सोशल मिडियावर कधी कोणावर मीम्सचा पाऊस पडेल, हे सांगता येत नाही. पण सुपरपॉवर म्हणवून घेणा-या अमेरिका आणि भारतावर राज्य केलेल्या ब्रिटनवर सध्या मीम्सचा पाऊस नाही तर त्सुनामी आल्याची परिस्थिती आहे. त्याला कारण ठरले आहे, ब्रिटनचे स्टेल्थ फायटर जेट F-35. अमेरिकेमध्ये तयार केलेले हे एक अत्याधुनिक लढाऊ विमान भारताच्या केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम विमानतळावर उभे आहे. 14 जून पासून हे लढाऊ विमान भारताच्या मुक्कामी आहे. (Kerala)
बिघाड झाल्यामुळे तिरुअनंतपुरम हवाईपट्टीवर या विमानाला उतरवण्यात आले. मात्र हा बिघाड काय आहे, हे अजूनही स्पष्ट झाले नाही. त्यासाठी ब्रिटन आणि अमेरिकेच्या तज्ञांची टिमही दाखल झाली आहे. जवळपास 18 दिवस भारतीय हवाई पट्टीवर उभ्या असलेल्या या अत्याधुनिक लढाऊ विमानाला दुरुस्त करण्यास हे तज्ञ अपयशी ठरत आहेत. या विमानाचा भारतातला मुक्काम जसा वाढत आहे, तशी त्याच्यावर मीम्सची बरसात होत आहे. अगदी ब्रिटननं भारताला कोहिनूर हिरा परत दिल्याशिवाय हे विमान परत दिले जाणार नाही इथपासून ते अक्षय कुमारच्या खट्टा मिठा या चित्रपटाच्या पटकथेपर्यंत हे मीम्स व्हायरल होत आहेत. या मीम्सना बाजुला ठेवलं तरी सुपरपॉवर अमेरिकेमधील तंत्रज्ञान किती बेभरवशाचे आहे, हे सुद्धा या घटनेतून स्पष्ट होत आहे. 14 जून पासून केरळच्या तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटनचे स्टेल्थ फायटर जेट F-35 उभे आहे. हे ब्रिटिश नौदलाच्या ताफ्यातील सर्वात आधुनिक लढाऊ विमान आहे. (International News)
इस्रायल-इराण युद्धात जेव्हा अमेरिकेनं एन्ट्री केली, त्याच दरम्यान हे लढाऊ विमान भारतीय हवाईपट्टीवर उतरल्यानं अनेक शंका घेण्यात आल्या. या युद्धात ब्रिटन आणि भारताचा समावेश होणार असाही अंदाज लावण्यात आला. मात्र या विमानाबाबत लवकरच खुलासा झाला आणि हे अंदाज फोल ठरले. वास्तविक F-35 लढाऊ विमान हे अमेरिकन बनावटीचे आहे. ते ब्रिटनच्या शाही नौदलानं आपल्या ताफ्यासाठी विकत घेतले आहे. अत्याधुनिक अशा या लढाऊ विमानात बिघाड झाल्यानं त्याला आपत्कालीन परिस्थितीमध्ये तिरुअनंतपुरमच्या हवाई पट्टीवर उतरवण्यात आले आहे. F-35 हे पाचव्या पिढीतील सर्वात प्रगत स्टेल्थ लढाऊ विमान आहे. सध्या परिस्थितीमध्ये जगातील सर्वात शक्तिशाली लढाऊ विमान म्हणून या F-35 कडे बघितले जाते. या लढाऊ विमानाची खास गोष्ट म्हणजे शत्रूच्या रडारलाही ते पकडता येत नाही. F-35 विमान लॉकहीड मार्टिन कंपनीने विकसित केले आहे. (Kerala)
हे लढाऊ विमान 2015 मध्ये अमेरिकन हवाई दलात समाविष्ट करण्यात आले. मात्र भारतीय हवाईपट्टीवर नादुरुस्त म्हणून उभ्या असलेल्या या विमानानं सर्व जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. अशी अत्याधुनिक लढाऊ विमाने ही त्यांच्यामधील तंत्रज्ञानामुळे वेगळी ठेवली जातात. अशात हे विमान अन्य देशाच्या हवाईपट्टीवर उभे राहिल्यामुळे अमेरिका आणि ब्रिटनमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली. कारण या विमानातील तंत्रज्ञानाची कोणी कॉपी करेल की काय अशी भीती विमान तयार करणा-या कंपनीला वाटत होती. त्यामुळेच हे लढाऊ विमान हॅंगरमध्ये नेण्याची भारताची विनंतीही ब्रिटननं मान्य केली नाही. सध्या या विमानावर उपग्रहाच्या माध्यमातून हे दोन्हीही देश नजर ठेवत असल्याची माहिती आहे. भारतीय विमानांच्या हॅंगरमध्ये हे विमान उभे केले तर त्यातील घडामोडी उपग्रहांना टिपता येणार नाहीत, यासाठी ही काळजी घेतली जात आहे. या विमानात साधारण बिघाड असे मानून ब्रिटिश अभियंते भारतात दाखलही झाले. पण त्यांना हा बिघाड शोधता आला नाही. (International News)
=============
हे ही वाचा :
China : 60 लाख गाढवांची कत्तल करुन चीन करतो काय !
=============
त्यामुळे आता ब्रिटनहून 40 अभियंत्यांची एक टीम भारतात येणार आहे. तोपर्यंत विमानाच्या सुरक्षेसाठी सीआयएसएफचे जवान 24 तास तैनात करण्यात आले आहे. मुख्यम्हणजे, तिरुअनंतपुरम विमानतळ प्रशासनाकडून ब्रिटिश नौदलाला या विमानाच्या पार्किंगसाठी रोजचे 26000 भाडे आकारण्यात येत आहे. त्यामुळे जेवढे दिवस हे विमान हवाई पट्टीवर उभे राहिल, तेवढ्या दिवसांचे भाडे तिरुअनंतपुरम हवाई प्राधिकरण ब्रिटीश नौदलाकडून वसूल करणार आहे. या सर्वात भारतीय मीम्स कलाकारांना मुक्त वाव मिळाला आहे. या लढाऊ विमानावर नको तेवढ्या मीम्स तयार करुन ब्रिटन आणि अमेरिकेला हैराण करण्यात येत आहे. काही जणांना या सर्वात ट्रम्प यांचा भारताला ही बनावट विमाने विकण्याचा मोठा डाव उघड झाल्याचे दिसत आहे. तर काही मीम्समध्ये जत्रेत फोटो काढण्यासाठी या विमानाचा उपयोग होत असल्याचे दाखवण्यात आले आहे. (Kerala)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics