आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यातील प्रत्येक लहान मोठ्या नात्याला समर्पित अनेक सणवार साजरे केले जातात. यातलाच एक सण म्हणजे ‘गुरुपौर्णिमा’. भारताला मोठी आणि प्रगल्भ अशी गुरु – शिष्य परंपरा लाभली आहे. जनक – याज्ञवल्क्य, शुक्राचार्य – जनक, कृष्ण, सुदामा – सांदिपनी ऋषी, विश्वामित्र – राम, लक्ष्मण, परशुराम – कर्ण, द्रोणाचार्य – अर्जुन, रामकृष्ण परमहंस – स्वामी विवेकानंद, रामदास स्वामी – शिवाजी महाराज आदी अनेक भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, आपोआपच सर्वांचे हात जोडले जातात. अशी ही गुरूंची महती कायमच जगाला प्रकाश आणि प्रेरणा देणारी आहे. अशी ही गुरुपौर्णिमा कायम आपल्या सगळ्यांसाठी खास असते. (Guru Purnima)
आषाढी एकादशी झाली की, सगळ्यांना वेध लागतात ते गुरु पौर्णिमेचे. आपल्या आयुष्यात असणाऱ्या गुरूंबद्दल आणि शिक्षकांबद्दल आदर, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘गुरु पौर्णिमा’ हा सण साजरा केला जातो. हा दिवस पुर्णपणे गुरुला समर्पित असतो. दरवर्षी आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा सण येतो. या दिवशी गुरुची मनोभावे पूजा केली जाते. हिंदू संस्कृतीत गुरु पौर्णिमा या सणाला खास महत्व प्राप्त असून हा एक प्रवित्र सण मानला जातो. आपल्या धार्मिक पुराणानुसार या दिवशी महर्षी वेद व्यासांचा जन्म झाला असल्याची मान्यता आहे. त्यामुळेच या दिवसाला ‘व्यास पौर्णिमा’ किंवा ‘वेद पौर्णिमा’ असेही म्हटले जाते. (Todays Marathi Headline)
यावर्षी गुरुपौर्णिमा सण हा १० जुलै रोजी साजरा होणार आहे. पौर्णिमा तिथी ही १० जुलै रोजी पहाटे १:३६ वाजता सुरू होईल आणि ११ जुलै रोजी पहाटे २:०६ वाजता संपेल. त्यामुळे गुरुपौर्णिमा १० जुलै गुरुवार रोजी साजरी केली जाईल. या दिवशी प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात असणाऱ्या गुरुची पूजा करून त्यांना अभिवादन करते. आपल्याला आपल्या गुरूकडून मिळालेल्या निस्वार्थ आणि अमूल्य ज्ञानासाठी आपण कायम ऋणी असल्याचे देखील यादिवशी सांगितले जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी केवळ गुरुची पूजा करून त्यांच्या चरणी नतमस्तकच व्हावे असे नाही तर त्यांची शिकवण अंगीकारून त्यातून आपली आणि पर्यायाने समाजाची प्रगती कशी साधता येईल हे देखील बघणे आवश्यक असते. (Latest Marathi News)
आपल्या पौराणिक मान्यतेनुसार, गुरुपौर्णिमा ही महाभारत रचणारे महर्षी वेद व्यास यांच्या जन्मदिनी साजरी केली जाते; म्हणूनच या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. असे मानले जाते की याच दिवशी वेद व्यासांनी चार वेदांची रचना केली होती. व्यास ऋषींनी महाभारतासह श्रीमद्भागवत, अठरा पुराणे आणि ब्रह्मसूत्र यांसारख्या ग्रंथांची निर्मिती करून सनातन धर्माला एक मोठा ठेवा दिला आहे.या दिवशी गुरु आपल्या शिष्यांना दीक्षाही देतात. या दिवशी प्रत्येकजण आपल्या गुरूंची पूजा करतो. या दिवशी गुरु आणि वडीलधाऱ्यांचा आदर केला पाहिजे. याशिवाय जीवनात मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना गुरुदक्षिणा देणेही महत्त्वाचे आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्रत, दान आणि उपासनेलाही खूप महत्त्व आहे. (Top Marathi HEadline)
गुरुपौर्णिमा हा गुरु-शिष्य परंपरेचा सन्मान करणारा दिवस मानला जातो. या दिवशी लोक आपले आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक किंवा इतर सर्वच गुरूंचा सन्मान करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. तसेच पौर्णिमा असल्याने या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी गुरुंचा आदर केला जातो आणि त्यांना गुरुदक्षिणा देखील दिली जाते. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, दानधर्म करणे आणि गुरूंचे पूजन करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. गुरुपौर्णिमा हा केवळ एक सण नसून, ती ज्ञानाची उपासना आहे जी अज्ञानाचा अंध:कार दूर करून आपल्याला योग्य मार्ग दाखवते. (Social News)
=============
हे ही वाचा :
China : 60 लाख गाढवांची कत्तल करुन चीन करतो काय !
=============
दत्त संप्रदायासाठी देखील हा दिवस खूपच महत्वाचा असतो. यादिवशी देशातील मुख्य दत्ताची ठाणं असलेल्या ठिकाणी शिष्यांची मोठी गर्दी जमते. दत्ताचे दर्शन घेऊन अनेक जणं आपली गुरुपौर्णिमा साजरी करतात.यासोबतच शिर्डी, शेगाव, अक्कलकोट या ठिकाणी देखील भक्त मोठी गर्दी करतात. गुरूच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतात आणि आशीर्वाद घेतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी दान आणि गुरुंना गुरुदक्षिणा देण्याचेही खूप महत्त्व आहे. (Top Stories)