आषाढी एकादशी जवळ आली की, अख्या महाराष्ट्रात फक्त हरिनामाचा गजरच सुरु असतो.. संपूर्ण महाराष्ट्र श्रीरंगाच्या रंगात दंग होतो. त्यातच पंढरीच्या विठूरायाला कोणी पांडुरंग म्हणतं, कोणी विठ्ठल, तर कोणी पंढरीनाथ… कोणी विठू माऊली… अशी कित्येक नावं आपल्या पंढरीच्या विठूरायाची आहेत. पण या विठूरायाचा त्याच्या नावांचा इतिहास जरा खणून पाहायचा तर खूप रंजक गोष्टी समोर येतात. त्यामुळे पंढरीच्या विठ्ठलाला ‘पांडुरंग’, ‘विठ्ठल ही नाव कशी पडली ती आली तरी कुठून हे जाणून घेऊ. (Real Story Behind Vitthal)
तर सगळ्यात आधी बोलू ‘विठ्ठल’ या नावाबद्दल. या नावामागे सगळ्यात लोकप्रिय प्रथा म्हणजे ‘विठ्ठल’ हा शब्द दोन शब्दांनी बनलाय – ‘विठ’ आणि ‘ठल’. ‘विठ’ म्हणजे विट आणि आणि ‘ठल’ याचा अर्थ आहे ‘उभा’ किंवा ‘स्थान’. म्हणजेच, विटेवर उभा असलेला! या नावामागची गोष्ट भक्त पुंडलिकाच्या कथेशी जोडली जाते. पुंडकलिक हा श्री कृष्णाचा निस्सीम भक्त होता पण तो त्याच्या आई वडिलांची सुद्धा तेवढ्याचं मनोभावे सेवा करायचा. पुंडलिकाची मातृ-पितृभक्ती इतकी अमर्याद होती की एकदा भगवान श्रीकृष्णालाही पुंडलिकाच्या घरी जाण्याचा मोह झाला एका रात्री,पुंडलिक आपल्या आजारी माता-पित्याची सेवा करत होता. भगवान श्रीकृष्ण पांडुरंगाच्या रूपात पुंडलिकाच्या घरी आले तेव्हा तो आपल्या आई-वडिलांची सेवा करत होता. देवाला पाहून त्याला आनंद झाला, पण त्याने आपली सेवा न थांबवता जवळची वीट श्रीकृष्णाला उभे राहण्यास दिली आणि पुन्हा माता-पित्याच्या सेवेत मग्न झाला. आजही पंढरपूरची विठूरायची मूर्ती एका विटेवर उभी आहे.
इतिहासकार वि.का राजवाडे विठ्ठल या शब्दाच मूळ रूप विष्ठल असे सांगतात. ‘विष्ठल’ म्हणजे दूर रानावनात असलेली जागा. यानुसार विठ्ठल हा देव रानावनात, दूरदूर राहणारा आहे असं मानलं जातं. तर इतिहासकार डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचं म्हणणं आहे की, “विष्णू” या शब्दाचा कन्नडमधला अपभ्रंश “विट्टि” असा झाला. आणि याच “विट्टि” वरून “विठ्ठल” हे नाव आलं.(Real Story Behind Vitthal)
आता बघू पांडुरंग या नावाची गोष्ट, तर पांडुरंग नावा मागचा इतिहास असा की, पंढरपूर हे पंढरी, पांडुरंगपूर, पंडरीपूर, फागनीपूर, पौंडरीक्षेत्रे, पंडरंगे, पांडरंगपल्ली अशा विविध नावांनी ओळखलं जात होतं. यामधील ‘पंडरंगे’ हा कानडी शब्द आहे. याच पंडरंगेवरुन पांडुरंग हा शब्द आला असल्याचं अभ्यासक सांगतात. ‘पांडुरंग’ हे नाव पंडरगे या मूळ क्षेत्रनामाचच संस्कृतीकरण आहे. ‘पांडुरंग’ शब्दाचा अर्थ ‘शुभ्र किंवा गौर रंग’ ! मराठी संत हे शिव आणि विष्णू यांच्या ऐक्याचेच पुरस्कर्ते होते परंतु त्यांनी पांडुरंगाला विष्णुचा अवतार असलेला गोपाळकृष्ण मानलं आहे. याशिवाय अजून एक पुरावा दिला जातो, तो म्हणजे महाभारतात पौंड्रवंशीय वासुदेव म्हणून एक राजा होता. तो ‘पौंड्रक वासुदेव’ या नावाने ओळखला जात होता. तो कृष्णाचा प्रतिस्पर्धी मानला गेला असून त्याला पुढे कृष्णानेच ठार मारलं. पौंड्रवंशीय राजे स्वत:ला ‘पौंड्रक’ अशी उपाधी लावत होते. याच ‘पौंड्रक’ या शब्दाचं मराठी सुलभीकरण म्हणजे ‘पांडुरंग’ आहे, असंही संशोधक सांगतात. (Top Stories)
==================
हे देखील वाचा : Pandharpur: विठू माऊलीच्या कपाळावरील टिळ्याचे आहे खास वैशिष्ट्य
==================
पांडुरंग म्हणा, विठ्ठल म्हणा किंवा विठोबा… ही नावं तर एकाचं शक्तीची आहेत. जी शक्ती लाखों वारकऱ्यांना दरवर्षी पंढरीला येण्याची ओढ लावते. तर तुम्ही विठूरायाला कोणत्या नावाने हाक मारता? कोममेंट्समध्ये नक्की सांगा.