झी मराठीवरील तुफान गाजलेला लोकप्रिय शो ‘चला हवा येऊ द्या’ मागच्यावर्षी बंद झाला. शो बंद झाल्यानंतर अनेकांनी हा शो पुन्हा चालू करण्याची मागणी केली होती. अखेर प्रेक्षकांच्या मागणीनुसार हा शो पुन्हा एकदा सुरु होत आहे. नुकतीच ‘चला हवा येऊ द्या २’ या शोची घोषणा करण्यात आली. मात्र या शोमध्ये अनेक बदल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. जसे की या शोचा कर्ताधर्ता असलेला निलेश साबळे शोमध्ये दिसणार नसून त्याच्या ऐवजी अभिनेता अभिजित खांडकेकर या शोचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.
या बातमीनंतर अनेकांनी सोशल मीडियावर कमेंट्स करत आपल्याल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यातच प्रसिद्ध ज्योतिषी शरद उपाध्याय हे देखील होते. शरद यांनी पोस्ट शेअर करत निलेश साबळेवर अनेक आरोप करत, त्याला अहंकारी, गर्विष्ठ म्हटले होते. त्यांची ही पोस्ट कमालीची व्हायरल झाली. या पोस्टवर आता निलेश साबळेने एक व्हिडिओ शेअर करत उत्तर दिले आहे. निलेश साबळेने त्याच्या व्हिडिओमध्ये काय म्हटले आहे जाणून घेऊया. (Celebrity News)
“नमस्कार मी डॉ. निलेश साबळे, राशीचक्रकार शरद उपाध्ये सर… खरंतर त्यांचा फोन नंबर माझ्याकडे होता आणि माझाही त्यांच्याकडे आहे. पण, त्यांना सोशल मीडियावर पोस्ट शेअर करूनच व्यक्त व्हायचं होतं. त्यामुळे जरी मी सोशल मीडिया फार वापरत नसलो, तरी आज सोशल मीडिया वापरण्याची वेळ आलीये. मला नेहमी वाटायचं या माध्यमावर फक्त मनोरंजनाचे व्हिडीओ शेअर केले पाहिजे, जेणेकरून आपलं लोकांना हसवणं हे काम आहे आणि तेवढंच आपण करू पण, कधी असा व्हिडीओ करावा लागेल असं मला वाटलं नव्हतं. पण अशा गोष्टी कराव्या लागतात…. (Marathi News)
View this post on Instagram
सन्माननीय शरद उपाध्ये सर तुमची आणि माझी एक ते दोन वेळेस भेट झाली होती. कशी तीही मी प्रेक्षकांना सांगणार आहे. तुम्ही माझ्यासाठी गुरुतुल्य आहात. गुरुतुल्य होतात आणि पुढेही राहाल. परंतु तुम्ही काल तुम्ही तुमच्या पोस्टची सुरुवात ‘झी मराठीने निलेश साबळेंना डच्चू दिला’, अशी झाली. निलेश साबळे यांना डच्चू दिला म्हणालात, तुम्हाला यातली काही माहिती आहे का? डच्चू दिला हकालपट्टी केली? असं म्हणतात, त्यांना सर्वांना माहिती द्यायची आहे. त्या कार्यक्रमाला मी नाही म्हटलं आहे. तुम्हाला माहिती नसेल, त्यामुले म्हणतोय की, तुम्ही ही माहिती घ्यायला हवी होती. (Top Marathi Headline)
शरद उपाध्ये सर तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त लोक फॉलो करतात. आणि तुम्हाला गुरु म्हणून फॉलो करतात. त्यामुळे तुमची जबाबदारी जास्त होती. झी मराठी मध्ये तुमच्याही भरपूर ओळखी आहेत. तुम्ही एक फोन करुन विचारु शकला असतात की काय झालंय? निलेश साबळे या कार्यक्रमात का नाही? तुम्ही झी मराठीमध्ये कोणाला तरी विचारायला हवं होतं. माहिती घ्यायला हवी होती. झी मराठीच्या हेड पदावर असणाऱ्या व्यक्तीने मला अनेक कॉल केले होते. मी नाव घेऊन बोलू शकतो. (Top Trending Marathi NEws)
सन्माननीय रोहन राणे हे नॉन फिक्शन हेड होते. त्यांनी सहा महिन्यात अनेक वेळा कॉल केले होते. आपण चला हवा येऊ द्या सुरु करतोय.. डॉक्टर ते तुमच्याशिवाय होणार नाही. एकदा आपण मीटिंग करायला पाहिजे. दोन महिन्यांपूर्वी आमची सविस्तर मीटिंग झाली. ही बैठक वरळीच्या ऑफिसला झाली. मी सध्या एक सिनेमा करतोय, त्यामध्ये मी अडकलो. माझ्या काही अडचणी होत्या. त्याच शूटींग आणखी दीड महिना सुरु राहणार आहे. त्यामुळे आणि तारखा न जुळल्यामुळे माघार घ्यायची मी रिक्वेस्ट केली. (Latest Marathi News)
