तब्बल १९ वर्षांनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. मागील अनेक वर्षांपासून अनेकांची त्यांना एकत्र पाहण्याची इच्छा आज अखेर पूर्ण झाली. माराही अस्मितेच्या मुद्द्यावरून आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा विजयी मेळा संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्रातील अगणित कार्यकर्ते आणि दोन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. (Thackeray Melava)
सुरुवातीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषणास सुरुवात केली. राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात सन्मानीय उद्धव ठाकरे असं म्हणतं केली.. ते त्यांच्या भाषणात म्हणाले, “आजचा हा मेळावा शिवतीर्थावर मैदानात व्हायला हवा होता. मैदान ओसंडून वाहिले असते. मी बाहेर उभं असलेल्यांची दिलगिरी व्यक्त करतो. मी माझ्या एका मुलाखतीत म्हटले होते की माझा महाराष्ट्र कोणत्याही राजकारणापेक्षा आणि लढाईपेक्षा मोठा आहे. आज २० वर्षांनंतर मी आणि उद्धव एकत्र आलो आहोत. बाळासाहेब जे करू शकले नाहीत ते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आपल्या दोघांना एकत्र आणण्याचे काम.”, आम्ही हिंदी भाषेच्या विरोधात नाहीत, परंतु जनतेवर कोणतीही भाषा लादणे योग्य नाही.” (Todays Marathi HEadline)
राज ठाकरेंनंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या विजयी मेळाव्याच्या भाषणात भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका केली. त्यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “गद्दारी करून आमचे सरकार पाडले. तुमचे मालक तिकडे बसले आहेत. त्यांचे बुड चाटण्यासाठी तुम्ही हे सगळ करत आहात. ते म्हणतात म हा महापालिकेचा आहे. अरे म महाराष्ट्राचा आहे. आम्ही महाराष्ट्रही काबीज करू. आमच्यावर सक्ती केली तर अशी शक्ती दाखवू की पुन्हा तुम्ही डोके वर काढणार नाही. आज आपण एकत्र आलो. आता हे पुन्हा काड्या घालण्याचे काम करतील. कोणाच्याही लग्नात भाजपला बोलावू नका. श्रीखंड, बासुंदी पुरी खातील आणि नवरा-बायकोमध्ये भांडणे लावून दुसऱ्या लग्नात जातील. नाही तर पोरीलाच पळवून नेतील.” (Top Marathi News)
पुढे उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, “आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर आमच्या भाषणापेक्षा आमचचे एकत्र दिसणे महत्वाचे आहे. आपल्यातील भांडणे विसरून जे आमच्यासाठी इथे एकत्र आले त्यांचे अभिनंदन. आमच्यातील आंतरपाठ अनाजी पंतांनी दूर केला आणि आम्ही एकत्र आलो आहोत. आम्ही दोघ एकत्र आलो आहोत पण त्यासाठी कोण लिंबू कापत आहे, उतारा टाकत आहे. कोणी टाचण्या मारत आहे, कोणी रेडे कापत असतील अशा सर्वांना माझे एकच सांगणे आहे या अंधश्रद्धेच्या विरोधात आमच्या आजोबांनी लढा दिला होता. आम्ही सुद्धा देऊ.” शिवाय त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास काढताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीकास्त्र सोडले. (Social NEws)
दरम्यान ठाकरे बंधूंची ही ऐतिहासिक भेट येत्या महापालिका निवडणुकीपूर्वीचा एक मोठा राजकीय संकेत असल्याचे म्हटले जात आहे. मुख्य म्हणजे उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्याच्या त्यांच्या भाषणात “आम्ही एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी” असे म्हणत मनसेसोबत युती करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत, त्यामुळे भविष्यात जर शिवसेना ( उबाठा गट) आणि मनसे यांची युती झाली तर आश्चर्य वाटायला नको. (Latest Marathi News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics