बॉलिवूडमधील अतिशय सुंदर आणि प्रतिभासंपन्न अभिनेत्री म्हणून दीपिका पदुकोणला ओळखले जाते. दीपिकाने आपल्या प्रतिभेच्या जोरावर बॉलिवूडमधील आघाडीची आणि सर्वात जास्त फी घेणारी अभिनेत्री म्हणून नावलौकिक मिळवला आहे. मधल्या काही काळापासून चित्रपटांपासून दूर असणारी दीपिका तिचे मदरहूड एन्जॉय करत आहे. असे असले तरी ती कायम विविध गोष्टींमुळे लाइमलाइटमध्ये येतच असते. बॉलिवूडसोबतच हॉलिवूड गाजवणारी दीपिका अचानक तुफान चर्चेत आली आहे. दीपिकाने एक मोठी गोष्ट अचिव्ह केली असून, यामुळे केवळ बॉलिवूडचेच नाही तर भारताचे देखील नाव मोठे झाले आहे. (Marathi News)
दीपिकाला एक मोठा गौरव मिळाला आहे, ज्यामुळे देशाची मान उंचावली आहे. दीपिका पदुकोणला हॉलिवूड चेंबर ऑफ कॉमर्सने तिला ‘हॉलिवूड वॉक ऑफ फेम’ मध्ये एक स्टार देण्याची नुकतीच घोषणा केली आहे. हा सन्मान तिला २०२६ च्या ‘मोशन पिक्चर्स’ श्रेणीमध्ये देण्यात येणार आहे. ग्लॅमर जगात कोणाच्याही पाठिंब्याशिवाय दीपिकाने तिच्या मेहनतीने, स्वकर्तृत्वावर जगभरात स्वतःचे नाव कमावले आहे. अशातच टिळा मिळालेल्या या मोठ्या जागतिक पुरस्कारामुळे तिच्या चाहत्यांना तिचा अभिमान वाटत आहे. सोशल मीडियावर तर दीपिकाचे अभिनंदन करणाऱ्या असंख्य पोस्ट केल्या जात आहे. (Celebrity News)
ओव्हेशन हॉलिवूडच्या लाईव्ह पत्रकार परिषदेत बिलबोर्डने हॉलिवूड वॉक ऑफ फेमसाठी नवीन नावांची यादी अधिकृत केल्याची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय अभिनेत्री असलेल्या दीपिका पदुकोणच्या नावाची घोषणा यावेळी केली गेली आणि सगळ्यांनाच आनंद झाला. तिच्या व्यतिरिक्त, या यादीत फ्रेंच अभिनेत्री मॅरियन कोटिलार्ड, अमेरिकन अभिनेत्री मायली सायरस, टिमोथी चालमेट, एमिली ब्लंट, इटालियन अभिनेता फ्रँको नीरो, कॅनेडियन अभिनेत्री राहेल मॅकअॅडम्स आणि सेलिब्रिटी शेफ गॉर्डन रॅमसे यांच्यासह अनेक कलाकारांच्या नावाचा समावेश आहे. (Bollywood News)
हॉलिवूड वॉक ऑफ फेममध्ये आपले स्थान निर्माण करणारी दीपिका पदुकोण ही पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे. जागतिक पातळीवर देखील तिच्यासाठी ही एक मोठी कामगिरी आहे. हॉलिवूड चेंबर ऑफ कॉमर्सच्या वॉक ऑफ फेम निवड पॅनेलने अनेक स्टार्सच्या यादीत दीपिकाचे नाव निवडले आहे. दीपिका केवळ भारतात नाही तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. जगभरात तिचे अगणित चाहते आहेत. (Todays Marathi HEadline)
हॉलिवूड वॉक ऑफ फेममध्ये आपले स्थान निर्माण केल्यानंतर दीपिका पादुकोणने काही वेळापूर्वी यावर प्रतिक्रिया देखील दिली. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने केवळ एका शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दीपिकाने लिहिले, ‘कृतज्ञता.’ सध्या दीपिकाची ही पोस्ट कमालीची व्हायरल होत आहे. (Top Marathi Headline)
हॉलिवूड वॉक ऑफ फेम म्हणजे काय?
हॉलिवूड वॉक ऑफ फेममध्ये आपले स्थान निर्माण करणारी दीपिका चांगलीच गाजत आहे. मात्र हॉलिवूड वॉक ऑफ फेम म्हणजे काय? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. तर हॉलिवूड वॉक ऑफ फेम हे कॅलिफोर्नियातील एक प्रसिद्ध टुरिस्ट प्लेस आहे. १५ ब्लॉकमध्ये पसरलेल्या या ठिकाणी आतापर्यंत २५०० पेक्षा अधिक कलाकारांची स्टार्सला देण्यात आली आहेत. इथे स्टार लावले जातात आणि त्यावर कलाकारांची नावे लिहिली जातात. या स्टारवर चित्रपट उद्योगातील प्रसिद्ध सेलिब्रिटींची नावे लिहिली आहेत. यात अभिनेते, गायक, दिग्दर्शक आणि निर्माते ज्यांनी या मनोरंजनविश्वात आपले योगदान दिले आहे त्या मोजक्या लोकांची नावे यात लिहिली जातात. हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे जिथे दरवर्षी लाखो लोक भेट देण्यासाठी येतात. (Latest Marathi NEws)
=========
हे ही वाचा : Kshiti Jog : क्षिती जोगने तिच्या आयुष्यातील ‘त्या’ खास व्यक्तीसाठी शेअर केली पोस्ट
Sharad Upadhye : ‘गर्विष्ट माणसाचे अध:पतन होते’ शरद उपाध्याय यांचा निलेश साबळेवर थेट निशाणा
==========
दरम्यान दीपिकाने याआधी देखील अनेकवेळा जागतिक स्तरावर विविध सन्मान मिळवत देशाचा नावलौकिक वाढवला आहे. तिला याआधी २०१८ साली जगातील सर्वात प्रभावशाली १०० व्यक्तींच्या यादीत स्थान मिळाले होते. यासोबतच तिला टाईम १०० इम्पॅक्ट पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता. यशिवाय तिने कतारमध्ये झालेल्या फिफा विश्वकपच्या अंतिम सामन्यात ट्रॉफी रिव्हिल केली होती. २०१७ मध्ये विन डिझेलसोबत ‘xXx: रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटात ती दिसली होती. दीपिकाने इतरही अनेक पुरस्कार आणि सन्मान प्राप्त करत नावलौकिक मिळवला आहे. (Social Updates)
दरम्यान दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, ती लवकरच अल्लू अर्जुन स्टारर आणि एटली दिग्दर्शित AA22xA6 या सिनेमात दिसणार आहे. सध्या तरी सिनेमाचे नाव जाहीर झाले नसले या सिनेमात ती दिसणार असल्याचे नक्की झाले आहे. दीपिका शेवटची ‘कल्की 2898’ या सिनेमात प्रभाससोबत झळकली होती. (Top Stories)