Home » Dubai : जेव्हा अख्खं दुबई भारतातून operate व्हायचं!

Dubai : जेव्हा अख्खं दुबई भारतातून operate व्हायचं!

by Team Gajawaja
0 comment
Dubai
Share

समजा, आज दुबई भारताचा भाग असता, तर काय झालं असतं? तर कदाचित बुर्ज खलिफावर भारताचा तिरंगा फडकला असता किंवा दुबईच्या रस्त्यांवर उभं राहून आपण मस्त मिरची, वडापाव आणि टपरीवर कडक चहा पित असतो! आता हा गंमतीचा भाग झाला, पण तुम्हाला हे ऐकून नक्की धक्का बसेल की, एकेकाळी दुबई, अबू धाबी आणि ओमान हे खरंच भारताचा भाग होते, आणि त्यांची सूत्र दिल्लीतून ऑपरेट व्हायची. आता तुमच्या मनात प्रश्न असेल, जर तेव्हा हे प्रदेश भारताचा भाग होते, तर आता का नाहीत? याचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात थोडं डोकवावं लागेल.(Dubai)

तर १९ व्या शतकाच्या सुरुवातीला आणि २० व्या शतकाच्या पूर्वार्धात भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं. ते फक्त भारतावरच राज्य करत नव्हते, तर अरबी समुद्राच्या काठावर असलेले ट्रुशियल स्टेट्स – म्हणजे दुबई, अबु धाबी, शारजा, हे देखील ब्रिटिश इंडियाचा भाग होते. या सर्व प्रदेशांचा कारभार दिल्लीत बसलेल्या व्हॉइसरॉय ऑफ इंडियाकडून चालायचा! ‘इंटरप्रिटेशन ॲक्ट ऑफ १८८९’नुसार, दुबई आणि इतर गोल्फ शहरं आणि देश हे कायदेशीररित्या ब्रिटिश इंडियाचा भाग मानले जायचे. (Top Stories)

१९५६ मध्ये ‘द टाइम्स’चे पत्रकार डेव्हिड होल्डन यांनी दुबई, अबु धाबी आणि ओमानला भेट दिली, जिथे जिथे ते गेले , तिथे तिथे त्यांना भारताची छाप दिसली. तिथले लोक धोब्याला ‘धोबी’, आणि पहारेकऱ्याला ‘चौकीदार’ म्हणायचे. याचं कारण म्हणजे या भागात भारतीय पॉलिटिकल सर्व्हिसचे अधिकारी आणि भारतीय सैनिक तैनात होते. इतकंच काय तर, अगदी ओमानच्या सुलतानाला तर राजस्थानात शिक्षण मिळालं होतं. आणखी एक कारण म्हणजे भारतीय व्यापारी, खासकरून गुजरात आणि मुंबईतले व्यापारी, दुबईत स्थायिक झाले होते. त्यांनी तिथं सोनं, कापड आणि मसाल्यांचा व्यापार सुरू केला होता. दुबईच्या बाजारात भारतीय रुपये चलन म्हणून वापरलं जायचं, आणि अगदी पोस्टल स्टॅम्प्सवरही ‘दुबई’ असं लिहिलेले भारतीय स्टॅम्प्स वापरले जायचे. (Dubai)

१८५३ पासून या प्रदेशांवर ब्रिटिशांचा प्रभाव वाढत गेला. पण आणखी बरीच वर्ष पुढे आलो, म्हणजे १९४७ ला, जेव्हा भारत स्वतंत्र होणार होता, तेव्हा ब्रिटिशांना एक मोठा प्रश्न पडला – आता या आखाती देशांचं आणि ट्रुशियल स्टेट्सचं काय करायचं? कारण हे प्रदेश सुद्धा ब्रिटिश इंडियाचा भाग होते. काही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी चर्चा केली आणि सुचवलं की, दुबई आणि इतर ट्रुशियल स्टेट्स भारत किंवा पाकिस्तानच्या समाविष्ट व्हावेत, जशी जयपूर, हैदराबाद किंवा बहावलपूर यासारखी संस्थानं भारतात सामील झाली. पण इथं एक ट्विस्ट आला. भारत सरकारला यात फारसा रस नव्हता, कारण सर्वांचं लक्ष भारत-पाकिस्तान फाळणीवर केंद्रित होतं.(Top Stories)

==============

हे देखील वाचा : Ajay Devgan : बॉलिवूडमध्ये तब्बल ९ वेळा मराठी माणसाचा रोल करणारा !

==============

त्यामुळेच हा निर्णय इतका शांतपणे घेतला गेला की, त्यावेळी कुणाचं तिथे फारसं लक्षही गेलं नाही आणि १ एप्रिल १९४७ ला दुबईपासून कुवेतपर्यंतचे देश भारतापासून कायमचे वेगळे झाले. जेव्हा ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी सुचवलं की भारतातून बाहेर पडताना अरबी प्रदेशांमधूनही माघार घ्यावी, तेव्हा त्यांना विरोध झाला. १९६६ ला दुबईत तेल सापडलं आणि मग त्यांचं नशीबच पालटलं. १९७१ मध्ये ब्रिटिशांनी आखातातून पूर्णपणे माघार घेतली आणि दुबई, अबु धाबीसह सात अमिरात्सने मिळून युनायटेड अरब अमिरात्स (UAE) ची स्थापना केली. (Dubai)

आज भारत आणि दुबईसारख्या आखाती देशांचे चांगले संबंध आहेत. दुबईत 38% लोक भारतीय आहेत, आणि भारत हा दुबईचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. आता तर येत्या २०३० पर्यंत मुंबई-दुबई २२०० किमी अन्डरवॉटर ट्रेन प्रकल्पावर विचार सुरू आहे. तुम्हाला ही गोष्ट ऐकून काय वाटलं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.