याचा अर्थ असा नव्हता की, मला कार्यक्रम करायचा नव्हता. मी नकार दिला. मी स्वत:हून या कार्यक्रमातून बाहेर पडलोय. मी स्वत; म्हणालोय, की मला सध्या आता तरी या कार्यक्रमात भाग घ्यायचा नाहीये. सेम भाऊ कदम सरांचं सुद्धा आहे. भाऊ सध्या माझ्याबरोबर माझ्याच सिनेमात काम करत आहेत. तेही या कार्यक्रमात नाहीयेत. दोन माणसं या कार्यक्रमात नाहीयेत. याचं कारण तुम्ही जाणून घेतलं का? (Todays Marathi Headline)
उपाध्ये सर तुम्ही म्हणालात की, निलेश साबळेंच्या स्टेजवर माझा अपमान झाला आणि मीच तो केला असं तुमचं मत आहे. मला याबद्दल सांगायचं आहे की, २०१४ ते २०१५ च्या मध्ये हा एपिसोड शूट झाला. तेव्हा हा कार्यक्रम नवा होता. कार्यक्रमांच्या पहिल्या ५० भागांमधला हा एक भाग आहे. १० वर्ष झाली डोक्यात हवा गेली हे जे वाक्य आहे, त्यामध्ये पुन्हा प्रॉब्लेम होतोय. कारण ५० एपिसोडच झालेले आहेत. त्यामुळे पहिल्या काही भागांमध्येच माझ्या डोक्यात हवा गेली असेल, असा मिश्किल टोलाही निलेश साबळे यांनी लगावला. (Marathi Top News)
View this post on Instagram
शरद उपाध्ये सर म्हणाले, मला पाणी देखील विचारण्यात आलं नाही. तर याबद्दल मी सांगतो की, झी मराठीने हे सगळं पाहाण्यासाठी एक कंपनी नेमलेली आहे. ती कंपनी गेली अनेक वर्ष हा कारभार उत्तमपणे राबवते. कंपनीचे किती लोक काम करतात, हे कार्यक्रमाच्या शूटिंगला आलेल्या प्रत्येकाला माहिती आहे. चॅनेलची माणसं आलेल्या कलाकारांना रिसिव्ह करण्यापासून मेकअप रुमपर्यंत नेण्याचं काम देखील करत असतात. क्लासिक स्टुडिओला याचं चित्रीकरण झालं होतं. तेथील सर्वात मोठी रुम सरांनी देण्यात आली होती. मेकअप रुममध्ये पाण्याच्या बाटल्या असतात. त्याच्या आयोजनासाठी मीटिंग देखील झालेल्या असतात.” (Marathi NEws)
निलेश साबळेने या व्हिडिओमध्ये पुढे तो शो का होस्ट करत नाही याचे कारण देखील सांगितले आहे. तो म्हणाला, “सध्या मी एका सिनेमाचं काम करत आहे आणि त्यात मी अडकलेलो आहे. काही वैयक्तिक अडचणीही होत्या. या चित्रपटाचं शूटींग अजून दीड महिना चालणार आहे. त्यामुळे आणि तारखा जुळत नसल्यामुळे मी स्वत:हून त्या कार्यक्रमातून माघार घेण्याची विनंती केली. याचा अर्थ असा नव्हता की मला तो कार्यक्रम करायचाच नव्हता किंवा मी स्पष्टपणे नकार दिला. (Social Updates)
मी माझ्या इच्छेनं सध्या तरी त्या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. हाच निर्णय भाऊ कदम सरांनीही घेतला आहे. सध्या तेही माझ्यासोबत याच सिनेमात काम करत आहेत आणि म्हणूनच ते देखील त्या कार्यक्रमात सहभागी नाहीत. या कार्यक्रमातून आम्ही दोघंही अनुपस्थित आहोत आणि त्यामागचं खरं कारण जाणून घेण्याचा कुणी प्रयत्न केलाय का? अभिजीत हा आमचा खूप चांगला मित्र आहे. अभिजीत माझ्यापेक्षा चांगला अँकर आहे. त्याला माझ्या सल्लाची गरज नाहीये. चला हवा येऊ द्याचा नवा सीझन सुरू होतोय त्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा”. (Top Stories)
=========
हे ही वाचा : Sharad Upadhye : ‘गर्विष्ट माणसाचे अध:पतन होते’ शरद उपाध्याय यांचा निलेश साबळेवर थेट निशाणा
==========
आता यावर शरद उपाध्याय काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे असेल. दरम्यान लवकरच चला हवा येऊ द्या शोचे दुसरे पर्व सुरु होत आहे. आता या नवीन पर्वत शोमध्ये काय बदल असतील? यात कोण कोणते कलाकार दिसलतील? आदी सर्वच प्रश्नांची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत. या पर्वाला प्रेक्षकांकडून कसा प्रासाद मिळतो हे पाहावे लागेल. (Social News)