Home » Alia Bhatt : आलिया भट्टला जवळच्या व्यक्तीनेच घातला तब्बल ७७ लाखांचा गंडा

Alia Bhatt : आलिया भट्टला जवळच्या व्यक्तीनेच घातला तब्बल ७७ लाखांचा गंडा

by Jyotsna Kulkarni
0 comment
Alia Bhatt
Share

आलिया भट्ट बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती नेहमीच विविध कारणांमुळे मीडियामध्ये चर्चेत असते. मात्र आता आलिया ज्या कारणामुळे चर्चेत आली आहे ते कारण धक्कादायक आहे. झाले असे की, आलियाला तिच्या अतिशय जवळच्या व्यक्तीनेच तब्बल ७७ लाखांना गंडवले आहे. ही बातमी माध्यमांमध्ये येताच एकच खळबळ उडाली आहे. आलिया भट्टला तिची पर्सनल असिस्टंट असलेल्या वेदिका प्रकाश शेट्टीनेच हा एवढा मोठा धोका दिला आहे. याबद्दल आलिया आणि तिच्या जवळच्या लोकांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत तिला अटक केली आहे. (Alia Bhatt News)

आलिया भट्टची माजी वैयक्तिक सहाय्यक वेदिका प्रकाश हिला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. वेदिकावर आलियाची ७७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. एका मोठ्या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, वेदिकाने मागील २ वर्षांपासून आलियाच्या वैयक्तिक आणि तिच्या प्रॉडक्शन हाऊसच्या खात्यांमधून लाखो रुपये लुटले आहेत. तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस वैदिकांचा शोध घेत होते. आता सुमारे ५ महिन्यांनंतर वेदिका सापडली असून, मुंबई पोलिसांनी तिला बंगळुरू येथून अटक केली आहे. वेदिका १० जुलैपर्यंत पोलिस कोठडीत राहील. (Marathi News)

३२ वर्षीय वेदिका प्रकाश शेट्टी ही मागील काही वर्षांपासून आलिया भट्टची वैयक्तिक व्यवस्थापक अर्थात सेक्रेटरी म्हणून काम पाहत होती. वेदिकाने मे २०२२ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत आलियासोबत काम केले. याकाळात तिने आलियाच्या वैयक्तिक आणि Eternal Sunshine Productions Pvt Ltd या प्रोडक्शन हाऊसशी संबंधित सर्व व्यवहार हाताळले. मात्र तिने तिच्या या पदाचा गैरवापर केला आणि गेल्या काही महिन्यांपासून खोटी बिलं सादर करून आणि बनावट सह्यांद्वारे वेदिकाने आलियाच्या कंपनी आणि वैयक्तिक खात्यांतून पैसे काढले. बनावट बिलांच्या माध्यमातून आलियाच्या प्रॉडक्शन हाऊस आणि वैयक्तिक खात्यातून ७७ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. (Todays Marathi HEadline)

Alia Bhatt

आलिया भट्टची आई आणि Eternal Sunshine Productions प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक सोनी राजदान यांनी २३ जानेवारी रोजी मुंबईतील जुहू पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यावेळी हे संपूर्ण प्रकरण समोर आले होते. सोनी यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या कलम ३१६(4) (गुन्हेगारी विश्वासघात) आणि ३१८(4) (फसवणूक) अंतर्गत वेदिकावर गुन्हा दाखल केला आहे. तेव्हापासून तिचा शोध सुरू होता. (Celebrity News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आलिया भट्टसोबत काम करताना वेदिकाला आलियाच्या आर्थिक जबाबदाऱ्या देखील देण्यात आल्या होत्या. एकत्र काम करताना वेदिकाने आलियाकडून अनेक बनावट कागदपत्रांवर तिच्या सह्या करून घेतल्या. वेदिका ट्रॅव्हलिंग, शो, विविध मिटींग्स आदी गोष्टींच्या खर्चाशी संबंधित बनावट पावत्या बनवत असे, ज्यासाठी ती ऑनलाइन इमेजिंग अॅप्स वापरत असे. वेदिकाने तिच्या मित्रांनाही या पैशांच्या व्यवहारात सहभागी करून घेतले होते. (Bollywood News)

वेदिका प्रकाश मुंबईतील एनजी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये राहते. २०२४ मध्ये तिला वैयक्तिक व्यवस्थापक पदावरून काढून टाकण्यात आले होते. आलिया व्यतिरिक्त, वेदिकाने अनेक कलाकारांसाठी सेक्रेटरी म्हणून काम केले आहे. सध्या या प्रकरणी आलिया आणि तिच्या टीमकडून कोणतेही विधान आलेलं नाही आणि आता पोलिस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहेत. आलियाने २०२१ मध्ये Eternal Sunshine Production प्रायव्हेट लिमिटेड हे प्रॉडक्शन हाऊस सुरू केले. शाहरुखच्या रेड चिली प्रॉडक्शनच्या सहकार्याने, या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली, आलियाने डार्लिंग्ज हा चित्रपट तयार केला आहे, ज्यामध्ये ती आणि शेफाली शाह मुख्य भूमिकेत होती. (Marathi Latest News)

=============

हे ही वाचा : Mamdani VS Trump : ममदानीविरोधात ट्रम्पनी थोपटले दंड !

Raja Charles : राजघराण्याच्या परंपरेसाठी जनतेचा खिसा खाली !

=============

दरम्यान आलिया भट्टच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, सध्या आलिया आगामी ‘अल्फा’ सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा येत्या २५ डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात आलियासोबत अभिनेत्री शर्वरी वाघ देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच आलिया रणबीर कपूरसोबत दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांच्या ‘लव एंड वॉर’ सिनेमात झळकणार आहे. याशिवाय आलिया अजून काही सिनेमांच्या माध्यमातून देखील चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.