इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना गमवल्यानंतर सगळ्यांचेच लक्ष दुसऱ्या कसोटीकडे लागले होते. भारताने दुसऱ्या कसोटी सामन्याची सुरुवात जबरदस्त केली आणि याचे फळ अखेर त्यांना मिळाले. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने तब्बल ३३६ धावांनी विजय मिळवला. यासह गेल्या ५८ वर्षात भारताच्या टेस्ट संघाने पहिल्यांदाच एजबेस्टन स्टेडियमवर हा विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. शुभमन गिलने पहिल्या डावात २६९ धावा आणि दुसऱ्या डावात १६१ धावा केल्या. मात्र या सामन्याचा हिरो ठरला भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज आकाश दीप. आकाश दीपने देखील या सामन्यात चमकदार कामगिरी केली. (Akashdeep)
या टेस्टद्वारे टीम इंडियात पुनरागमन करणाऱ्या आकाश दीपने या मॅचमध्ये १० विकेट घेऊन इतिहास रचला आहे. टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयाचा खरा शिल्पकार ठरला आकाशदीप. त्याने शेवटच्या इनिंगमध्ये इंग्लंडच्या ६ विकेट घेतल्या आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयानंतर गोलंदाज आकाशदीप मैदानावर चांगलाच भावुक झाला. सामन्यनंतर बोलताना त्याने या ऐतिहासिक विजयाचे श्रेय त्याच्या आयुष्यातील अत्यंत जवळच्या व्यक्तीला दिले. याबद्दल बोलताना तो त्याचे अश्रू रोखू शकला नाही. (Marathi News)
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टेस्ट सामन्यात जसप्रीत बुमराहला वर्कलोड मॅनेजमेंटमुळे प्लेईंग ११ मध्ये स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे आकाशदीपला दुसऱ्या सामन्याकरता टीम इंडियात संधी मिळाली आणि या संधीचे त्याने सोने करून दाखवले. आकाशने पहिल्या इनिंगमध्ये ४ तर दुसऱ्या इनिंगमध्ये ६ अशा इंग्लंडच्या एकूण १० विकेट घेतल्या. इंग्लंडमध्ये एका टेस्ट सामन्यात १० विकेट घेणारा आकाशदीप हा भारताचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. (Todays Marathi News)
आकाशदीपने टीम इंडियातील सीनियर खेळाडू असलेल्या चेतेश्वर पुजारासोबत एका मुलाखतीमध्ये भावुक होत त्याच्या यशाबद्दल भावना व्यक्त केल्या. आकाश विजयानंतर बोलताना म्हणाला की, “मागच्या दोन महिन्यांपासून माझ्या बहिणी कॅन्सरशी झुंज देत आहे. मॅच दरम्यान मला सतत तिची आठवण येत होती. मी अजूनपर्यंत कोणालाही हे सांगितले नाही. मात्र आज मी हा विजय माझ्या बहिणीला समर्पित करतो. मागच्या दोन महिन्यांपासून ती कॅन्सरने ग्रस्त आहे. ती या आजारपणामुळे मानसिक तणावात होती, मात्र आज हा सामना बघून तिला नक्कीच आनंद झाला असेल.” (Top Trending News)
आकाशदीप पुढे म्हणाला, “सध्या बहिणीची तब्येत थोडी ठिक आहे. तिची तब्येत थोडी ठीक आणि स्थिर असल्याचा आम्हाला आनंद आहे. माझ्या आजच्या खेळणे ती नक्कीच आनंदी झाली असेल. मागच्या दोन महिन्यात मानसिक दृष्टया तिने बरच काही सहन केलय. मी मैदानावर जेव्हा केव्हा चेंडू पकडायचो, तेव्हा माझ्या नजरेसमोर तिचा चेहरा यायचा. मला तिच्या चेहऱ्यावर आनंद आणायचा होता. जो आजच्या नक्कीच आला असेल.” यावेळी आकाशदीप भावुक झाल्याचे सर्वांना पाहायला मिळाले. (Latest Marathi News)
दरम्यान आकाशदीपबद्दल सांगायचे झाले तर तो, मूळचा बिहारच्या सासाराम शहरातील रहिवासी असून त्याने एका मुलाखतीमध्ये त्याच्या संघर्षाबद्दल सांगितले होते. तो म्हणाला होता की त्याच्या वडिलांचा त्याच्या क्रिकेट खेळण्याला मोठा विरोध होता. त्याच्या वडिलांच्या दृष्टीने क्रिकेट खेळणे म्हणजे गुन्हा होता. त्याला या परिस्थितीमुळे त्याचे क्रिकेटमध्ये भवितव्य दिसतच नव्हते. तो वडिलांना लपून क्रिकेट खेळायचा. मात्र २०१५ साली अर्धांगवायूमुळे आकाशच्या वडिलांचे निधन झाले आणि त्याचवर्षी वाराणसीतील एका रुग्णालयात आकाशच्या मोठ्या भावाचे सुद्धा निधन झाले. (Top Stories)
========
हे देखील वाचा : MS Dhoni : लोकप्रियतेसोबतच कमाईच्या बाबतीतही आहे धोनी ‘सुपरकिंग’
========
या अतिशय कठीण काळात आकाश ३ वर्ष क्रिकेटपासून दूर राहिला. मात्र नंतर त्याने दुर्गापुर (बंगाल) मध्ये आल्यावर पुन्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी चांगली होऊ लागली. हळूहळू त्याच्या खेळाच्या चर्चा होऊ लागल्या आणि अशातच त्याला भारतीय संघात स्थान मिळाले. २०२४ मध्ये इंग्लंड विरुद्ध आकाशदीपने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत ८ सामने आणि ११ इनिंगमध्ये एकूण २५ विकेट घेतल्या असून ८९ धावा केल्या आहेत. आकाशदीपने आतापर्यंत ३८ फर्स्ट-क्लास करिअरमध्ये १२८ विकेट घेतले आहेत. (Social Updates)