Home » Baba Vanga : अवघ्या जपानवर 5 जुलैची भीती !

Baba Vanga : अवघ्या जपानवर 5 जुलैची भीती !

by Team Gajawaja
0 comment
Baba Vanga
Share

अवघं जपान 5 जुलै या तारखेला काय होणार या भीतीमध्ये वावरत आहे. बाबा वांगा आणि जपानी बाबा वांगा म्हणून ओळखल्या जाणा-या जपानी मंगा कलाकार र्यो तात्सुकी यांनी या 5 जुलैची महाभयंकर अशी भविष्यवाणी केली आहे. यामध्ये जपानमध्ये न भूतो ना भविष्यती असा भूकंप आणि त्सुनामी येणार असल्याचे सांगितले आहे. (Baba Vanga)

या भविष्यवाणीमध्ये भर म्हणून की काय, गेल्या दोन आठवड्यापासून जपानच्या टोकारा या बेटांवर सुमारे 800 छोटे मोठे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हे भूकंपाचे धक्के याच भविष्यवाणीचे प्रतिक असल्याची भीती आता जपानी नागरिकांच्या मनामध्ये बसली आहे. 5 जुलैला समुद्राच्या तळाला तडे जातील आणि प्रचंड तीव्र त्सुनामी येईल, या भीतीनं जपानच्या समुद्रकिना-यावरील सर्व जनजीवनच ठप्प झाले आहे. जपानी हवामानशास्त्र विभाग ही सर्व शक्यता फेटाळत असला तरी हा देश पूर्णपणे दहशतीखाली गेला आहे. समुद्रकिनारा जवळ असलेल्या भागातील लोक त्यांच्या घरातून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. या भागातसध्या कर्फ्यूसारखे वातावरण पसरले आहे. (Social News)

भूकंप आणि त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी सदैव सज्ज असलेला जपान, 5 जुलैच्या भीतीखाली आला आहे. दरवर्षी जपानमध्ये जून, जुलै हे महिने पर्यटनाचे महिने म्हणून ओळखले जातात. जगभरातून पर्यटक या देशात दाखल होतात. मात्र यावेळी जपानमध्ये अगदी हातावर मोजण्याएवढे पर्यटक असून हे पर्यटकही लवकरात लवकर या देशातून बाहेर जाण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. याला कारण ठरली आहे, ती एक भविष्यवाणी. बाबा वांगा या बल्गेरियन भविष्यकारांनी आशियामध्ये, विशेषतः जपान आणि इंडोनेशियामध्ये भूकंप आणि त्सुनामी येईल असे भविष्य सांगितले आहे. यासोबत जपानी मंगा कलाकार र्यो तात्सुकी यांनी आपल्या 1999 मध्ये प्रकाशित केलेल्या “द फ्युचर आय सॉ” या पुस्तकात 5 जुलै 2025 रोजी जपानला धडकणाऱ्या विनाशकारी त्सुनामीचे वर्णन केले आहे. या दोघांनीही यापूर्वी सांगितलेल्या भविष्यवाणी सत्यात आल्या आहेत. त्यामुळे आत्ताही 5 जुलैची भविष्यवाणी खरी ठरणार, अशी भीती जपानी नागरिकांच्या मनामध्ये आहे. या सर्वांमुळे जपानचा पर्यटन व्यवसाय ठप्प झाला असून लाखो विमान तिकीटे रद्द करण्यात आली आहेत. (Baba Vanga)

जुलै महिना सुरु झाल्यापासून जपानमध्ये कर्फ्यू लागल्यासारखे वातावरण झाले आहे. यासर्वात जपानच्या नैऋत्येला असलेल्या विरळ लोकवस्तीच्या टोकारा या बेटावर सलग होत असलेल्या भूकंपाच्या धक्क्यांनी या भीतीमध्ये अधिक भर पडली आहे. आतापर्यंत या बेटांवर सुमारे 800 भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, दोन दिवसांपूर्वी दुपारी टोकारा बेटांवर 5.6 तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपामुळे येथील घरांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. (Social News)

तसेच घरातील वस्तूही विखुरल्या गेल्या. हा आत्तापर्यंतचा येथील मोठा भूकंपाचा धक्का होता. मात्र यापूर्वी येथे यापेक्षा कमी तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. टोकारा हे जपानचे मुख्य बेट आहे. टोकारा आणि ओकिनावा यांच्यामध्ये 12 बेटांची साखळी आहे. या सर्व बेटांवर गेल्या 40 दिवसांत सातत्यानं भूकंपाचे धक्के बसत आहेत. या भूकंपापैकी 50 हून अधिक भूकंप रिश्टर स्केलवर 3 ते 5 तीव्रतेचे होते. ज्वालामुखीच्या स्फोटामुळे अकासुकीजिमा बेटाची निर्मिती झाली आहे. येथील टेकड्या भूकंपाच्या दृष्टीने सर्वात संवेदनशील मानल्या जातात. या बेटांना लागून असलेल्या समुद्राच्या पोटात ज्वालामुखी असून ते सक्रीय हो असल्याची भीती येथील नागरिकांना आता वाटत आहे. त्यामुळे या बेटांवरील नागरिक आपले घर सोडून सुरक्षित स्थळी रवाना होत आहेत. या सर्वात जपान हवामान संस्थेने या भूकंपीय क्रियेचे कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. (Baba Vanga)

=============

हे ही वाचा : Dalai Lama : ‘इतक्या’ कोटींची आहे दलाई लामांची संपत्ती, कुठून करतात कमाई घ्या जाणून ?

China : 60 लाख गाढवांची कत्तल करुन चीन करतो काय !

=============

परंतु जपानमधील काही हवामानतज्ञांच्या मते हे भूकंप म्हणजे, नवीन ज्वालामुखी बेटे उदयास येण्याचे संकेत असू शकताता. दोन वर्षांपूर्वीही पॅसिफिक महासागरात असलेल्या इवोजिमा या जपानी बेटाजवळ समुद्राखालील ज्वालामुखीच्या उद्रेकातून एक नवीन लहान बेट उदयास आले आहे. सागरी ज्वालामुखी तज्ञ हिसायोशी योकोसे यांनी सध्या होत असलेले भूकंप विनाशकारी भूकंपाच्या आधी येणारे भूकंप असल्याची शक्यता फेटाळून लावली आहे. मात्र पुढील काही दिवसांत 6 रिश्टर स्केलचा भूकंप येईल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. ज्या बेटावर सातत्यानं भूकंप होत आहेत, ते टोकारा बेट दुर्गम ठिकाणी आहे. येथे पोहचण्यासाठी 6 त 7 तासांचा अवघी लागतो. त्यामुळे भूकंप किंवा त्सुनामी सारखी आपत्ती तिथे भविष्यात आल्यास मदत मिळायला खूप उशीर होईल, या भीतींनं येथील नागरिकांनी हे बेट खाली करायला सुरुवात केली आहे. (Social News)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.