प्रत्येक व्यक्तीलाच आपल्या कामाबद्दल कौतुकाची अपेक्षा असते. चांगल्या कामाच्या बदल्यात पाठीवर मिळालेली कौतुकाची थाप कायमच सगळ्यांसाठी खास असते. कायम ही थाप आपल्याला अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा देते. आता मनोरंजनविश्वातील कलाकारांच्या कामाबद्दल आणि कौतुकाबद्दल सांगायचे झाल्यास त्यांना कायम प्रेक्षकांकडून प्रेम मिळत असते. मात्र यासोबतच त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची कायम आठवण राहावी म्हणून त्यांना पुरस्कार देखील दिले जातात. (Marathi News)
चांगले काम केलेल्या कलाकारांना त्यांच्या चांगल्या कामासाठी पुरस्कार दिले जातात. हे पुरस्कार कायमच कलाकारांना अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा देतात. मराठी मनोरंजनविश्वात नुकताच एक मोठा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. १० जुलै रोजी मुंबईतील हॉटेल सहारा स्टार येथे १० वा फिल्मफेअर मराठी पुरस्कार सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’ने सर्वाधिक ७ पुरस्कार जिंकले. तर ‘पाणी’ या सिनेमाने ६ पुरस्कार जिंकले आहेत. (Top Marathi Headline)
या सोहळ्यात १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या काळात प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांचा यावेळी गौरव करण्यात आला. तसेच उत्कृष्ट अभिनय केलेल्या कलाकारांना आणि कलाकृतींना यावेळी गौरवण्यात आले. या सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांसोबत बॉलिवूडचे देखील अनेक प्रसिद्ध कलाकार उपस्थित होते. अभिनेता नवाजउद्दीन सिद्दिकी, अभिनेत्री तब्बू, अभिनेता राजकुमार रावसह यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकार मराठी फिल्म फेअर अवॉर्डच्या या कार्यक्रमात उपस्थित होते. या सोहळ्यामध्ये तांत्रिक आणि निर्मिती क्षेत्रातील उत्कृष्ट प्रतिभेला सन्मानित करण्यात आले. जाणून घेऊया विजेत्यांची संपूर्ण यादी. (Todays Marathi Headline)
फिल्मफेअर पुरस्कार 2025 च्या विजेत्याची संपूर्ण यादी
सर्वोत्कृष्ट चित्रपट- पाणी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- आदिनाथ कोठारे (पाणी)
सर्वोत्कृष्ट चित्रपट (परीक्षक पसंती)- गाठ, अमलताश
सर्वोत्कृष्ट अभिनेता- महेश मांजरेकर (जुनं फर्निचर)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (परीक्षक पसंती)- जितेंद्र जोशी (गाठ)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- प्राजक्ता माळी (फुलवंती) आणि वैदेही परशुरामी (एक दोन तीन चार)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (परीक्षक पसंती)- राजश्री देशपांडे (सत्यशोधक)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- क्षितीश दाते (धर्मवीर 2)
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री- नम्रता संभेराव (नाच गं घुमा)
सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्री- जुई भागवत (लाइक अँड सबस्क्राइब)
सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेता- धैर्य घोलप (येक नंबर)
सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक- नवज्योत बांदिवडेकर (घरत गणपती) आणि राहुल पवार (खडमोड)
सर्वोत्कृष्ट गायिका- वैशाली माडे, फुलवंती (मंदनमंजिरी )
सर्वोत्कृष्ट गायक- राहुल देशपांडे (अमलताश)
सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम 2025- फुलवंती
सर्वोत्कृष्ट गीतकार- दिवंगत शांता शेळके (अमलताश)
सर्वोत्कृष्ट संवाद- महेश मांजरेकर (जुनं फर्निचर)
सर्वोत्कृष्ट स्क्रीनप्ले- नितीन दीक्षित (पाणी)
सर्वोत्कृष्ट कथा- छत्रपाल निनावे (गाठ)
सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइन- एकनाथ कदम (फुलवंती)
सर्वोत्कृष्ट संगीत- अनमोल भावे (पाणी)
सर्वोत्कृष्ट कॉस्ट्यूम डिझाइन- मानसी अत्तरदे (फुलवंती)
सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफर- उमेश जाधव (फुलवंती)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत- गुलराज सिंग (पाणी)
सर्वोत्कृष्ट एडिटिंग- मयुर हरदास आणि आदिनाथ कोठारे (पाणी) आणि नवनीता सेन (गाठ)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी- महेश लिमये (फुलवंती)
फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार- उषा मंगेशकर
=========
हे देखील वाचा : Smriti Irani : ‘क्योंकी सास भी कभी बहू थी 2’च्या एका भागासाठी स्मृती इराणी घेताय तब्बल ‘इतके’ पैसे
=========
सध्या सोशल मीडियावर या कार्यक्रमातील अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. यातल्या एका व्हिडिओमध्ये बॉलिवूड अभिनेत्री तब्बू मराठीमध्ये बोलताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ खूपच गाजत आहे. व्हिडिओमध्ये ती महेश मांजरेकर यांना पुरस्कार देताना दिसत आहे. महेश मांजरेकर यांचे नाव घेण्याआधी ती मराठीमध्ये म्हणते, “नमस्कार.. मी खूप खूश आहे. मला तुम्ही सन्मान दिलात, यासाठी खूप खूप आभार.. मी हे अवॉर्ड असा दिग्दर्शकाला देत आहे, ज्याने मला माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा सिनेमा आणि भूमिका दिली…” यानंतर ती जोरात मांजरेकर…म्हणते आणि महेश मांजरेकर स्टेजवर जातात. त्यानंतर तब्बू त्यांना मिठी देखील मारते. फिल्मफेअरने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. मुख्य म्हणजे तब्बू मराठी भाषेत बोलत असल्याने नेटकऱ्यांनी तिचे चांगलेच कौतुक केले आहे. (Social Updates)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics