हिमाचलप्रदेशमधील धर्मशाळा येथील मॅकलिओडगंजमध्ये अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. विशेषतः चीनची नजर या धर्मशाळामध्ये अधिक आहे. कारण येथेच तिबेटी बौद्ध धर्माचे सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा यांचा 90 वा वाढदिवस साजरा होत आहे. त्यासाठी मोठा उत्सव करण्यात येत असून याच उत्सवात दलाई लामा आपला उत्तराधिकारी कोण असणार याची घोषणा करणार आहेत. 6 जुलै रोजी दलाई लामा यांच्या वाढदिवसापूर्वी ही ऐतिहासिक घोषणा होणार असल्यामुळे अवघ्या जगाचे लक्ष येथे लागले आहे. मात्र चीननं या सर्व प्रक्रियेवरच तीव्र आक्षेप घेतला आहे. (Tibetan Buddhist)
दलाई लामा, पंचेन लामा आणि इतर उच्च बौद्ध गुरूंच्या पुनर्जन्माची प्रक्रिया केवळ ‘गोल्डन अर्न’ म्हणजेच पारंपारिक लॉटरी प्रणालीद्वारे आणि चीनमधील सरकारच्या मान्यतेने पूर्ण होईल, असे चीनतर्फे जाहीर करण्यात आले आहे. मात्र या सर्वांना दलाई लामा यांनी स्पष्टपणे नकार दिला आहे. दलाई लामा यांनी त्यांचा उत्तराधिकारी हा चीनबाहेरील असेल तसेच ते पंचेन लामासारखी चूक पुन्हा करू इच्छित नाहीत, असे त्यांनी निवेदनाद्वारे सांगितल्यामुळे चीननं संताप व्यक्त केला आहे. 1951 मध्ये चीनने तिबेटवर कब्जा केला. त्यानंतर दलाई लामा सीमा ओलांडून भारतात पळून गेले. तेव्हापासून दलाई लामा भारतात राहत आहेत आणि चीन सरकार त्यांच्यावर दबाव आणून या सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र भावी दलाई लामा निवडण्याची प्रक्रिया ही अतिशय गुप्त आणि रहस्यमयी आहे. यासाठी स्वप्नातील संकेत पडताळले जातात. आता धर्मशाळा येथे हिच प्रक्रिया चालू असल्यामुळे चीन संताप व्यक्त करीत आहे. (International News)
6 जुलै रोजी तिबेटी बौद्ध धर्माचे सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा 90 वर्षांचे होत आहेत. त्यांच्या या 90 व्या वाढदिवासाआधी पुढचे दलाई लामा कोण याची घोषणा होणार आहे. ही सर्व निवड पारंपारिक तिबेटी पद्धतीनुसार होते. त्यासाठी स्वप्नातील संकेत आणि पुनर्जन्मामधील घटनाही पडताळून बघितल्या जातात. याला तुळकू प्रणालीही म्हणतात. यासंदर्भात दलाई लामा यांनी त्यांच्या आत्मचरित्रात आधीच उल्लेख केलेला आहे. वयाच्या 90 व्या वर्षी ते आपला उत्तराधिकारी जाहीर करणार हे त्यांनी या पुस्तकात लिहिले आहे. दलाई लामा यांनी आपला उत्तराधिकारी हा कोणत्याही राजकीय दबावानं ठरवला जाणार नसून तो पारंपारिक तिबेटी बौद्ध पद्धतीनुसारच ठरवला जाईल हेही या पुस्तकाच्या माध्यमातून सांगितले आहे. यालाच तुळकू पद्धत म्हणतात. (Tibetan Buddhist)
या पद्धतीनुसार असे मानले जाते की, दलाई लामा किंवा पंचेन लामा यांच्या मृत्यूनंतर, त्यांचा पुनर्जन्म होतो. त्यांचा आत्मा नवजात बाळामध्ये पुनर्जन्म घेतो. या बाळाची ओळख काही पुनर्जन्मातील घटनांच्या आधारे पटवण्यात येते. त्यासाठी स्वप्नामध्येही संकेत देण्यात येतात. ही संपूर्ण प्रक्रिया गुढ आहे. या तुलकू प्रक्रियेत अनेक टप्पे आहेत. हे टप्पे हजारो वर्षापासून जपले जात आहेत. या सर्वात जन्मस्थान आणि तेथील विशिष्ट ओळख ही ज्येष्ठ लामांच्या स्वप्नात दिसते. त्यानुसार या बालकाचा शोध घेतला जातो. या ज्योतिषशास्त्रीय गणना संभाव्य तारीख, जन्मस्थानही महत्त्वाचे ठरते. अशा मुलांचा शोध घेतल्यावर त्याला भूतकाळातील वस्तू ओळखता येतात का याची परीक्षा घेतली जाते. शिवाय मंत्र आणि भाषेचे ज्ञानही बघितले जाते. जेव्हा हे सर्व निकष पूर्ण होतात, तेव्हा त्या मुलाला पुनर्जन्मित तुळकू म्हणून घोषित केले जाते. या प्रक्रियेतून ज्या बालकाची दलाई लामा म्हणून निवड करण्यात येते त्याला नंतर बौद्ध धर्मानुसार प्रशिक्षण देण्यात येते. (International News)
सध्या 14 वे दलाई लामा तेन्झिन ग्यात्सो यांचा शोध 1939 मध्ये लागला आणि ते 13 व्या दलाई लामांचे पुनर्जन्म असल्याचे मानले जाते. 1995 मध्ये, 14 व्या दलाई लामा यांनी 11 व्या पंचेन लामांची ओळख जाहीर केली होती. पण यात चीन सरकारनं प्रवेश करत त्या घोषित पंचेन लामांचेच अपहरण केले. यामुळे तिबेटमध्ये संतापाची भावाना उसळली होती. हा वाद अजूनही संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तेव्हापासून भावी दलाई लामांच्या निवडीमध्ये चीन हस्तक्षेप करणार हे जाणून दलाई लामा यांनी गाडेन फोडरंग ट्रस्टची स्थापना केली. दलाई लामांचा निवडण्याच्या प्रक्रियेतून सहकार्य करण्याचे निश्चित केले गेले. यातून दलाई लामा निवडीची पारंपारिक प्रक्रिया कायम राहिल, कुठल्याही राजकीय पक्षाचे किंवा अन्य देशाला यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचेही दलाई लामा यांनी सांगितले आहे. (Tibetan Buddhist)
=============
हे ही वाचा : Dalai Lama : ‘इतक्या’ कोटींची आहे दलाई लामांची संपत्ती, कुठून करतात कमाई घ्या जाणून ?
China : 60 लाख गाढवांची कत्तल करुन चीन करतो काय !
=============
मात्र या सर्व निवड प्रक्रियेमुळे अनेक प्रश्नही विचारण्यात येत आहेत. त्यातील मुख्य प्रश्न म्हणजे, दलाई लामांचा पुढचा उत्तराधिकारी भारतातील असेल की तिबेटमधीलच असेल. तिबेटच्या बाहेर तिबेटी बौद्ध धर्माचे सुमारे 1.5 लाख अनुयायी आहेत. यापैकी सुमारे एक लाख लोक भारतात राहतात. 14 व्या दलाई लामांनी 2025 मध्ये व्हॉइस फॉर द व्हॉइसलेस या त्यांच्या पुस्तकात याबाबत विधान केले आहे. त्यानुसार पुढचा दलाई लामा हा चीनच्या बाहेर जन्मलेला अनुयायी असणार आहे. त्यामुळे आता दलाई लामा कोणाची भावी दलाई लामा म्हणून घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics