Home » Narendra Modi : अभिमानास्पद! पंतप्रधान मोदींना मिळाला घानाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान

Narendra Modi : अभिमानास्पद! पंतप्रधान मोदींना मिळाला घानाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान

by Jyotsna Kulkarni
0 comment
Narendra Modi | Top Marathi Headlines
Share

भारताचे पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदी यांचा संपूर्ण जगातच डंका आहे. जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांमध्ये त्यांचा कायमच वरचा नंबर लागतो. लोकप्रियतेच्या बाबतीत देखील मोदी आघाडीवर असतात. नरेंद्र मोदी यांनी मागील काही वर्षांमध्ये त्यांच्या कामाने आणि त्यांच्या कर्तृत्वाने सगळ्यांचाच मनात घर केले आहे. अशा या मोदींना आजवर अनेक विविध प्रकारचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. आज त्यांच्या या पुरस्कारांच्या यादीत अजून एका प्रतिष्ठेच्या पुरस्काराची भर पडली आहे. (Narendra modi)

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यावर आहेत. या विदेश दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील, नामिबिया या देशांना भेट देणार आहेत. यादरम्यानच २ जुलै बुधवारी रोजी त्यांनी घाना या देशाला भेट दिली. घानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जल्लोषात स्वागत झाले. मोदी यांचा हा पहिलाच घाना दौरा आहे. मागच्या काही दशकांमध्ये पहिल्यांदाच कोणतेही भारतीय पंतप्रधान घानाला भेट देत आहेत. मोदींचे स्वागत करण्यासाठी घानाचे राष्ट्रपती जॉन ड्रामानी महामा यांनी विमानतळावर हजेरी लावली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गार्ड ऑफ ऑनरसह २१ तोफांची सलामी सुद्धा देण्यात आली. (International News)

मुख्य म्हणजे यावेळी पंतप्रधान मोदी यांना घानाचा सर्वोच्च पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला. पंतप्रधान मोदींना घानाचा सर्वोच्च सन्मान असलेल्या ‘द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’ हा सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळणे भारतासाठी आणि पंतप्रधान मोदींसाठी मोठी अभिमानाची बाब ठरली आहे. (Marathi News)

Narendra Modi

पंतप्रधान मोदींच्या या भेटी दरम्यान भारत आणि घाना या दोन्ही देशांनी त्यांच्यातले सहकार्य वाढवण्यावर भर दिला. या दोन्ही देशांमध्ये चार महत्त्वाचे सामंजस्य करार करण्यात आले आहे. या भेटीनंतर पंतप्रधान मोदींनी एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, ”भारत आणि घाना हे दोन्ही देश दहशतवदाला मानवतेचा शत्रू मानतात, त्यामुळेच हे दोन्ही देश दहशतवादविरोधी सोबत काम करण्यास कायम वचनबद्ध असतील.” यासोबतच मोदींना घानाचा सर्वोच्च सन्मान मिळाल्यानंतर ते म्हणाले, घानाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित होणे ही माझ्यासाठी आणि भारतासाठी गौरवाची बाब आहे.’ पंतप्रधान मोदी यांनी हा सन्मान भारतातील नागरिकांना समर्पित केला आणि या सन्मानाबद्दल घानाचे आभार मानले.(Todays Marathi Headline)

दरम्यान पंतप्रधान मोदींना पहिल्यांदाच कोणता जागतिक पुरस्कार मिळाला आहे , असे नाही. याआधी देखील मोदींना जगातील अनेक देशांनी त्यांच्या सर्वोच्च सन्मान देऊन गौरवण्यात आले आहे. जाणून घेऊया आजवर मोदींना कोणकोणत्या देशांनी सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

> ३ एप्रिल २०१६ रोजी पंतप्रधान मोदींना सौदी अरेबियाने ‘ऑर्डर ऑफ अब्दुलअजीज अल सौद’ने सन्मानित केले. (Pm Modi News)

> ४ जून २०१६ रोजी पंतप्रधान मोदींना अफगाणिस्तानने ‘स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर अमानुल्ला खान’ पुरस्काराने सन्मानित केले.

> १० फेब्रुवारी २०१८ रोजी पंतप्रधान मोदींना ‘ग्रँड कॉलर ऑफ स्टेट ऑफ पॅलेस्टाईन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

> ८ जून २०१९ रोजी मालदीवने पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ इज्जुद्दीन’ने सन्मानित केले.

> २४ ऑगस्ट २०१९ रोजी पीएम मोदींना UAE द्वारे ‘ऑर्डर ऑफ झायेद’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.(Top Trending News)

> २४ ऑगस्ट २०१९ रोजी, पीएम मोदींना बहरीनने ‘किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसान्स’ने सन्मानित केले.

Narendra Modi

> २१ डिसेंबर २०२० रोजी अमेरिकेने पंतप्रधान मोदींना ‘लीजन ऑफ मेरिट’ पुरस्काराने सन्मानित केले.

> २२ मे २०२३ रोजी, फिजीने आपला सर्वोच्च नागरी सन्मान, ‘कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी’ प्रदान केला.(Top Marathi HEadline)

> २२ मे २०२३ रोजी PM मोदींना पापुआ न्यू गिनी द्वारे ‘कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द पीपल’ ने देखील सन्मानित करण्यात आले.

> २५ जून २०२३ रोजी पंतप्रधान मोदींना इजिप्तमध्ये ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ने सन्मानित करण्यात आले.

> १४ जुलै २०२३ रोजी फ्रान्सने पंतप्रधान मोदींना ‘लीजन ऑफ ऑनर’ने सन्मानित केले.

> २५ ऑगस्ट २०२३ रोजी ग्रीसने पंतप्रधान मोदींना ‘ग्रँड क्रॉस ऑर्डर ऑफ ऑनर’ने सन्मानित केले. (Latest Marathi News)

> २४ मार्च २०२४ रोजी भूतानने पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ द ड्रॅगन किंग’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले.

> ९ जुलै २०२४ रोजी रशियाने पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू’ पुरस्काराने सन्मानित केले.

===========

हे ही वाचा : 

Wajid Ali Shah : ‘एक कलाप्रेमी राजा : वाजिद अली शाह’, पण या कारणास्तव राहिला चर्चेत

Tara Bhawalkar : मराठी लोकसाहित्य आणि स्त्रीवादी साहित्य क्षेत्रातील संशोधक- डॉ. तारा भवाळकर

===========

> २०१९ रोजी पंतप्रधान मोदींना पहिला फिलिप कोटलर राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

> २०१८ साली पंतप्रधान मोदींना बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन कडून ग्लोबल गोलकीपर पुरस्कार युनायटेड नेशन्स चॅम्पियन्स ऑफ द अर्थ अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले होते.

> २०२१ साली पंतप्रधान मोदींना जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्कार देण्यात आला होता. (Social Update)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.