Home » World Luckiest Man : तो सात वेळा मरणाच्या दारात होता.. पण वाचला कसा ?

World Luckiest Man : तो सात वेळा मरणाच्या दारात होता.. पण वाचला कसा ?

by Team Gajawaja
0 comment
World Luckiest Man
Share

नुकताच झालेला अहमदाबाद विमान अपघात सगळीकडे चर्चा आणि चिंता दोन्हीचा विषय ठरला. दुर्दैवाने यात २४१ जणांचा मृत्य झाला पण सुदैवाने यात विश्वासकुमार रमेश नावाचा एकमेव माणूस जिवंत राहिला. आणि मग सगळीकडे त्याच्या नशिबाची चर्चा होऊ लागली , भाई नशीब असावं तर या पट्ठ्यासारखं!पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल कि विश्वासकुमार सारखाच किंबहुना त्याहीपेक्षा खूप नशीबवान माणूस या जगात आहे जो तब्बल ७ वेळा मरणाच्या दारातून बाहेर आलाय. या माणसाचं नाव फ्रेन सेलाक ज्याला ‘द वर्ल्ड्स लकीएस्ट अनलकी मॅन’ असं म्हटलं जात. पण असं नेमकं का ? त्याच्यासोबत घडलेल्या त्या ७ गोष्टी,ते ७ अपघात कोणते? जाणून घेऊ. (World Luckiest Man)

आपल्यातल्या अनेकांचं बालपण डब्ल्यूडब्ल्यूई बघण्यात गेलं आहे. यात अंडरटेकर माहित नसावा, असा एकही व्यक्ती नसेल. लहानपणी त्याच्याबद्दल एक अफवा होती की, अंडरटेकर सात वेळा मेलाय आणि परत जिवंत झालाय… आता ही जरी फिक्शनल स्टोरी असली, तरी फ्रेन सेलाकसोबत असच काहीतरी घडलं होत आणि तो सात वेळा मरण्यापासून वाचलाय.. वयाच्या ३२ व्या वर्षांपासून त्याची ही वाचण्याची मालिका सुरु झाली होती. सर्वात पहिलं १९६२ साली अचानक एक दिवशी तो मोठ्या अपघातातून वाचला. जेव्हा तो साराजेव्होहून ड्युरब्रॉविककडे जाणाऱ्या ट्रेनने प्रवास करत होता. थंड हिवाळ्याची रात्र होती. ट्रेन एका खडकाळ पुलावरून जात होती मात्र तेवढयातच अचानक ती ट्रेन रुळावरून घसरली आणि थेट बर्फाळ नदीत कोसळली. या भीषण अपघातात १७ प्रवासी बुडून मरण पावले. पण फ्रेन सेलाक मात्र नदीतून पोहत पोहत बाहेर आला . त्याचा फक्त हात फ्रॅक्चर झाला होता आणि काही तास तो बर्फात अडकून पडला होता. पण तो वाचला पण त्यानंतर त्याच्या नशिबाचा हा लपंडाव सुरूच झाला. (Top Stories)

World Luckiest Man

त्यानंतर लगेचच एका वर्षानंतर, १९६३ मध्ये फ्रेनने पहिल्यांदाच विमान प्रवास करण्याचं ठरवलं. झाग्रेबहून रीयेका शहराकडे जाताना त्याने विमान पकडलं खरं पण विमान उंचावर असताना technical issue मुळे अचानक विमानाचा एक दरवाजा उघडला आणि जवळच बसलेला फ्रेन थेट विमानाबाहेर फेकला गेला ! सगळ्यांना वाटलं की यातून फ्रेन वाचणं निव्वळ अशक्य आहे. पण नाही ! नियतीची त्याला अशी काही साथ होती कि फ्रेन खाली पडला खरा पण तो एका गवताच्या ढिगाऱ्यावर पडला आणि या अपघातातून वाचला. त्याला थोडीफार दुखापत झालीसुद्धा पण ते विमान पुढे जाऊन क्रॅश झालं आणि त्या विमानातून पडलेली १९ लोकं मरण पावली तरी फ्रेन मात्र जिवंत होता. त्याला काही किरकोळ दुखापती झाल्या.पण विचार करा आकाशातून खाली पडूनही तो माणूस जगला ! (World Luckiest Man)

पुढे १९६६ मध्ये फ्रेनसोबत अजून एक घटना घडली जी थोडीफार पहिल्या घटनेशी मिळती जुळती होती. तेव्हा फ्रेन बसने प्रवास करत होता. पण बसच्या चालकाचा ताबा सुटला आणि बस थेट खोल नदीत कोसळली. यामध्ये चार प्रवासी बुडून मरण पावले. पण फ्रेन मात्र पोहत पोहत नदीच्या काठावर पोहोचला आणि काही किरकोळ जखमा होऊन वाचला. त्यानंतर काही वर्षांनी म्हणजे १९७० मध्ये, फ्रेन स्वतःच्या गाडीतून प्रवास करत होता. पण अचानक त्याच्या गाडीच्या इंजिनने पेट घेतलं आणि आगीचे लोट थेट गाडीत शिरायला लागले. यामध्ये फ्रेनचे सगळे केस जळून गेले, पण त्याने गाडीतून उडी मारल्यामुळे तो वाचला आणि काही क्षणातच गाडीचा स्फोट झाला. पण मृत्यू त्याला स्पर्श करू शकला नाही.

मात्र १९७३ मध्ये, फ्रेनच्या दुसऱ्या गाडीला परत आग लागली. यावेळी मात्र त्याच नशीब त्याच्या बाजूने नव्हतं. कारण जेव्हा कारला आग लागली तेव्हा त्याला काही कळलंच नाही. कारण ती आग इंजिनला लागली होती. यावेळेलाही गाडीने जोरात पेट घेतला. मात्र तो पुन्हा वाचला. दरम्यान साधारण २०-२२ वर्षांचा काळ लोटला सर्वकाही नीट, शांत सुरु होत पण अचानक १९९५ मध्ये, झाग्रेब शहरात साधं रस्त्यावरून चालत असताना सिटी बसने फ्रेनला जोरात धडक दिली आणि यावेळीही त्याला फक्त किरकोळ दुखापत झाली. (World Luckiest Man)

================

हे देखील वाचा :Wajid Ali Shah : ‘एक कलाप्रेमी राजा : वाजिद अली शाह’, पण या कारणास्तव राहिला चर्चेत 

================

पण सगळ्यात थरारक प्रसंग घडला १९९६ मध्ये. फ्रेन एका Mountain roadवर गाडी चालवत होता. यावेळी समोरून एक मोठा ट्रक जोरात आला. फ्रेनने ताबडतोब स्टेअरिंग वळवलं, पण गाडी गार्डरेल तोडून खोल दरीत कोसळली. गाडी कोसळताना फ्रेन गाडीतून थेट बाहेर फेकला गेला त्यावेळी त्याची गाडी ३०० फूट खाली गेली असं सांगितलं जातं पण तेव्हाही फ्रेन एका झाडाच्या फांदीवर अडकला. खाली त्याच्या गाडीचा खाली स्फोट झाला, पण तो मात्र झाडावरून खाली उतरून वाचला. हा प्रसंग तर लोकांना आजही अचंबित करतो. इतक्या सगळ्या जीवघेण्या भीषण अपघातांनंतर, त्याच आयुष्य थोडं नॉर्मल झालं होत पण त्याच्या नशीबात त्याच्यासाठी अजून एक सरप्राईज होतं. २००३ मध्ये, फ्रेनने एक लॉटरी तिकीट घेतलं आणि आश्चर्य म्हणजे, तो ९ लाख युरो म्हणजे सुमारे ७ कोटी रुपये जिंकला! जगातील सर्वात दुर्दैवी माणूस अखेर करोडपती झाला. त्याच्या आयुष्यात फायनल डेस्टीनेशन काही आलाच नाही. (World Luckiest Man)

इतक्या अपघातांमधून वाचल्यानंतर फ्रेनला असं वाटलं की, आता जगण्याची खरी मजा घ्यायची. त्याने घर घेतलं, बोट घेतली, ऐशारामी जीवन जगलं. पण काही वर्षातच २०१० साली त्याने आपली सगळी संपत्ती कुटुंबीयांना आणि मित्रांना देऊन टाकली, कारण त्याच्या मते, पैशाने खर सुख मिळत नाही.आणि अखेर २०१६ साली त्याचा मृत्यू झाला.आता फ्रेन सेलाकला काही लोक जगातील सर्वात नशीबवान माणूस म्हणतात, तर काहीजण त्याला सगळ्यात unlucky माणूस म्हणतात. पण स्वतः फ्रेनचं म्हणणं होतं “मी फक्त एक असा माणूस आहे ज्याचं आयुष्य खूप विचित्र होतं.”

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.