I shall give you a reason to remember my name ! म्हणजे… मी तुला असं एक कारण देईन, ज्यामुळे माझ नाव तू आयुष्यभर लक्षात ठेवशील. हे शब्द त्यावेळचा बॉम्बेचा ब्रिटीश गव्हर्नर चार्ल्स बून याला उद्देशून बोलण्यात आले होते, आणि या गव्हर्नरला धडकी भरवली होती… ‘समुद्रातला शिवाजी’ म्हणवल्या गेलेल्या महान योद्ध्यानं… ज्यांचं नाव सरखेल कान्होजी आंग्रे ! समुद्रात त्यांचा इतका धाक की ब्रिटीश त्यांना सगळ्यांना गिळून टाकणारा Land Shark म्हणायचे. समुद्रातला धोका ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार स्थापन केलं होतं. आणि या आरमाराला जागतिक ओळख मिळवून दिली, सरखेल कान्होजी आंग्रे यांनी… मराठ्यांनी इतकं बलाढ्य आरमार उभारलं होतं की, त्यावेळी जगातली कोणतीही समुद्री शक्ती त्यांच्याविरोधात लढू शकत नव्हती. इतका दरारा की, कान्होजी आंग्रे यांनी दस्तक दिल्याशिवाय एकही यूरोपियन जहाज भारताची किनारपट्टी ओलांडू शकत नव्हता. कान्होजींच्या नेतृत्वात इंग्रज समुद्रात एकही युद्ध जिंकू शकले नाहीत आणि इतका सपाटून मार खाल्ला की, समुद्रात लढायला परत कधीच तयार झाले नाहीत, जमिनीवर सोडाच… पण पाण्यातही प्रचंड भीती होती, म्हणजे आपले पूर्वज इतके पराकोटीचे लढवय्ये होते, हेच कळून येतं. याच कान्होजी आंग्रे यांनी ब्रीटीश आणि पोर्तुगीजांचा माज कसा उतरवलाय जाणून घेऊ. (Kanhoji Angre)
छत्रपती शिवाजी महाराजांनी एका पत्रात म्हटलं होतं, ‘ज्याचे आरमार त्याचा समुद्र’ ! त्यांचा एक एक शब्द सरखेल कान्होजींनी सार्थ करून दाखवलाय. स्वत: ब्रिटिशांनी १७०४ मध्ये कान्होजींचे वर्णन ‘Rebel independent of Rajah Sivajee’ असं करुन ठेवलं आहे. आता समुद्रावर इतकं वजन बनवल्यानंतर निश्चितच त्यांच्याविरुद्ध कोणीतरी planning करणारच… पण यावेळी planning फक्त एकाच तुकडीने नाही केलं, तर त्यावेळी इंग्लंडच्या रॉयल नेव्हीचं नेतृत्व होतं कर्नल मैथ्यूजकडे, मुंबईमधील ब्रिटीशांचं आरमार कॅप्टन आणि बॉम्बे गव्हर्नर चार्ल्स बुनकडे होतं… आणि पोर्तुगीज अशा तीन बलाढ्य समुद्री सत्तांनी एकत्र कान्होजी आंग्रे यांच्यावर आक्रमण करण्याचं ठरवलं. (Top Stories)
समुद्रावर ब्रिटीश तसेच परकीय सत्तांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणाऱ्या या मराठ्यांचं आरमार एकदाचं संपवून टाकावं, हा निश्चय त्यांनी केला होता. त्यांनी तारीखसुद्धा ठरवली होती, २४ डिसेंबर १७२१..! त्यातच कान्होजींचा पाडाव केल्यानंतर हा दिवस Independence Day म्हणून साजरा करायचा असा फाजील आत्मविश्वाससुद्धा ब्रिटीश आणि पोर्तुगीजांनी बाळगला होता. समुद्र आंग्र्यांपासून मुक्त करायचा… त्यांचं नामोनिशान मिटवून टाकायचं इतकी तयारी या लोकांनी केली होती. महत्त्वाचं म्हणजे चार्ल्स बूनने याच्या आधी कान्होजी आंग्रे यांचा भरपूर मार खाल्ला होता. त्यातच त्याच्याकडून चांगलीच खंडणीसुद्धा त्यांनी गोळा केली होती. (Kanhoji Angre)
गवर्नर बूनने अख्ख एक वर्ष तयारी करायला घालवलं होतं. त्यातच त्याने पर्शियन, सुरतेमधील मुघल आणि सिद्दीकडे मराठ्यांच्या आरमाराविरोधात लढण्यासाठी मदत मागितली होती. आणि आता ब्रिटीश पोर्तुगीजांसोबत या सत्ताही कान्होजी आंग्रे यांच्या विरोधात एकत्र आल्या. बूनने लढाई करण्यासाठी एका नवीन लढाऊ जहाजाची निर्मिती केली. त्यांचं नाव होतं.. ‘Phram’ ! त्याचं वर्णन त्याने Great and mighty floating machine !
