Home » Guru Pournima : व्यास पौर्णिमेच्या निमित्ताने जाणून घ्या महर्षी व्यास यांच्याबद्दल रंजक गोष्टी

Guru Pournima : व्यास पौर्णिमेच्या निमित्ताने जाणून घ्या महर्षी व्यास यांच्याबद्दल रंजक गोष्टी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Guru Pournima
Share

उद्या सर्वत्र गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मातील अतिशय श्रेष्ठ असे महर्षी व्यास यांचा जन्म आषाढ महिन्यातील पौर्णिमेला झाला होता. त्याच निमित्ताने यादिवशी गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यातील गुरुतुल्य असणाऱ्या व्यक्तीप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करते. आपल्या गुरुची पूजा करून त्यांनी दिलेल्या ज्ञानाबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले जातात आणि गुरूंना नमस्कर केला जातो. गुरु आणि शिष्य यांचे नाते दर्शवणारा हा दिवस महत्वाचा समजला जातो. (Maharshi Vyas)

आषाढ पौर्णिमेला महर्षी व्यास यांचा जन्मदिन असतो आणि म्हणूनच या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी करण्याची प्रथा रूढ झाली. मात्र महर्षी व्यास यांच्याबद्दल जास्त माहिती कदाचित खूप कमी जणांना असेल. महर्षी व्यास यांनी महाभारत हा ग्रंथ लिहिला एवढेच अनेकांना माहित असेल. मात्र यापेक्षा अधिक कार्य त्यांनी केले आहे. त्यांना हिंदू धर्मातील महान ऋषी म्हणून देखील संबोधले जाते. आज आपण महर्षी व्यास आणि त्यांच्या कार्याबद्दल यांच्याबद्दल जाणून घेऊया. (Marathi News)

आपल्या पुराणानुसार इ.स.पू. ३००० च्या सुमारे आषाढ महिन्याच्या शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी महर्षि वेद व्यास यांचा जन्म झाला होता. महर्षि वेद व्यास अत्यंत ज्ञानी, तेजस्वी आणि महान ऋषी होते. त्यांना चारही वेदांचे पूर्ण ज्ञान होते. म्हणूनच त्यांना वेद व्यास म्हटले गेले. याशिवाय महर्षी व्यास यांना अनेक नावानी ओळखले जायचे. व्यास शब्दाची व्युत्पत्ती आहे – ‘विशदं करोति इति व्यासः ।’ म्हणजे विषय विशद करतो तो ‘व्यास’ अशी आहे. वर्णाने काळे म्हणून व्यास ऋषींना ‘कृष्ण’ म्हणत; तर द्वीपात (बेटावर) जन्मले म्हणून त्यांना ‘द्वैपायन’ म्हटले जायचे. (Todays Marathi HEadline)

Guru Pournima

‘कृष्णद्वैपायन’ असेही जोडनाव पुढे रूढ झाले होते. व्यासांना ‘वेदान् विव्यास’ म्हणजे वेदांचे विभाग केले, म्हणून त्यांना ‘व्यास’ असे म्हटले गेले. पराशरपुत्र म्हणून त्यांना ‘पाराशर्य’ देखील म्हणत. व्यासांचा उल्लेख करतांना ‘भगवान व्यास’ असे म्हणण्याचा विद्वज्जनांत परिपाठ आहे. ब्रह्मज्ञानाचा निधी असणारे व्यास हे विष्णूचे रूप आहेत आणि विष्णू हा व्यासाचे रूप आहे. वसिष्ठ मुनी यांचा मुलगा शक्ती व शक्तीचा मुलगा पराशर आणि पराशरांचा मुलगा व्यास. (Top Marathi Headline)

