Home » Debit Card : जाणून घ्या डेबिट कार्डचे प्रकार आणि त्याचे फायदे

Debit Card : जाणून घ्या डेबिट कार्डचे प्रकार आणि त्याचे फायदे

by Jyotsna Kulkarni
0 comment
Debit Card
Share

आजच्या काळात वावरताना प्रत्येकाला आपल्याकडे काही गोष्टी दररोज ठेवणे आवश्यक असते. यातलीच एक गोष्ट म्हणजे, डेबिट कार्ड. आज डेबिट कार्ड ही संकल्पना किंवा हा शब्द अजिबातच नवीन राहिलेला नाही. बँकेत अकाऊंट ओपन केल्यानंतर बँकेकडूनच आपल्याला डेबिट कार्ड दिले जाते. आता डेबिट कार्ड म्हटले की अनेकांना वाटते की त्याचा वापर फक्त एटीएममधून पैसे काढण्यापुरताच होतो. मात्र असे नाहीये डेबिट कार्ड वापरून आपण कॅशलेस व्यवहार देखील करू शकतो. आपल्याला बँक जे डेबिट कार्ड देते तेच एकच कार्ड आपल्याला माहित असते. मात्र या डेबिट कार्डमध्ये देखील अनेक प्रकार आहेत. (Marathi News)

आधुनिक काळात जगताना आपण पाहिले असेल की, अनेकांकडे त्याच्या पाकिटामध्ये एकापेक्षा अधिक विविध कार्ड्स ठेवलेले असतात. विविध प्रकारचे क्रेडिट कार्ड्स आणि डेबिट कार्ड्स आपल्याला दिसतात. हे पाहून नक्कीच मनात विचार येत असेल की, एवढे कार्ड्सचे हे लोकं काय करत असतील? किती श्रीमंत असतील हे लोकं यांच्याकडे एवढे कार्ड्स आहेत. आपल्याकडे तर एकच आहे. मात्र या डेबिट कार्डमध्ये देखील अनेक प्रकार आहेत, आणि विविध प्रकारचे अनेक फायदे ग्राहकांना मिळतात. आज आपण या लेखात जाणून घेऊया डेबिट कार्डचे प्रकार आणि त्याचे फायदे. (Todays Marathi HEadline)

RuPay Debit Card
हे डेबिट कार्ड मुख्यतः देशांतर्गत व्यवहार आणि कॅश काढण्यासाठी वापरले जाते. रुपी डेबिट कार्ड नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने जारी केले आहे. हे डेबिट कार्ड वापरून तुम्ही ऑनलाइन आणि किरकोळ खरेदी करू शकता. यासोबतच विविध प्रकारची बिले भरण्यासाठी देखील या कार्डचा वापर केला जाऊ शकतो. (Social Updates)

Debit Card

Gold Visa Card
या कार्डमध्ये तुम्हाला ग्लोबल कस्टमर असिस्टन्स सर्व्हिसेसचा लाभ मिळतो. गोल्ड व्हिसा कार्ड तुम्ही देशासोबतच देशाबाहेरही वापरू शकता. तुम्हाला जगभरातील रिटेल, डायनिंग आणि एंटरटेनमेंट आउटलेटवर हे कार्ड वापरताना अनेक प्रकारच्या ऑफर्स ग्राहकांना मिळतात.

Debit Card

Contactless Card
हे डेबिट कार्ड NFC (Near Field Communication) या पद्धतीचा वापर करतो. या कार्डचा वापर करून तुम्ही कार्ड स्वाइप न करता बिल भरण्यासाठी केवळ ते कार्ड मशीन जवळ नेऊन टॅप करायचे आणि बिल भरायचे. या कार्डमुळे छोटी खरेदी अधिक सुकर आणि फास्ट होते. (Top Stories)

Debit Card

Master Card 
मास्‍टर कार्ड्सचे तीन प्रकार आहेत. Standard Debit Card, Enhanced Debit Card आणि World Debit MasterCard. ज्यावेळी तुम्ही अकाऊंट उघडण्यासाठी जाता तेव्हा तुम्हाला बँकेकडून स्टँडर्ड डेबिट कार्ड दिले जाते. तुम्ही ते जगभरात वापरू शकता. (Top Marathi Headline)

Debit Card

Classic Debit Card
क्लासिक कार्ड हे बेसिक डेबिट कार्ड आहे. या कार्डमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या कस्टमर सर्व्हिसेस मिळतात. तुम्ही तुमचे कार्ड कधीही बदलू शकता. या कार्डच्या मदतीने तुम्ही इमरजेंसी परिस्थितीत अडव्हान्स रक्कमही काढू शकता. (LAtest Marathi News)

Debit Card

Prepaid Card
हे कार्ड त्या लोकांसाठी खूपच उपयुक्त आहे, ज्यांना आपला खर्च मर्यादित ठेवायचा असतो. यासाठी या कार्डवर आधीच ठरलेली रक्कम जमा करावी लागते. नंतरच तुम्ही कार्डचा वापर करून त्या रक्कमेतून खर्च करू शकता. (Top Trending News)

Debit Card

Platinum Card
तुम्ही हे कार्ड जागतिक स्तरावर देखील वापरू शकता. यामध्ये तुम्हाला कॅश डिस्बर्समेंटपासून ते ग्लोबल एटीएम नेटवर्कपर्यंत सुविधा मिळतात. याशिवाय मेडिकल, लीगल रेफरल आणि असिस्टेंस सुद्धा यावर उपलब्ध असतात. या कार्डद्वारे अनेक प्रकारच्या डील, डिस्काउंट ऑफर आणि इतर सुविधांचा लाभ घेता येतो. (Top Marathi Stories)

Debit Card

=============

हे ही वाचा : Ujjain : उज्जैनमधील या मंदिरात मृत्यू मागायला येतात लोक

=============

Titanium Card
टायटॅनियम कार्डमधील क्रेडिट मर्यादा प्लॅटिनम कार्डपेक्षा जास्त आहे. हे सामान्यतः चांगला क्रेडिट स्कोअर आणि जास्त उत्पन्न असलेल्या ग्राहकांना बँकेकडून दिलं जातं.

Debit Card

Signature Card
विमानतळ लाउंज प्रवेशासह इतर अनेक सेवासिग्नेचर कार्डमध्ये दिल्या जातात.

Debit Card

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.