या मोहिमेचं नेतृत्व बूनने वाल्टर ब्राउन याच्याकडे दिलं होतं, ज्याला लढाईचा कसलाही अनुभव नव्हता… इथेच बून फसला होता. कान्होजी आंग्रे यांच्यापर्यंत या सर्व खबरा पोहोचल्या होत्या. त्यांनीही इथून मराठ्यांची सगळी रणनीती आखलीच होती. सप्टेंबर १७२० च्या सुमारास आपल्या 3 लढाऊ जहाजांना घेऊन हा ब्राउन विजयदुर्गाजवळ पोहोचला आणि नेमकं त्याच वेळेला Edward Ingland नावाचा एक समुद्री लुटारु आपल्या लुटिच्या मालासोबत विजयदुर्गच्या किनाऱ्यावर पोहोचला होता. ते माहितीये ना,,, शत्रुचा शत्रु,आपला मित्र या नात्याने मराठ्यांनी अनेकदा या समुद्री लुटारूंनाही मदत केली होती. कॅप्टन विल्यम कीड,हेनरी एवरी असे अनेक समुद्री लुटारू मराठ्यांना साथ देत होते. त्या रात्री हा England विजयदुर्गाजवळ आल्याची बातमी ब्रिटिशांना नव्हती. आणि तेवढ्यात Edward Ingland च्या एका जहाजाने ब्रिटीशांच्या त्या तुकडीचा पार धुव्वा उडवला. बूनच्या ‘phram’ जहाजाचा चुराडा झाला. मराठ्यांनी कसल्याही प्रकारचा हल्ला न करता इंग्रजांचा पराभव झाला. ब्राउन कसाबसा तिथून निसटला. यामध्ये अजूनही कान्होजी आंग्रे यांची एन्ट्री झाली नव्हती. (Kanhoji Angre)
आता ब्रिटीशांच्या रॉयल नेवीने कर्नल मैथ्यूजच्यानेतृत्वाखाली असलेली नौसेनेची तुकडी कान्होजी आंग्रे यांच्या कुलाबा ठाण्यावर पाठवली. यामध्ये बूनची सुद्धा planning होती. मैथ्यूजने समुद्रातून कुलाबा किल्ल्यावर हल्ला करायचा आणि पोर्तुगीजांनी किनारपट्टीवरून हल्ला करुन शत्रूच्या ताब्यातील प्रदेश जिंकायचा अशी त्यांची योजना ठरली. तसं कुलाब्याचा किल्ला लढवण्यात कान्होजी आंग्रे यांना कसलीही अडचण नव्हती, पण जमिनीवर पोर्तुगीज होते, त्यांना कसं हाणायचं याचा विचार ते करत होते. पण याचवेळी एका महान माणसाने यामध्ये grand एन्ट्री घेतली. ते म्हणजे थोरले छत्रपती शाहू महाराज ! शाहू महाराजांनी पिळाजीराव जाधवांना कान्होजी आंग्रे यांच्या मदतीसाठी पाठवलं. (Top Stories)
ब्रिटिशांनी २४ डिसेंबर १७२१ हा दिवस ‘Independence day’ म्हणून साजरा करायचा अशी घोषणा केली होती. याच दिवशी बूनने समुद्रातून मराठ्यांवर आक्रमण केलं… आणि पोर्तुगीजांनी किनारपट्टीवरून आक्रमण सुरु केलं. पण पिळाजीरावांनी आपल्या तलवारीने त्यांच्या सैन्याला असं तोडलं की, ते सारे पळूनच गेले. त्यांनी मात खाल्ली. इथे हर हर महादेवच्या गजरात कान्होजी आंग्रे यांच्या तोफा ब्रिटिशांच्या अक्षरश भाजून काढत होत्या. काही ऑप्शनच नव्हता ना… ज्याने अख्खा समुद्र कोळून प्यायलाय त्याच्यासमोरच समुद्रात लढतायत… ब्रिटिशांनाही पिलाजीराव आणि कान्होजी आंग्रे यांनी पार झोडपून काढला.
आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे काय ? तर तिथे थेट शहामतपनाह थोरले बाजीरावे पेशवे आपल्या २५ हजारांच्या सैन्यानिशी आले. आता काही फिरंग्यांचं खैर नव्हतं. स्वातंत्र्य दिन साजरा करायला आले होते, पराभव दिन साजरा करून गेले. हे युद्ध करायच्या आधी ब्रिटिश आणि पोर्तुगीज यांनी ठरवलं होतं की, काहीही होऊदे मराठ्यांच्या समोर झुकायचं नाही आणि तह करायचा नाही… पण पुढे काय होणार होतं हे दोघांनाही माहित होतं. (Kanhoji Angre)
एकीकडे कान्होजी आंग्रे, दुसरीकडे पिळाजीराव जाधव आणि तिसरीकडे बाजीराव पेशवे… मराठा साम्राज्याचे तीन अव्हेंजर्स आता फिरंग्यांसमोर होते. मराठे जिंकले आणि नेहमीप्रमाणे इंग्रज आणि पोर्तुगीजांनी मराठ्यांशी तह करण्याचं धोरण स्वीकारलं. छत्रपती शाहू छत्रपती महाराजांनी इंग्रजांनी चहाची बोलणी लावली.पोर्तुगीजांनी मराठ्यांसोबत मैत्रीचा वेगळा तह करुन घेतला. आणि पुन्हा एकदा ब्रिटिशांना मराठ्यांसमोर मात खावी लागली.
================
हे देखील वाचा :Mirza Ghalib : आर्थिक चणचण, कर्जबाजारीपणातूनही झाले ‘शायरीचे बादशाह’, वाचा मिर्झा गालिब यांच्याबद्दल खास गोष्टी
================
नंतर जानेवारी १७२२ मध्ये ब्रिटीशांचं सैन्य बॉम्बेला परतलं. गव्हर्नर बून आणि कर्नल मैथ्यूजची या दोघांची रवानगी इंग्लंडला झाली. तिकडे त्यांच्यावर खटले चालले. गव्हर्नर बूननंतर त्याच्या जागी फिफ्स म्हणून गव्हर्नर आला. पण तो मराठ्यांसोबत चिडीचूप राहिला. गवर्नर बूनच्या जागी आलेल्या फिफ्सने मात्र मराठ्यांसोबत शांततेचे धोरण स्वीकारले.आणि अशा प्रकारे,गवर्नर बुनने चालू केलेले हे अपयशी ऑपरेशन संपुष्टात आले. मी सर्वात पहिलं वाक्य म्हटलं होतं, I shall give you a reason to remember my name… कान्होजी आंग्रे यांचं हे वाक्य फक्त त्यानेच नाही तर त्याच्या पिढ्यांनी लक्षात ठेवलं असेल… मराठ्यांच्या आरमाराची ताकद त्याला कळली असेल आणि दर्या भवानीचे पठ्ठे मराठे हट्टाला पेटले तर काय तांडव करतात, हे त्याने आपल्या डोळ्यांनी पाहिलं असेल… १३ सागरी किल्ले, २७ जमिनिवरचे किल्ले आणि ३६ लाखांचा मुलुख आपल्या पराक्रमाने स्वराज्याला मिळवून देणाऱ्या सरखेल कान्होजी आंग्रे यांना नमन…