पौराणिक कथांनुसार, प्राचीन काळी महर्षि पराशर ऋषी एका नदीतून प्रवास करत असताना त्यांना एक स्त्री दिसली. तीचे नाव सत्यवती ऊर्फ मत्स्यगंधा होते. ती एका मासे पकडणाऱ्या कोळ्याची मुलगी होती. मत्स्यगंधा दिसायला फारच सुंदर आणि आकर्षक होती. मात्र तिच्या शरीराला कायमच माशांचा गंध येई, म्हणून सत्यवतीला ‘मत्स्यगंधा’. म्हणून ओळखले जायचे. (Today’s Trending News)

एकदा पराशर ऋषि गंगा पार करण्यासाठी गंगातटावर आले. तटावर एक कोळी होता. परशारांनी कोळ्याला गंगापार करून देण्यास सांगितले. कोळ्याने आपली कन्या मत्स्यगंधा हिला पराशरांना गंगापार नेण्यास सांगितले. त्यावेळी मत्स्यगंधा केवळ सात वर्षाची बालिका होती. मुलीने गंगापार करण्यासाठी ऋषींना नावेत बसवून नाव चालू केली. नाव मध्यात आल्यावर तपस्वी ऋषींचे मन बहकले आणि त्यांनी त्या सात वर्षाच्या मुलीपाशी संभोगाची इच्छा व्यक्त केली. मुलगी सुद्धा फार धूर्त होती. (Top Marathi News)

तिने ऋषींना सांगितले की ती केवळ सातच वर्षाची असल्यामुळे ऋषी तिच्याशी संभोग कसा काय करू शकतील? तर त्यांनी तिचे शरीर पूर्ण षोडशवर्षीय करावे. ऋषींनी तिचे म्हणणे मान्य करून त्या सात वर्षाच्या मुलीला सोळा वर्षाची बनविले. तेव्हा ऋषि त्या युवती मत्स्यगंधेकडून कामतृप्ती करू इच्छिते झाले. परंतु तो दिवसाचा समय होता आणि मुलगी असली म्हणून काय झाले? तिच्या ठायी शालीनता व स्त्रीसुलभ लज्जा होतीच! तिची दिवसाढवळ्या संभोगाला तयारी नव्हती. पण ऋषीतर कामातुर झालेले असल्यामुळे अधिक धीर धरायला तयार नव्हते. “कामातुराणां न भयं न लज्जा।” तेव्हा ऋषींनी त्या दोघांभोवती घनदाट धुके म्हणजे धूम्र वायुमंडल उत्पन्न केले. एवढे गडद की जवळपासचे काहीच दिसत नव्हते. नंतर पराशराने मत्स्यगंधेशी संभोग केला व जो पुत्र प्राप्त झाला त्याचे नाव व्यास असे ठेवण्यात आले. (Latest Marathi NEws)

Guru Pournima

महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात, त्या ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा घेतू’ असे म्हणून सुरुवात केली. (Marathi Headline)

प्रत्येक द्वापारयुगामध्ये व्यासांच्या रूपाने विष्णूने अवतार घेऊन वेदांचे विभाग सादर केले. पहिल्या द्वापारयुगामध्ये स्वतः ब्रह्म वेद व्यास झाले, दुसऱ्यात प्रजापती, तिसऱ्या द्वापारयुगामध्ये शुक्राचार्य आणि चौथ्या युगात बृहस्पति वेदव्यास झाले. त्याचप्रमाणे सूर्य, मृत्यू, इंद्र, धनंजय, कृष्ण द्वैपायन, अश्वत्थामा इत्यादी अठ्ठावीस वेदव्यास झाले. अशा प्रकारे अठ्ठावीस वेळा वेदांचे विभाजन झाले. पाराशर व्यासांनी अठरा पुराणांची रचना केली, असे मानले जाते. (Top Stories)

ऋषी पराशर आणि निषाद कन्या सत्यवती यांचे पुत्र महर्षि वेद व्यास जन्माला येताच तरुण झाले. वेद व्यास एक पदवी आहे. या कल्पातील ते २८ वे वेद व्यासजी होते. श्रीमद् भागवत पुराणात वर्णन केलेल्या भगवान विष्णूच्या २४ अवतारांपैकी महर्षि वेद व्यास यांचे नाव देखील यात आहे. शास्त्रात नमूद केलेले अष्ट चिरंजीवी (8 अजरामर लोक) यापैंकी महर्षि वेद व्यास हे देखील एक आहेत, म्हणून ते आजही जिवंत असल्याचे मानले जातात. सत्यवतीच्या सांगण्यावरून वेद व्यास यांनी विचित्रवीर्य यांची पत्नी अंबालिका आणि अंबिका यांना आपल्या सामर्थ्याने धृतराष्ट्र आणि पांडू नावाचे पुत्र दिले आणि दासीच्या वतीने विदुर यांचा जन्म झाला. (Marathi Top Stories)

Guru Pournima

या तीन मुलांपैकी, जेव्हा धृतराष्ट्राला पुत्र नव्हता, तेव्हा वेद व्यासांच्या कृपेने ९९ पुत्र आणि एक मुलगी त्यांना प्राप्त झाली. महाभारताच्या शेवटी, जेव्हा अश्वत्मांनी ब्रह्मास्त्र सोडले, तेव्हा वेद व्यासांनी त्याला ब्रह्मास्त्र परत घेण्याची विनंती केली. पण अश्वत्थामाला ते परत कसे घ्यायचे हे माहित नव्हते, म्हणून त्याने ते शस्त्र अभिमन्यूची पत्नी उत्तराच्या गर्भाशयात टाकले. या गंभीर पापामुळे श्रीकृष्णाने त्यांना ३००० वर्षे कुष्ठरोगी म्हणून भटकण्याचा शाप दिला, ज्याला वेद व्यास देखील मान्य करतात. महर्षि वेद व्यास यांनी महाभारताचे युद्ध पाहण्यासाठी संजयला एक दिव्य दृष्टी दिली होती, त्यामुळे संजयने राजवाड्यातच राहून धृतराष्ट्राला संपूर्ण युद्ध सांगितले. (Latest Trending News)

पृथ्वीचा जगातील पहिला भौगोलिक नकाशा महाभारताचे लेखक महर्षि वेद व्यास यांनी बनविला होता. कृष्णा द्वैपायन वेद व्यासाच्या पत्नीचे नाव अरुणी होते, त्यांना एक महान बाल-योगी मुलगा शुकदेव होता. वेद व्यासांना ४ थोर शिष्य होते ज्यांना त्यांनी वेद शिकवले – मुनि पैल यांना ॠग्वेद, वैशंपायन यांना यजुर्वेद , जैमिनी यांना सामवेद आणि सुमंतू यांना अथर्ववेद शिकवले होते. कलियुगचा वाढता प्रभाव महर्षि वेद व्यासांनी पाहिल्यावर त्यांनी पांडवांना स्वर्गात जाण्याचा सल्ला दिला. गणेशाने देखील महर्षि वेद व्यास यांच्या सांगण्यावरूनच महाभारत लिहिले होते. (Marathi Top News)

=============

हे ही वाचा :  Guru Purnima : गुरु शिष्य परंपरा अधोरेखित करणारी ‘गुरुपौर्णिमा’

=============

एका आख्यायिकेनुसार एकदा वेद व्यास धृतराष्ट्र आणि गांधारीला जंगलात भेटायला गेले होते, त्यावेळी युधिष्ठिर तेथे होते. धृतराष्ट्राने व्यास यांना त्यांचे मृत नातेवाईक आणि स्वजनांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा महर्षी व्यास सर्वांना गंगेच्या काठावर घेऊन गेले. तेथे महर्षी व्यास यांनी दिवंगत योद्धांना बोलावले. थोड्या वेळाने भीष्म आणि द्रोणासमवेत दोन्ही बाजूचे योद्धे पाण्यातून बाहेर आले. त्या सर्वांनी रात्री आपल्या पूर्वीच्या नातेवाईकांना भेट दिली आणि सूर्योदयाच्या अगोदर पुन्हा गंगेमध्ये प्रवेश केला आणि ते दिव्य लोकात निघून गेले. (Social Updates)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.