जाते. गुरु पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी पहाटेपासून मोठी गर्दी असते. (Latest Marathi NEws)

कमला नेहरू हॉस्पिटल जवळ असलेले हे मंदिर नागझरी नावाच्या एका मोठय़ा ओढय़ाच्या काठावर बांधले आहे. पुणे शहराच्या या पूर्व भागातील परिसरात शहाजी राजांनी एक शहापुरा नावाची पेठ इ. स. १६०० मध्ये वसवली. त्यानंतर १७६५ मध्ये थोरले बाजीराव यांनी याचे नाव सोमेश्वर पेठ असे ठेवले. या परिसरात गोसावी लोकांची खूप वस्ती असल्यामुळे त्याला गोसावीपुरा म्हणत असत. या मंदिरातील ऐतिहासिक नोंदीनुसार इंदूरजवळ असलेल्या धामपूर येथील संपन्न गोसावी भीमगिरजी यांनी २६ ऑगस्ट १७५४ मध्ये या मंदिराची निर्मिती केली. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या रचनेवर राजस्थानी, माळवा तसेच दाक्षिणात्य स्थापत्यशैलीचा प्रभाव आहे. या मंदिरात असलेली बाप्पाची मूर्ती देखील खूपच वैशिष्ट्यपूर्ण असून जगात ती एकमेव अशी मूर्ती असल्याचे सांगितले जाते. या मूर्तीला तीन सोंड, सहा हात, मांडीवर दोन्ही बाजूने रिद्धी-सिद्धी आहेत”. (Marathi Trending News)

Ganesh Temple

काळ्या दगडात कोरीव शिल्पांनी नटलेले त्रिशुंड गणपतीचे मंदिर कसबा पेठेतून मंगळवार पेठ दवाखान्याच्या दिशेने जकातेपुला नंतर, उजव्या बाजूस आहे, त्रिशुंड गणेशाची मूर्ती महाराष्ट्रात क्वचितच आढळते. या मंदिरातील गर्भगृहाच्या चौकटीवर दोन संस्कृत आणि एक फारशी शिलालेख आहेत. पहिल्या संस्कृत शिलालेखात मंदिराच्या बांधकामाचा काळ आणि रामेश्वराची (शिव शंकर) प्रतिष्ठापना केल्याचा उल्लेख असून दुसऱ्या शिलालेखात गीतेतील आरंभीचा नमनाचा श्लोक कोरलेला आहे, तर फारशी शिलालेखात हे ठिकाण गुरुदेव दत्त महाराजांचे असल्याचे सांगितले आहे. (Top Stories)

===========

हे ही वाचा :

Dubai : जेव्हा अख्खं दुबई भारतातून operate व्हायचं!

Pablo Escobar : लेकीला थंडी वाजते म्हणून 16 कोटींच्या नोटा जाळणारा माफिया!

==============

त्रिशुंड गणेश मंदिराच्या तळघराला जाण्यासाठी या मंदिराच्या सभामंडपातून दार आहे. पायऱ्या उतरुन खाली तळघरामध्ये जाता येते. तळघर हे गुडघापर्यंत पाण्याने भरलेले असते. तळघराच्या दगडांमधून जिवंत झरा कायमच वाहत असतो. या पाण्यामुळे तळघर हे नेहमी पाण्याने भरलेले असते. तळघराच्या छतावर दगडी झुंबर कोरण्यात आलेले आहे. त्याचबरोबर योग साधना करण्यासाठी तळघरामध्ये वेगळी खोली असल्याचे देखील दिसून येते. तळघरातून वर चढून गेल्यानंतर दलपतगिरी गोसावी यांची समाधी आहे. या समाधीवर देखील छोटा दगडी गणपती असल्याचे दिसते. मंदिराचे तळघर हे पाण्याने भरलेले आल्याने थंड असते. (Social Updates)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.