भगवान शंकराची 12 ज्योतिर्लिंग देशामध्ये आहेत. यातील पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. यात त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, घृष्णेश्वर, परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ या ज्योतिर्लिंगांचा समावेश आहे. या सर्वच ज्योतिर्लिंगामध्ये आता श्रावण महिन्यासाठी विशेष तयारी सुरु आहे. श्रावण महिन्यातील सोमवारी या मंदिरांमध्ये भगवान शंकराची विशेष पूजा करण्यात येणार आहे. त्यातही भीमाशंकर ज्योतिर्लिंगामध्ये अलिकडच्या काही वर्षात मोठ्या संख्येनं भाविक जात आहेत. पुण्यापासून जवळ असलेले हे ज्योतिर्लिंग सह्याद्री पर्वतराजीमध्ये आहे. हा संपूर्ण परिसर घनदाट वृक्षांनी वेढलेला असून श्रावणात या परिसराचे नैसर्गिक सौंदर्य हे अधिक खूलून येते. देशभरातील भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग सहाव्या स्थानावर येते. (Bhimashankar Jyotirlinga)
या स्थानी वर्षभर भाविकांची गर्दी असते. मात्र पावसाळा सुरु झाल्यावर येथे भाविक मोठ्या संख्येनं येतात. मंदिर प्रशासनातर्फेही या भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी भीमाशंकर ज्योतिर्लिंग सहाव्या स्थानावर आहे. हे ज्योतिर्लिंग पुण्यापासून सुमारे 110 किलोमीटर अंतरावर आहे. सह्याद्री पर्वतावर असलेल्या या भीमाशंकर मंदिरातील शिवलिंग हे आकाराने मोठे आहे. त्यामुळे या मंदिराला मोटेश्वर महादेव मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर जिथे आहे, तो परिसर अत्यंत निसर्गसंपन्न आहे. या भीमाशंकर मंदिराजवळूनच भीमा नदी वाहते. या नदीचा उगम आणि मंदिराची स्थापना याबाबत येथील स्थानिक पौराणिक कथा सांगतात. भीम असूर नावाच्या एका राक्षसाचे आणि भगवान शंकराचे येथे युद्ध झाले. या युद्धात भगवान शंकराच्या शरीरातून जे घामाचे काही थेंब पडले, त्या थेंबांपासून भीमा नदीची निर्मिती झाल्याचे सांगण्यात येते. (Social News)
भीमाशंकर मंदिरापासून ही भीमा नदी वाहते आणि कृष्णा नदीला मिळते. भीमाशंकर मंदिर ज्या भागात आहे, तो सर्व भाग दुर्मिळ वनस्पती आणि वन्य प्राण्यांसाठीही ओळखला जातो. पावसाळ्यात या भागात हिरवळ तयार होते, आणि अनेक नैसर्गिक झरे तयार होतात. त्यामुळे येथे जाणा-या पर्यटकांची संख्याही वाढते. सोबतच येणा-या श्रावण महिन्यात येथे अहोरात्र भाविकांची गर्दी असते. या भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराबाबत अनेक पौराणिक कथा सांगण्यात येतात. त्यातील शिवपुराणात सांगितलेल्या कथेमध्ये कुंभकर्णाच्या मुलाचा, म्हणजेच भीम नावाच्या राक्षसाचाही उल्लेख आहे. भीम नावाच्या या राक्षसाला आपल्या वडिलांच्या मृत्युचा बदला घ्यायचा होता. त्याला भगवान रामांसोबत युद्ध कराचये होते. या युद्धात यश मिळवण्यासाठी त्यानी तपश्चर्या केली आणि भगवान ब्रह्मदेवाकडून अजिंक्य होण्याचे वरदान प्राप्त केले. वरदान मिळताच त्यानी ऋषींवर अत्याचार करायला सुरुवात केली. यामुळे त्रस्त झालेले ऋषी आणि देव भगवान शंकराच्या आश्रयाला गेले. या भीम राक्षसाला धडा शिकवण्यासाठी प्रत्यक्ष शंकर येथे आले आणि त्यांनी भामासोबत युद्ध केले. (Bhimashankar Jyotirlinga)
भीमाचा वध केल्यावर विश्रांतीसाठी भगवान शंकर येथे विसावले. तिथेच ज्योतिर्लिंगाच्या रूपात ते प्रकट झाले. भीम राक्षसाला मारल्यावर भगवान शंकर ज्योतिर्लिंगाच्या रुपात प्रकट झाल्यामुळे त्यांना भीमाशंकर ज्योतिर्लिंग असे नाव पडले. हे स्वयंभू ज्योतिर्लिंग असल्यामुळे या ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाल्यावर सर्व पापांपासून मुक्ती मिळते, असे सांगितले जाते. शिवपुराणात या भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे महात्म्य सांगण्यात आले आहे. त्यानुसार भीमाशंकर मंदिरात पूजा केल्याने भक्तांना मोक्षप्राप्ती होते. याच भीमाशंकर ज्योतिर्लिंगापासून भीमा नदीचा उगम होतो. भीमा नदी भीमाशंकर गावातून उगम पावते. भीमाशंकरच्या आसपास 108 तीर्थक्षेत्रे असल्यानं या क्षेत्राचे धार्मिक महत्त्व अधिक वाढलं आहे. ही सर्व तीर्थ ज्ञान तीर्थ, मोक्ष तीर्थ आणि पापमोचन तीर्थ, क्रीडा तीर्थ, भीम उद्गम तीर्थ, भाषा तीर्थ म्हणून ओळखली जातात. (Social News)
यातील प्रत्येक तीर्थाचे महत्व वेगळं आहे. भीमाशंकर मंदिराजवळच कमलाजा मंदिर आहे. कमलजा माता ही पार्वती मातेचा अवतार मानली जाते. याशिवाय भीमाशंकरपासून काही किलोमीटर अंतरावर हनुमान तलाव आहे. पावसाळ्यात हा तलाव संपूर्णपणे भरुन जातो. याशिवाय मंदिराजवळही एक कुंड असून ऋषी कौशिक यांनी येथे पिंडदान केले होते. याला मोक्ष कुंड तीर्थ म्हणतात. यात स्नान केल्याने मोक्ष मिळतो असे मानले जाते. भीमाशंकर मंदिराच्या दक्षिणेकडील बाजूला असलेले सर्वतीर्थ नावाचे प्रसिद्ध तलाव थेट भगवान मंदिराशी जोडलेले आहे आणि येथून भीमा नदी वाहते. याशिवाय भगवान दत्तात्रेयांनी बांधलेले ज्ञानकुंड आणि देवी भाषादेवीशी संबंधित सर्वतीर्थ देखील आहे. कुशारण्य तीर्थ मंदिराच्या दक्षिणेस आहे आणि येथून भीमा नदी पूर्वेकडे वाहायला लागते. येथेच भगवान गणपतीचे मंदिर आहे. (Bhimashankar Jyotirlinga)
=============
हे ही वाचा : Amarnath Yatra : अमरनाथ गुहेचे आश्चर्यचकित करणारे रहस्य
============
भाविक श्री भीमाशंकरलाही भेट देतात आणि श्रीगणेशाचे दर्शन घेतात. गणपतीचे दर्शन घेतल्यानंतरच भीमाशंकर यात्रा पूर्ण मानली जाते. भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराची बांधणीही वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे मंदिर नागर शैलीत बांधले गेले आहे. बाजीराव प्रथम यांचे भाऊ चिमाजी अप्पा यांनी मंदिराला फेब्रुवारी 1739 मध्ये बासाईमच्या लढाईत पोर्तुगीजांचा पराभव केल्यानंतर एक मोठी घंटा दान केली. ही घंटा चिमाजी अप्पा यांनी वसई किल्ल्यावरून आणली होती. मंदिराचा सभामंडप नाना फडणवीस यांनी बांधला आहे. या सर्व मंदिराच्या सुभोशिकरणाचे काम आता सुरु करण्यात आले आहे. या मंदिरात भाविकांची वर्दळ वाढली असून येत्या श्रावण महिन्यात हजारो भाविक येथे भगवान भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी येणार आहेत. (Social News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics