Home » Chaturmas : चातुर्मास म्हणजे काय? काय आहेत त्याचे नियम?

Chaturmas : चातुर्मास म्हणजे काय? काय आहेत त्याचे नियम?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Chaturmas | Latest Marathi News
Share

येत्या ६ जुलै आषाढी एकादशी आहे. संपूर्ण वर्षातील अतिशय महत्वाची आणि मोठी एकादशी म्हणून आषाढी एकादशीची ओळख आहे. दक्षिण काशी अशी ओळख असणाऱ्या पंढरपूरची मोठी यात्रा देखील याच आषाढी एकादशीला असते. संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी पायी चालत पंढरपुरात पोहचतात आणि विठुरायाचे दर्शन घेतात. आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी असे देखील म्हटले जाते. या दिवसाचे अजून एक वैशिष्ट्ये म्हणजे या दिवसापासून चातुर्मास देखील चालू होतो. (What is Chaturmas?)

या चातुर्मासात भगवान विष्णू निद्राधीन होतात आणि श्रृष्टीचा कारभार भगवान शिवाच्या हातात सोपतात. आषाढी एकादशीपासून पुढील चार महिने चातुर्मास असतो. त्यामुळे याकाळात भगवान विष्णूची आराधना करणे शुभ समजले जाते. मात्र या चातुर्मासात कोणतेही शुभ कार्य केले चांगले मानले जात नाही. कारण, या काळात भगवान विष्णू आणि इतर देव झोपी जातात, अशी धार्मिक मान्यता आहे. या काळात कोणतेही शुभ कार्य जरी होत नसले तरी, नामजप, ध्यान, पठण, आणि आत्मनिरीक्षणासाठी हा काळ खूप चांगला मानला जातो. (Marathi News)

यंदाचा २०२५ मधील चातुर्मास हा ६ जूलैपासून सुरू होणार असून १ नोव्हेंबर रोजी संपेल. हिंदू धर्मातील कालगणेनुसार आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंतचा जो काळ असतो त्याला चातुर्मास म्हणतात. हा चार महिन्यांचा काळ अत्यंत पवित्र समजला जातो. या चातुर्मासात आषाढ महिन्याचे वीस दिवस, श्रावण, भाद्रपद आणि अश्विन या तीन महिन्यांचे संपूर्ण ३० दिवस आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस समाविष्ट असतात. देवशयनी एकादशीपासून ते देवउठनी अर्थात कार्तिक एकादशीपर्यंत भगवान विष्णू क्षीरसागरात निद्राधीन असतात. (Todays Marathi Headline)

Chaturmas

चातुर्मासामध्ये भगवान विष्णू संपूर्ण जगाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी भगवान शंकरावर सोपवून योगनिद्रेमध्ये जातात. त्यामुळे, चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकरांची पूजा अर्चना केली जाते. हा श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय समजला जाणारा महिना असतो. धार्मिक मान्यतेनुसार जो भक्त या महिन्यात खऱ्या मनाने भगवान शंकरांची आणि विष्णूंची पूजा करतो, त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. चातुर्मासात अनेक नियम देखील पळाले जातात. अनेक लोकं एकभुक्त करतात, कोणी एकसारखेच जेवण जेवतात, कोणी दररोज कृष्णाला तुळशी वाहतात आदी अनेक नियम लोकं पाळतात. (Top Marathi HEadline)

चातुर्मासात आहारासंदर्भात काही नियम तयार केले आहेत. या काळात एकच वेळ जेवण करणे उत्तम मानले जाते. चातुर्मासात अनेक लोकं एकभुक्त करतात. अर्थात एकवेळेस जेवतात. असे केल्याने आपले आरोग्य चांगले राहते. या चार महिन्यांत जेवढे सात्विक कराल तेवढे मनुष्याला आणि त्याच्या आरोग्याला चांगले असते. श्रावणात भाजी, भाद्रपदात दही, अश्विन महिन्यात दूध आणि कार्तिक महिन्यात डाळी खाणे टाळावे. या काळात जमेल तेवढी देवाची भक्ती आणि आराधना करावी. (Latest Marathi NEws)

चातुर्मासाच्या चार महिन्याच्या काळात पुजा, सत्संग, दान, यज्ज्ञ आदी गोष्टी करणे शुभ समजले जाते. या महिन्यात सूर्योदयापूर्वी उठून स्नान करणे देखील लाभदायक ठरते. चातुर्मासात सात्विक अन्न खावे. शिवाय या काळात जमेल तेवढा दान-धर्म करावा. गरजूंना कपडे दान करावे. आषाढ महिन्यात गुरुची पूजा करावी. श्रावण महिन्यात भगवान शिवाची पूजा करावी.भाद्रपदात श्रीकृष्णाची, अश्विनमध्ये देवी आणि श्रीरामाची तर कार्तिकमध्ये श्री हरी आणि तुळशीची पूजा केल्यास पुण्यप्राप्ती होते. चातुर्मासात कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई असते. या काळात लग्न, गृहप्रवेश, मुंडन आदी करणे टाळावे. काळ्या रंगाचे कपडे चातुर्मासात घालू नये. (Top Stories)

===========

हे ही वाचा : 

Wajid Ali Shah : ‘एक कलाप्रेमी राजा : वाजिद अली शाह’, पण या कारणास्तव राहिला चर्चेत

Tara Bhawalkar : मराठी लोकसाहित्य आणि स्त्रीवादी साहित्य क्षेत्रातील संशोधक- डॉ. तारा भवाळकर

===========

धार्मिक मान्यतेनुसार, चातुर्मासात भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये जातात. भगवान विष्णू सृष्टीचे रक्षक मानले जात असल्याने त्यांच्या झोपेच्या वेळी ही कामे करणे योग्य मानले जाते. कारण, या काळात शुभ कर्मांचे फळ मिळत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर चातुर्मास पावसाळ्यात येत असल्याने या दिवसात हवामान दमट असते. या वातावरणात बॅक्टेरिया अधिक असतात, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढतात. प्रवास करणे देखील कठीण होते. अशावेळी शुभ कार्ये करणे आरोग्याच्या दृष्टीने चुकीचे ठरू शकते. (Social Updates)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.