सध्या मराठी भाषेवरून मोठ वादंग उठलय… राजकारण असो वा सर्वसामान्य माणूस सगळ्यांचीच अगदी मराठी येते की नाही यावरून खडाजंगी सुरु आहे. ते सर्व जाउद्या पण किती लोकांना माहित आहे की आपली मराठी भाषा आता फक्त महाराष्ट्रापुरती उरलेली नाही… तर पृथ्वीपासून पार २६ अब्ज म्हणजे २६ वर ९ शून्य लावा इतके किलोमीटर दूर पोहोचली आहे. मराठी भाषेची हीच खास गोष्ट जाणून घेऊ. (Kesarbai Kerkar)
आपली सूर्यमला किती मोठी आहे? तर ७५० कोटी किलोमीटर दूर असलेल्या प्लूटोपर्यंत…हो हो… प्लूटो सध्या ग्रह नाहीये, पण त्याचं अस्तित्व आहेच ना… तर याच प्लूटो ग्रहाच्याही पुढे असलेल्या इंटरस्टेलर स्पेसमध्ये मानवाने बनवलेले दोन यान पोहोचले आहेत. आता तुम्ही चाट पडाल की, तब्बल ७५० कोटी किलोमीटर इतकं दूर जाणारं यान बनवणं शक्य आहे का ? तर शक्य-अशक्य सोडा… असे दोन यान नासाने १९७७ सालीच लाँच केले होते…त्यांची नावं आहेत, वोयजर-१ आणि वोयजर-२… अजून एक गोष्ट ऐकून तुम्हाला धक्का बसेल की, हे दोन्ही यान अजूनही काम करत आहेत आणि सिग्नल पाठवत आहेत. ( Top Stories)
याच यानानी सर्वप्रथम मंगळ, गुरू, शनी, नेपच्यून, युरेनस, प्लूटो या ग्रहांच्या अगदी जवळ जाऊन त्यांचे सर्वात क्लिअर फोटो काढून पृथ्वीवर पाठवले होते.आपल्या पृथ्वीचाही एक फोटो वोयजर-१ यानाने ६ अब्ज किलोमीटर दुरून काढला होता, जो ‘पेल ब्लू डॉट’ म्हणून फेमस आहे. आता तुमच्या मनात अजून एक प्रश्न आला असेल की, हा इतका मोठा प्रवास नेमका कशासाठी ? तर याच्या माध्यमातून सुर्यमालेतल्या इतर मोठ्या ग्रहांचा अभ्यास तर होणारच होता. पण आपल्या या ब्रह्मांडातल्या रहस्यांपैकी सर्वात मोठं रहस्य म्हणजे एलियन्स… या अनंत ब्रह्मांडात एलियन्स असूच शकतात, त्यांचा शोध घेण्यासाठीच हे दोन यान अंतराळात पाठवण्यात आले होते.(Kesarbai Kerkar)
महत्त्वाचं म्हणजे एलियन्स जरी अस्तित्वात असले, तरी त्यांची भाषा, त्यांची संस्कृती आपल्यापेक्षा पार वेगळी असणारच… कदाचित ते आपल्यापेक्षा जास्त इंटेलीजेंट नसुही शकतात. पण तरीही एक hope म्हणून हे दोन्ही यान सुर्यमालेपलीकडे नासाने पाठवले आहेत. या दोन्ही यानांमध्ये एलियन्स किंवा परग्रही संस्कृतींसोबत contact करण्यासाठी एक गोल्डन फोनोग्राफ रेकॉर्ड नावाची एक मशीन फिट करण्यात आली आहे. या गोल्डन फोनोग्राफ रेकॉर्डमध्ये प्राण्यांचे, पक्षांचे, कीटकांचे, समुद्री जीवांचे अशा अनेकांचे आवाज रेकॉर्ड करून ठेवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे या मशीनमध्ये जगभरातील ५५ विविध भाषांमधले काही मेसेजेससुद्धा आहेत आणि प्रत्येक देशातून एका गाण चूज करण्यात आलं होतं. त्याच ५५ भाषांमध्ये आपली मराठी भाषासुद्धा आहे आणि भारताकडून जे गाणं निवडण्यात आलं, ते आहे प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांनी गायलेलं ‘जात कहा हो’ हे गाणं. हे ऐकून अभिमानाने उर भरून आलं असेल ना…( Top Stories)
“नमस्कार. या पृथ्वीतील लोक तुम्हाला त्यांचे शुभविचार पाठवतात आणि त्यांची इच्छा आहे की तुम्ही ह्या जन्मी धन्य व्हा.” असा हा मराठीतला मेसेज त्या यानात अजूनही आहे जो अब्जो किमी दूर पोहोचलाय… बघा आपली मराठी भाषा कुठे पोहोचली आहे… आता केसरबाई केरकर यांच्या या गाण्याबद्दल जाणून घेऊ, तर ‘जात कहा हो’ हे गाण शास्त्रीय संगीतातल्या राग भैरवी या प्रकारात मोडतं. विशेष म्हणजे गोल्डन फोनोग्राफ रेकॉर्ड्ससाठी हे गाणं जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ कार्ल सेगन यांनी निवडलं होतं. मी सुरुवातीला एक गोष्ट सांगितली होती, वोयाजर-१ ने दुरून पृथ्वीचा फोटो काढला होता, तो यांच्याच सांगण्यावरून काढला होता, जो आज जगातल्या आयकॉनिक फोटोंपैकी एक आहे. याच्या माध्यमातून मराठी भाषेची आणि मराठी व्यक्तिमत्त्वाची महती खऱ्या अर्थाने अंतराळात पोहोचलेली आहे.(Kesarbai Kerkar)
================
हे देखील वाचा : South Korea : कोरियन लोकांचं कनेक्शन अयोध्यासोबत !
================
आता अजून एक विचित्र गोष्ट सांगते, जी आयुष्यात एकदाच घडली होती. १५ ऑगस्ट १९७७ ला Sagittarius सॅजीटेरिअस म्हणजे धनु तारकसमूहातून ओहिओ स्टेट युनिव्हर्सिटीच्या बिग इअर रेडिओ टेलीस्कोपवर एक सिग्नल आला होता. तब्बल ७२ सेकंद हा सिग्नल येत होता. खगोल अभ्यासक जेरी एहमन यांनी हा सिग्नल रेकॉर्ड केला. याला WOW सिग्नल असं म्हणतात. ब्रह्मांडातून एखादा सिग्नल येण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर कधीही अशा प्रकारचा कोणताही सिग्नल आला नाही. आजपर्यंत कोणालाच कळलं नाही की, हा सिग्नल नेमका पाठवला तरी कोणी, एलियन्सनी की इतर कोणत्यातरी बुद्धिमान संस्कृतीने. (Kesarbai Kerkar)
तुम्ही कल्पना करा, जर एखाद्या एलियन सीव्हीलायजेशनला व्होयाजर १ किंवा २ सापडला, त्यांनी याच गोल्डन फोनोग्राफ रेकॉर्डमधून ‘जात कहा हो’ हे गाणं select केलं आणि याच गाण्याच्या माध्यमातून त्यांनी पृथ्वीवर contact करण्याचा प्रयत्न केला आणि हेच गाणं पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या रेडिओ सिग्नल्सवर खणाणू लागलं तर…? मराठी भाषा गाजलीच म्हणून समजा…
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics