Home » GuruPurnima : गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जाणून घ्या इतिहासातील प्रसिद्ध गुरु शिष्यांच्या जोड्यांबद्दल

GuruPurnima : गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जाणून घ्या इतिहासातील प्रसिद्ध गुरु शिष्यांच्या जोड्यांबद्दल

by Jyotsna Kulkarni
0 comment
GuruPurnima
Share

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥, आज आषाढ पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा असे देखील म्हटले जाते. भारतातील एक महत्त्वाचा सण महत्वाचा दिवस म्हणून गुरुपौर्णिमेची ओळख आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या रूपाने गुरु मार्गदर्शन करत असतो. अगदी आपला पहिला गुरु म्हणजे आईपासून ते शाळेतील शिक्षक, ऑफिसमधील बॉसपर्यंत सर्वच आपले गुरु असतात. कधी कधी तर काळात नकळत रस्त्यावरील, अनोळखी लोकं देखील आपल्याला काही गोष्टी शिकवून जातात. अशा या गुरूंना वंदन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. (Gurupurnima)

भारतीय संस्कृतीत गुरुला देवतुल्य स्थान देण्यात आले आहे. आपल्याला कायम ‘आचार्य देवो भव:’ची शिकवण शिकवली गेली आहे. त्यामुळेच सगळ्यांच्याच आयुष्यात गुरु हा सर्वात उच्च स्थानी असतो. गुरु शिष्य परंपरा आपल्या देशाला नवीन नाही. अतिशय प्राचीन काळापासून ही परंपरा चालत आली आहे आणि गुरु-शिष्यांचे अतूट नाते आपल्याला दिसले आहे. गुरूच्याच शिकवणीमुळे शिष्य आयुष्यात यशस्वी होतो. त्यामुळे अशा या गुरूंना कायम वंदन केलेच पाहिजे. आपण जर इतिहासात डोकावले तर इतिहासात देखील अनेक अशा गुरु-शिष्यांच्या जोड्या होऊन गेल्या ज्या आजही सर्वांसाठीच आदर्श आणि प्रेरणा देणाऱ्या ठरत आहेत. (Marathi News)

“अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजनशलाकया। चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः॥”
अर्थात अज्ञानाच्या अंधारात असलेल्या मला ज्यांनी ज्ञानाचा प्रकाश दिला अशा गुरूंना माझे वंदन. गुरु कायमचा पाळ्या शिष्याला योग्य दिशा आणि योग्य मार्गदर्शन करण्याचे काम करतो. गुरूच्याच शिकवणीमुळे शिष्य मोठा होतो आणि गुरुचे नाव देखील मोठे करतो. गुरु कायमच आपल्या शिष्याला आयुष्यात योग्य मार्गावर चालण्याचे आणि समाजहित करण्याची शिकवण देतो. मात्र आजच्या आधुनिक काळात गुरु आणि शिष्य या नात्याची व्याख्याच बदलली आहे. असे असले तरी इतिहासात अशा काही गुरु-शिष्यांच्या जोड्या होऊन गेल्या आहेत, ज्या कायम जगाच्या लक्षात राहतीलच सोबत सगळ्यांना प्रेरणा देखील देतील. आज गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने जाणून घेऊया अशा काही गुरु शिष्य जोड्यांबद्दल. (Todays Marathi Headline)

​गुरु वशिष्ठ – श्रीराम
सप्तऋषींमधील एक महत्वाचे ऋषी म्हणून वशिष्ठ ऋषींची ओळख आहे. वशिष्ठ ऋषी हे अयोध्येचे राजगुरु होते. राजा दशरथ आणि श्रीविष्णूंचा सातवा अवतार असलेल्या श्रीरामांचेही ते गुरु होते. वेद, पुराण, अस्त्र, शस्त्र आदी अनेक गोष्टींमधील सर्वोत्तम ज्ञान देऊन गुरु वशिष्ठांनी श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम, प्रचंड पराक्रमी बनवले. त्यांनी श्रीरामांना योग्य निर्णय घेण्यासाठी प्रेरित केले आणि त्यांच्यात नीतिमत्ता वाढवली. श्रीरामांसह त्यांनी त्यांचे बंधू असलेल्या लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांनाही मार्गदर्शन केले. श्रीरामांना देखील आपल्या गुरूबद्दल प्रचंड आदर आणि निष्ठा होती. गुरु वशिष्ठांच्या सल्ल्याशिवाय श्रीराम कोणतेही कार्य करत नसत. (Marathi Latest News)

GuruPurnima

​महर्षी व्यास – शुक, वैशंपायन
पुराणातील माहितीनुसार व्यास ऋषींना वेदांसोबतच अनेक पुराणांचे कर्ते म्हणून महर्षी व्यास प्रसिद्ध आहेत. व्यास ऋषींचे कार्य अतिशय महान आणि मोठे आहे. त्यांनी वेदांचे विभाजन आणि वर्गीकरण केले म्हणून त्यांना ‘वेदव्यास’ असे देखील म्हटले जाते. महाभारतातील उल्लेखावरून व्यासांनी २४,००० श्लोकांचे उपाख्यानविरहित भारत रचिले आणि त्यांचे शिष्य असलेल्या वैशंपायन यांनी त्यात आख्यानोपाख्यानादिकांची भर घालून त्याला सुमारे एक लाख श्लोकसंख्या असलेल्या सध्याच्या महाभारताचे रूप दिले. व्यासांनी त्यांच्या चार शिष्यांपैकी प्रथम शुकाला महाभारत शिकविले होते. (Marathi trending News)

​भगवान परशुराम – भीष्म, द्रोणाचार्य
विष्णूच्या अवतारांपैकी एक अवतार आणि सात चिरंजीवांपैकी एक असणारे चिरंजीव म्हणजे भगवान परशुराम. परशुराम याना शंकरांनी त्यांना शास्त्रविद्या शिकविली आणि परशू दिला होता. परशुराम धनुर्विद्येत निष्णात होते. परशुरामांनी भीष्म पितामह, द्रोणाचार्य यांना धनुर्विद्या शिकविली. नंतर द्रोणाचार्यांनी ती पुढे कर्ण आणि अर्जुन यांना शिकविली. याशिवाय कर्णाने स्वतः परशुरामांची सेवा करत अनेक विद्या शिकून घेतल्या, असेही सांगितले जाते. (TOp Marathi News)

GuruPurnima

​सांदीपनी ऋषी – श्रीकृष्ण, बलराम
श्रीविष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णांचे गुरु म्हणजे सांदीपनी ऋषी. श्रीकृष्ण आणि बलराम यांनी सांदीपनी ऋषी यांच्या आश्रमात राहून विद्या प्राप्त केली. सांदीपनी ऋषींनी श्रीकृष्णांना चौसष्ट दिवसात चौसष्ट कला शिकवल्या. उज्जैन येथे सांदीपनी ऋषींचा आश्रम आजही अस्तित्वात आहे. (TOp Marathi HEadline)

GuruPurnima

​आर्य चाणक्य – चंद्रगुप्त
आर्य चाणक्य यांना विष्णुगुप्त आणि कौटिल्य या नावांनीही ओळखले जाते. आर्य चाणक्यांनी रचलेला कौटिल्य अर्थशास्त्र हा ग्रंथ भारतीय संस्कृतीतील एक महत्वाचा ग्रंथ मानला जातो. चाणक्य यांनी २५ प्रकरणे आणि सहा हजार श्लोक असलेला हा ग्रंथ अर्थशास्त्र व राजनीतीवर लिहिलेला मानवी इतिहासातील पहिला ग्रंथ असल्याचे मानले जाते. चाणक्य यांनी ना केवळ चंद्रगुप्त तर संपूर्ण जगाला आयुष्यातील प्रत्येक लहान सहान गोष्टींसाठी मार्गदर्शन केले आहे. जुलमी नंद घराणेशाहीची राजवट संपवून सम्राट चंद्रगुप्ताला सिंहासनावर बसवण्यात त्यांचाच मुख्य सहभाग होता असे मानले जाते. आपल्या मुसद्देगिरीच्या जोरावर आर्य चाणक्य यांनी अखंड भारताचे निर्माण केल्याचे मानले जाते. (Top Stories)

GuruPurnima

समर्थ रामदास – छत्रपती शिवाजी महाराज
आज जरी या गुरु शिष्याच्या जोडीवर आज अनेक वाद आहेत. अनेक लोकं या या दोघांना गुरु शिष्य मानत नाही. मात्र ही जोडी देखील इतिहासातील प्रसिद्ध अशी गुरु शिष्य जोडी आहे. समर्थ रामदासांनी महाराजांना मोठे मार्गदर्शन केले आहे. महाराज देखील समर्थांशी सल्लामसलत करून निर्णय घ्यायचे. समर्थांनी “निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारुअखण्ड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगीयशवन्त कीर्तिवन्त, सामर्थ्यवन्त, वरदवन्तपुण्यवन्त नीतिवन्त, जाणता राजा.” अशा शब्दांमध्ये शिवरायांचे वर्णन केल्याचे आढळते. (Social Upadtes)

GuruPurnima

रमाकांत आचरेकर – सचिन तेंडुलकर
आजच्या काळातील अतिशय गाजलेली, प्रसिद्ध जोडी म्हणजे रमाकांत आचरेकर – सचिन तेंडुलकर. गुरु शिष्याच्या आदर्श जोडीचा विचार करताच सचिन तेंडुलकर आणि रमाकांत आचरेकर या जोडीचे नाव डोक्यात येते. क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या सचिनचे गुरु रमाकांत आचरेकर यांना या देवाची निर्मिती केल्याबद्दल ओळखले जाते. संपूर्ण जगात आपल्या खेळणे नावलौकिक कमावलेल्या सचिनला क्रिकेटचे धडे रमाकांत आचरेकर सरांनीच दिले. आचरेकर सरांनी विनोद कांबळीला सुद्धा क्रिकेटचे प्रशिक्षण दिले आहे. आजही शिवाजी पार्कचा एक कोना आचरेकर सरांसाठी असून तिथे त्यांचे स्मारक तयार करण्यात आले आहे. (Todays Trending News)

GuruPurnima

=============

हे ही वाचा :  Guru Purnima : गुरु शिष्य परंपरा अधोरेखित करणारी ‘गुरुपौर्णिमा’

Guru Pournima : व्यास पौर्णिमेच्या निमित्ताने जाणून घ्या महर्षी व्यास यांच्याबद्दल रंजक गोष्टी

=============

रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद
रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद या गुरू-शिष्याच्या जोडीक़डून आजही प्रेरणा घेतली जाते. १८८१ मध्ये रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांची सर्वात आधी भेट झाली होती. त्यावेळी स्वामी विवेकानंद यांचे नाव नरेंद्र असे होते. त्याभेटीत स्वामी विवेकानंद यांनी एक गाणे गायले होते. ज्या गाण्यामुळे रामकृष्ण परमहंस अतिशय प्रभावित झाले होते. (Top Stories)

GuruPurnimaLatest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.