मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये देखील आपल्या अभिनयाची मोहोर उमटवणारी अभिनेत्री म्हणजे क्षिती जोग. मागील अनेक वर्षांपासून क्षिती मराठी मनोरंजनविश्वात कार्यरत आहे. क्षितीने अगदी तिच्या पहिल्या दामिनी मालिकेपासूनच आपल्या दमदार अभिनयाची ओळख सर्वांना करून दिली. मराठी मालिका, चित्रपट यांच्यासोबतच तिने हिंदीमध्ये देखील आपले चांगलेच प्रस्थ निर्माण केले. क्षिती आज मराठी मनोरंजनविश्वामधे एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. कायम या ना त्या कारणांमुळे चर्चेत असणारी क्षिती सध्या तिच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे गाजत आहे. (Kshiti Jog)
क्षितीने सोशल मीडियावर तिच्या आजीसाठी एक खूपच स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबतच तिने तिच्या आजीचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. क्षितीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “शांता आज्जी… आपण कधी भेटलो नाही, मी तुला काम करताना पाहिलं नाही… हे माझं दुर्दैव…तुझ्या कामाचं कौतुक आणि तुझी प्रतिभा सगळ्यांकडून ऐकत आले… नटसम्राट, हिमालयाची सावली, सुर्याची पिल्ले, मंतरलेली चैत्रवेल आणि बरीच…ही सारी तू अजरामर केलेली नाटकं! मराठी रंगभूमीवरचं तुझं योगदान आम्हाला ठेंगणं करणारं आहे…तुझ्या पावलांवर पाऊल ठेवत काम करण्याचा प्रयत्न करते आहे…तुझे आशीर्वाद सतत सोबत असूदेत! तुझ्या हिमालयाची सावली अशीच असूदे! आज अभिमानाने ‘शांताबाईंची नात’ म्हणून मिरवते आहे आणि ती मोठी जबाबदारी आहे हे सुद्धा ठाऊक आहे…तू आज असतीस तर खूप काही शिकता आलं असतं बोलता आलं असतं…आज तू असतीस तर १०० वर्षांची असतीस आज्जी! जिथे कुठे असशील तिथे खूप खुश रहा…हे तुझं जन्म शताब्दी वर्ष! तुझा वसा मी विसरणार नाही!” (Marathi News)
क्षितीला अभिनयाचा वारसा तिचे वडील अभिनेते अनंत जोग आणि आई अभिनेत्री उज्ज्वला जोग यांच्याकडून मिळाला असेल असेच आजवर सगळ्यांना वाटत असेल मात्र क्षितीच्या घराला अभिनयाचा वारसा तिच्या आजीकडूनच मिळाला असल्याचे आज लक्षात आले. क्षितीच्या आजीने अनेक मोठ्या आणि गाजलेल्या नाटकांमध्ये काम केले होते. तिने या नाटकांची नावे देखील तिच्या पोस्टमध्ये शेअर केली आहेत. (Todays Marathi News)
View this post on Instagram
दरम्यान शांता जोग यांच्याबद्दल सांगायचे झाले तर त्या मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीतील दिग्गज आणि प्रतिभासंपन्न अभिनेत्री होत्या. शांता जोग यांनी ‘नटसम्राट’ या तुफान गाजलेल्या नाटकात काम केले होते. या नाटकात त्यांनी कावेरीची भूमिका साकारली होती. ‘मंतरलेली चैत्रवेल’ नाटकाच्या प्रयोगादरम्यान दुर्दैवाने शांता जोग यांचे १९८० साली मुंबई-गोवा महामार्गावर बसला आग लागल्याने अपघाती निधन झाले होते. त्यांच्यासोबत अभिनेते जयराम हर्डीकर यांचे देखील निधन झाले होते. शांता जोग यांचे पुत्र अनंत जोग आणि त्यांची सून उज्वला जोग यांच्यासोबतच त्यांची नात क्षिती जोग हे आता त्यांचा अभिनयाचा वारसा पुढे चालवत आहेत. (Top Marathi Headline)
शांता जोग यांचे नाव मुंबईतील चेंबूर परिसरातील टिळकनगर येथील एका रस्त्याला दिले गेले आहे. ’शांता जोग करंडक’ हा एका नाट्यस्पर्धेत बालनाट्याला दिला जाणारा पुरस्कार आहे. ’महाराष्ट्र नाट्यवर्धक मंडळा’ने आयोजित केलेल्या एकांकिका स्पर्धेनंतर विजयी एकांकिकेस ’शांता जोग स्मृती करंडक’ दिला जातो. (Latest Marathi NEws)
=========
हे ही वाचा : Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीचे महत्व आणि शुभ मुहूर्त
==========
क्षितीबद्दल सांगायचे झाले तर तिने बॉलिवूडमध्ये रॉकी और राणी की प्रेमकहाणी सिनेमात रणवीर सिंगच्या आईची भूमिका साकारत वाहवाई मिळवली होती. यासोबतच तिने ‘घर की लक्ष्मी बेटीया’, ‘ये रिश्ता क्या केहलता हैं’, ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ आदी हिट मालिकांमध्ये काम केले आहे. यासोबतच वादळवाट, श्रीयुत गंगाधर टिपरे, तू तिथे मी, आदी गाजलेल्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सध्या ती ‘ठरलं तर मग’ या मालिकेत दामिनी देशमुख ही भूमिका साकारत आहे. (Social Media)