पावसाळा सुरु झाला की, सगळ्यानांच आनंद होती. मनुष्यापासून निसर्गापर्यंत सर्वच पावसाची आतुरतेने वाट बघत असतात. असा हा सगळ्यांचा आवडता पाऊस येताना सोबत भरपूर आनंद घेऊन येत असला तरी अनेक आजार देखील घेऊन येतो. पावसाळ्यात वातावरण थंड आणि दमट असते. शिवाय सूर्य देवाचे दर्शन देखील दुर्लभ असते त्यामुळे सगळीकडे केवळ मळभ असते. यामुळे अनेक आजार डोके वर काढतात. पावसाळ्याची नुसती चाहूल लागली तरी डॉक्टरांचे दवाखाने आपल्याला भरलेले दिसायला लागतात. त्यामुळेच पावसाळ्यात आपल्या आरोग्याची नीट काळजी घेणे अत्यावश्यक असते. यासाठी योग्य खानपान गरजेचे असते. (Health)
या ऋतूमध्ये होणारा अतिशय सामान्य आजार म्हणजे सर्दी आणि खोकला. वातावरणात थोडा जरी बदल झाला तरी अनेकांना लगेच सर्दी खोकला होतो. काहींना तरी पावसाळ्यात अनेकदा हा त्रास होताना दिसतो. प्रत्येक वेळेस या केवळ सर्दी खोकल्यासाठी कुठे डॉक्टरकडे जावे असे अनेकांचे मत असते. त्यामुळे काही जणं तर घरगुती उपाय शोधतात आणि बरे होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तुमच्या सर्दी, खोकला आणि घसा खवखव यावर घरगुती अतिशय सोपे आणि साधे उपाय सांगणार आहोत. (Marathi News)
हळदीचे दूध
पावसाळ्यात नियमितपणे हळदीचे दूध पिणं फायदेशीर असते. हळद गरम असण्यासोबतच हळदीमध्ये अँटीबायोटिक गुणधर्म असतात. पावसाळ्यात रोज रात्री झोपण्यापूर्वी जर हळदीचे दूध घेतले तर सर्दी, खोकला आणि वायरल फ्लूपासून बचाव होतो.
मिठाच्या पाण्याच्या गुळण्या
मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्याने घशातील अनेक छोटी-मोठी दुखणी नाहीशी होऊन त्वरित आराम मिळतो. एक ग्लास पाणी कोमट पाण्यात मीठ घालून त्याने गुळण्या केल्यास घशाला आराम मिळतो. दिवसातून दोन-तीन वेळा मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्यास घशाला त्वरित आराम मिळतो. (Todays Marathi HEadline)
मधाचे सेवन
घसा खवखवणे किंवा कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन असल्यास मधाचे सेवन करावे. मधामध्ये अँटिबायोटिक गुणधर्म असतात जे घसादुखी, खोकला आणि सर्दीपासून आराम देतात. मधामुळे घसा खवखवणे आणि सूज यांमध्येही आराम मिळतो.
चवनप्राशचे सेवन
बदलत्या मोसमात विशेषत: पावसाळ्यात आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. पावसाळ्यात चवनप्राशचे सेवन करा. आयुर्वेदामध्ये चवनप्राश एक उपयुक्त औषधी आहे, जे तुमचं इ्नफेक्शनपासून संरक्षण करतं. रोज रात्री दूधासोबत चवनप्राश खावं. याचा लाभ होईल. (Social Updates)
गरम पाण्याची वाफ
पावसाळ्यात जर तुम्हाला सर्दी-पडश्यासारखे आजार झाले तर गरम पाण्याची वाफ घेणे हा उत्तम घरगुती उपाय आहे. वाफ घेतल्याने बंद नाक खुलं होईल. याशिवाय नाक आणि घश्यातील सूजही कमी होण्यास मदत होईल. वाफ घेतल्याने कफपासूनही सूटका होईल. (Marathi Latest News)
योग्य आहार
पावसाळ्याच्या दिवसात बाहेरचे अन्न खाणे टाळावे. बाहेरच्या अन्नामुळे व्हायरल इन्फेक्शनचा धोका जास्त वाढू शकतो. त्यामुळे या ऋतूमध्ये घरी बनवलेलेचे जेवण जेवावे.
आलं
खोकला आणि सर्दी घालविण्यासाठी आलं हा उत्तम आणि सोपा पर्याय आहे. घशातील खवखव दूर करण्यासाठी नियमितपणे अनेक जण आल्याचा चहादेखील पितात. उष्ण गुणधर्म असणारे आले हे शरीरातील कफ विरघळविण्यास देखल लाभदायक आहे. (Top Marathi News)
लिंबू
लिंबू हे नैसर्गिकरित्या विटामिन सी ने युक्त असून यामध्ये अधिक प्रमाणात प्रतिकारशक्ती वाढविण्याचे गुणधर्म असतात. शरीरातून कफ काढून टाकण्यास लिंबाची मदत मिळेत आणि घसादुखीपासून त्वरीत सुटका मिळते.
लवंगाचे सेवन
पावसाळ्यात सर्दी झाल्यास किंवा घसा दुखत असल्यास लवंगाचे सेवन करा. शक्य असल्यास लवंग बारीक करून त्यात मध मिसळून दिवसातून दोन ते तीन वेळा खा. यामुळे खोकल्यापासून आराम मिळेल. (Marathi Trending NEws)
तुळशीचा काढा
घशात कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन असेल तर तुळशीचा काढा पिणे फायदेशीर ठरते. तुळशीचा चहा सर्दी-पडश्याच्या समस्यांपासून खूप आराम देतो. हा चहा बनवताना त्यात आलंसोबतच तुळशीचं पानं घालावी.
सफरचंद व्हिनेगर
सफरचंद सायडर व्हिनेगर प्यायल्याने घसा खवखवण्यापासून आराम मिळतो. याच्या सेवनामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. एक चमचा सफरचंद सायडर व्हिनेगर एक ग्लास कोमट पाण्यात मिसळा. ते थोडे थंड होऊ द्या आणि रिकाम्या पोटी प्या. (Top Stories)
मोहरीचे तेल
झोपण्यापूर्वी दोन्ही नाकपुड्यांमध्ये बदाम किंवा मोहरीच्या तेलाचे 2-2 थेंब टाका. यामुळे नाकाचा कोणताही आजार होत नाही.
=========
हे ही वाचा : Health : निरोगी आरोग्यासाठी लाभदायक असलेल्या ब्लु टी सेवनाचे फायदे
Health : जाणून घ्या Heart Attack आणि Cardiac Arrest यातला नेमका फरक
==========
लसूण
लसूणमध्ये आढळणारे एलिसिन नावाचे रसायन अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल, अँटी-फंगल आहे. हे सर्दी आणि फ्लू संसर्ग दूर करते. यासाठी 6-8 लसूण पाकळ्या तुपात तळून खाव्यात.
गाईचे तूप
शुद्ध गाईचे तूप वितळवून सकाळी नाकात दोन थेंब टाकावे. हे तीन महिने नियमित करा. हे तुमची सर्दी देखील बरे करते.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics