Home » Hair Care : ‘हे’ उपाय करा आणि पावसाळ्यातही टिकवा केसांचे सौंदर्य

Hair Care : ‘हे’ उपाय करा आणि पावसाळ्यातही टिकवा केसांचे सौंदर्य

by Jyotsna Kulkarni
0 comment
Hair Care | Top Stories
Share

सगळ्यांना हवाहवासा वाटणारा हा पावसाळा हा ऋतू सुरु झाला असून, सगळीकडे आनंदीआनंद निर्माण आहे. उन्हाच्या तडाख्यानंतर सगळ्यांनाच पावसाची प्रतीक्षा असते. पावसाळा जरी सगळीकडे आनंद आणि उत्साह घेऊन येत असला तरी सोबत अनेक आजार आणि अनेक समस्या घेऊन येतो. पावसाळ्यात आपले आरोग्य जपणे आपल्यासमोर मोठे आव्हानच असते. कारण पावसाळ्यात आद्र्रतेचे परिमाण फार वाढते. यामुळे अनेक आजार उदभवतात. पावसामुळे आपल्या आरोग्यासोबतच केसांच्या अनेक समस्या देखील निर्माण होतात. (Marathi NEws)

पावसाळामुळे आपले केस ओलसर होतात, केस निस्तेज आणि फ्रीझी होऊ लागतात. स्कॅल्प तेलकट होते, केसांची टोकं कोरडी पडणे, केस गळू लागतात, केस खडबडीत होण्याची आणि गळण्याची समस्याही वाढू लागते. पावसाळ्यात केस गळतीच्या समस्येने अनेक जण त्रस्त असतात. या ऋतूमध्ये कोंडा ही देखील एक सामान्य समस्या आहे. पावसात भिजल्याने टाळूमध्ये बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याचा धोका देखील असतो. त्यामुळे पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी आपण काही घरगुती उपाय करू शकतो. (Todays Marathi HEadline)

> पावसाळा येताच बहुतेक लोकांना केस गळतीची समस्या होऊ लागते कारण या ऋतूमुळे केस रुक्ष आणि कोरडे होतात. अशावेळी या ऋतूत हेअर कंडिशनिंग जरूर करावे.

> पावसाळा सुरू झाल्यानंतर दररोज केसांच्या विविध हेअर स्टाइल करणे टाळावे. या हेयर स्टाइलमुळे देखील केस डॅमेज होतात. आणि जरी हेअर स्टाइल करायच्या असतील तर हेअर स्प्रे, हेअर जेलचा वापर पावसाळ्यात करणे टाळा. (Marathi Latest News)

Hair Care

> पावसाळ्यात, तुमचे केस आणि टाळू पावसात भिजण्यापासून वाचवणे महत्वाचे आहे. जर तुम्ही पावसात भिजलात तर तुमचे केस आणि टाळू पूर्णपणे वाळवा. मऊ मायक्रोफायबर टॉवेल वापरा त्यामुळे केस तुटण्याचा धोका कमी होतो.

> पावसाळ्यात सतत होणाऱ्या वातावरण बदलामुळे केसांवर त्याचा विपरीत परिणाम होतोच. या वातावरणातील ओलावा, आर्द्रतेमुळे केस तेलकट आणि चिकट होतात. त्यामुळे पावसाळ्यात केस धुण्यासाठी सौम्य शाम्पूचा वापर करावा. आठवड्यातून दोन वेळा केस धुऊन एकदा कंडिशनर लावावे. (Marathi Headline)

> पावसाळ्यात ओले केस झाले असल्यास ते विंचरण्यासाठी मोठ्या दातांचा कंगवा किंवा लाकडी कंगवा वापरा. त्यामुळे केस जास्त तुटणार नाहीत. शिवाय पावसाळ्यात हेअर स्ट्रेटनिंग करणे तसेच सतत आयनिंग करणे टाळावे.

> पावसाळ्यात बुरशीजन्य संसर्ग होण्याची भीती देखील जास्त असते. केसांमध्ये कोणताही संसर्ग होऊ नये म्हणून पावसाळ्यात कोरफड, मेथी आणि आवळा यासारख्या गोष्टींचा वापर करावा, जेणेकरून केसांना अशा संसर्गांपासून वाचवता येईल. (Top Trending News)

> केसांना १५ मिनिटे लिंबाचा रस लावून केस धुतल्यास केसांचा तेलकटपणा तसेच केस चिकट होणार नाहीत.

> केसांना शाम्पू करण्यापूर्वी १५ मिनिटे आधी नारळाचे तेल लावल्याने केसांना प्री-कंडिशनिंग करण्यास मदत होते. केस धुताना नारळाचे तेल केसांमध्ये शोषले जाणारे पाणी कमी करते. तसेच टाळूचा कोरडेपणा कमी होतो.

> पावसाळ्यात पौष्टिक आहार घेणे देखील महत्त्वाचे आहे. आहारात हिरव्या भाज्यांसह अंडी, अक्रोड, दुग्धजन्य पदार्थ आणि धान्य यासारखे प्रथिनेयुक्त पदार्थ खावे आणि सोबतच बेरी, काजू, पालक आणि बीटसारखे पदार्थ केसांच्या वाढीसाठी उत्तम आहेत. (Top Marathi Headline)

Hair Care

> बाहेर जाताना केस ओले होऊ नयेत म्हणून नेहमी पोनीटेल किंवा बनमध्ये बांधा. हे केस गळती रोखेल आणि टाळूला खाज आणि बॅक्टेरियापासून वाचवेल. पावसाळ्यात केस ओले झाल्यास ते बांधू नका. केस धुतल्यानंतर किंवा पावसात केस ओले झाल्यानंतर ते पूर्ण कोरडे होऊ द्या. स्काल्प पूर्ण सुकू द्या. (Marathi Top News)

> पावसाळ्यात भिजल्यावर केस सुकवण्यासाठी ब्लो ड्रायर जास्त वापर करणं टाळा. जरी तुम्हाला तुमचे केस लवकर ब्लो ड्राय करायचे असतील तर केस किमान 60-70 टक्के केस कोरडे होऊ द्या आणि त्यानंतर ब्लोड्रायरचा वापर करा. (Health tips)

> केसांसाठी मेथीचा मास्क अत्यंत गुणकारी आहे. पावसाळ्यात केस केसगळती थांबवण्यासाठी तुम्ही मेथी दाण्यांचा मास्क वापरू शकता. 2-3 चमचे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी त्याची पेस्ट बनवून टाळूवर लावा आणि एक तास ठेवा. त्यानंतर केसांना सौम्य शॅम्पूने धुवा. यामुळे केस मजबूत होतील, लांब आणि दाट दिसतील, तसेच चमकही वाढेल. (Social Updates)

=========

हे ही वाचा : Health : निरोगी आरोग्यासाठी लाभदायक असलेल्या ब्लु टी सेवनाचे फायदे

Health : जाणून घ्या Heart Attack आणि Cardiac Arrest यातला नेमका फरक

==========

> पावसाळ्यामध्ये केस फ्रिझी आणि निर्जीव होतात, ज्यामुळे केस गळण्याची समस्या वाढते. अशावेळी कोरफडीचा गर उत्तम पर्याय आहे. कोरफड केसांना आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करते आणि टाळूच्या इन्फेक्शनपासून बचाव करते. ताजा कोरफडीचा गर घेऊन तो केसांना लावा. १-२ तासांनंतर केस शॅम्पूने धुवा. यामुळे केस चमकदार आणि मऊ बनतील. तसेच केस गळणेही कमी होईल. (Top Stories)

> पावसाळ्यात तुम्ही कडुलिंबाच्या पाण्याने केस धुतल्यास देखील केसांचे आरोग्य उत्तम राहते. यामुळे केस गळणे थांबते. कडुलिंबामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-सेप्टिक गुणधर्म असतात, जे केसांचे अनेक समस्यांपासून संरक्षण करतात आणि टाळूचे इन्फेक्शन दूर करतात. कडुलिंबाची पाने पाण्यात टाकून उकळून घ्यावी आणि त्या पाण्याने केस धुवावे. यामुळे केस गळणे थांबेल आणि केसांची वाढही वेगाने होईल. (Social News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.