Health Care : आजच्या काळात फिटनेससाठी आणि बॉडीबिल्डिंगच्या युगात प्रोटीन पावडरचा वापर झपाट्याने वाढत आहे. जिममध्ये जाणारे अनेक तरुण आणि तरुणी प्रोटीन सप्लिमेंट घेतात. पण दुर्दैवाने या मागणीचा गैरफायदा घेत काही व्यापारी ग्लुकोज अथवा साखरयुक्त पावडर “प्रोटीन” म्हणून विकत आहेत. ही फसवणूक केवळ आर्थिक नाही, तर ती आपल्या आरोग्याशीही धोका निर्माण करणारी आहे. त्यामुळे प्रोटीनच्या नावाखाली जर आपल्याला ग्लुकोज पाजलं जात असेल, तर ते ओळखणं अत्यंत गरजेचं आहे.
खरं प्रोटीन हे पाण्यात सहज विरघळत नाही; त्यात गाठी येतात आणि काहीवेळा त्याला सौम्य वास किंवा कडवट चव असते. त्याच्या उलट, ग्लुकोज मिश्रित पावडर सहज विरघळते, चविला गोडसर लागते आणि पाण्यात मिसळल्यावर द्रावण थोडं चिकटसर वाटू लागतं. आपण वापरत असलेली पावडर जर चविला फारशी गोड लागत असेल, तर ती प्रोटीन नसून ग्लुकोज असण्याची शक्यता असते. याशिवाय, शंकास्पद प्रोटीन सप्लिमेंट घेतल्यानंतर जर थकवा जाणवण्याऐवजी क्षणिक ऊर्जा मिळत असेल, पण ती लगेच उतरते, तरही ते ग्लुकोजमुळे झालेलं असू शकतं.

Health Care
यासोबतच, घटक सूची (Ingredients List) वाचणं खूप महत्त्वाचं आहे. अनेक वेळा पॅकिंगवर ‘Whey Protein’ असं ठळकपणे लिहिलेलं असतं, पण छोट्या अक्षरात “maltodextrin”, “glucose”, “dextrose”, “corn syrup solids” असे साखरजन्य घटक नमूद केलेले असतात. ही यादी तपासल्यास खरी माहिती मिळू शकते. याशिवाय, प्रोटीन घेतल्यानंतर जर रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढत असेल (ग्लुकोमीटरने तपासता येते), तर तीही ग्लुकोज असण्याचं मोठं लक्षण आहे.(Health Care )
============
हे ही वाचा :
Health : निरोगी आरोग्यासाठी लाभदायक असलेल्या ब्लु टी सेवनाचे फायदे
Health : जाणून घ्या Heart Attack आणि Cardiac Arrest यातला नेमका फरक
==============
या सगळ्याचा निष्कर्ष असा की, “प्रोटीन” या नावाखाली आपण काय घेत आहोत, याची पूर्ण खात्री करूनच ते वापरावं. प्रसिद्ध व मान्यताप्राप्त ब्रँड वापरणे, डॉक्टर किंवा न्यूट्रिशनिस्टचा सल्ला घेणे, आणि संपूर्ण लेबल नीट वाचणे ही काळाची गरज आहे. थोडा जास्त खर्च झाला तरी, आपल्या आरोग्याची गमावलेली किंमत मोठी ठरू शकते. म्हणूनच सजग व्हा आणि प्रोटीनच्या नावाखाली ग्लुकोज पिण्याची फसवणूक ओळखा आणि टाळा!