भगवान शंकराचे निवसस्थान मानल्या जाणा-या कैलास पर्वताचे दर्शन घेण्याचे भारतीय यात्रेकरुंचे स्वप्न आता प्रत्यक्षात आले आहे. पाच वर्षाच्या खंडानंतर भारतीय यात्रेकरुंचा पहिला गट कैलास पर्वत आणि मानसरोवर परिसरात दाखल झाला आहे. गेल्या पाच वर्षापासून चीननं भारतीय यात्रेकरुंना कैलास यात्रेपासून रोखले होते. सुरक्षतेच्या कारणाखाली आणि नंतर कोरोनाच्या नावाखाली ही यात्रा रोखण्यात आली होती. मात्र यामागे भारत आणि चीनमधील सीमावाद होता, हे उघड होते. गेल्या वर्षापासून भारत-चीन संबंध सुधारण्यास सुरुवात झाली. त्यानंतर भारताकडून पहिल्यांदा या कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा चालू कऱण्याचा प्रस्ताव चीन समोर ठेवण्यात आला. चीन सरकारनंही त्याला लगेच मान्यता दिल्यानं आता 5 वर्षानंतर ही यात्रा पुन्हा सुरु झाली आहे. (Kailash Mansarovar Yatra)
36 यात्रेकरुंचा पहिला गट, जय बाबा कैलास या नामघोषासह कैलास पर्वताच्या पायथ्याशी दाखल झाला आहे. या वर्षी कैलास यात्रा सुरु झाल्यांने मोठ्या प्रमाणात भगवान शंकराच्या भाविकांनी या यात्रेसाठी नावनोंदणी केली आहे. मात्र त्यापेक्षा अधिक चौकशी पुढील वर्षासाठी झाली आहे. त्यामुळे पुढच्या काही वर्षात ही कैलास-मानसरोवर यात्रा भारतील सर्वाधिक लोकप्रिय धार्मिक यात्रा होण्याची आशा आहे. भगवान शंकर आणि माता पार्वती कैलास पर्वतावर रहात असल्याची मान्यता आहे. त्यामुळेच या कैलास पर्वताचा सर्वाधिक लोकप्रिय आणि रहस्यमयी पर्वत असा उल्लेख होतो. या कैलास पर्वताच्या पायथ्यापर्यंत जाण्याचे स्वप्न अनेक शिवभक्तांचे आहे. यावर्षापासून हे स्वप्न शिवभक्तांना प्रत्यक्षात साकारताही येणार आहे. कैलास मानसरोवरच्या दर्शनासाठी भारतीय यात्रेकरूंची पहिली तुकडी यावर्षी तब्बल पाच वर्षांनंतर तिबेटमध्ये पोहोचली आहे. (Latest Updates)
भारतातील चीनचे राजदूत झू फेहोंग यांनी सोशल मिडियावरुन ही माहिती दिली असून या 36 शिवभक्तांचे त्यांनी स्वागतही केले आहे. गेल्या वर्षी रशियातील कझान येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील भेटीनंतर ही कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरु झाली आहे. यावर्षीपासून कैलास यात्रा सुरु होणार, ही घोषणा केल्यावर या यात्रेसाठी लाखो इच्छुकांना नावनोंदणी केली. मात्र त्यातील निवडक यात्रेकरुंची यासाठी निवड झाली. त्यातील एकूण 15 गट कैलास मानसरोवरला रवाना होणार आहेत. या गटामध्ये 50 भाविक असतील. हे भाविक उत्तराखंड राज्यातून लिपुलेख खिंडीतून प्रवास करतील. यातील भाविकांचे काही गट हे सिक्कीमहून नाथुला खिंडीतून प्रवास करतील. (Kailash Mansarovar Yatra)
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरु झालेली ही कैलास मानसरोवर यात्रा ऑगस्ट 2025 पर्यंत चालू असेल. या यात्रेसाठी ज्या भाविकांना जायचे आहे, त्यांनी ‘KMY.gov.in’ या वेबसाइटवर भेट द्यावी असे आवाहन कऱण्यात आले आहे. ज्या भाविकांनी या यात्रेसाठी अर्ज केले आहेत, त्यांचा मार्ग आणि गट निवडीची प्रक्रीया ही संपूर्णपणे संगणकीकृत होत आहे. यात कुठलाही बदल करण्यात येत नाही. शिवाय ही यात्रा करण्यासाठी वैद्यकीय तपासणी आणि संबंधिक कागदपत्रांचीही आवश्यकता असते. त्यामुळे वेबसाईटला भेट देऊन कैलास मानसरोवर यात्रेची पूर्ण माहिती घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. कैलास मानसरोवर यात्रा तिच्या धार्मिक मूल्यासाठी ओळखली जाते. कैलास मानसरोवर यात्रेचे जैन आणि बौद्ध अनुयायांसाठीही खूप मोठे धार्मिक महत्त्व आहे. शिवपुराण, स्कंदपुराण आणि मत्स्यपुराणातही कैलास पर्वत आणि त्याच्या वैभवाची स्तुती करण्यात आली आहे. कैलास पर्वताबाबत अनेक रहस्य सांगितली जातात. (Latest Updates)
काहींच्या मतानुसार कैलास पर्वत हा एक पिरॅमिड असून त्याच्याखाली एक शहर असल्याचे सांगितले जाते. कैलास पर्वतासह मानसरोवरबाबतही अनेक रहस्य सांगितली जातात. तिबेटी नागरिक या कैलास पर्वताची अखंड परिक्रमा करतात. तिबेटी लोकांचा असा विश्वास आहे की बौद्ध देव देखील कैलास पर्वतावर राहतात. कैलासावर स्थित भगवान बुद्धांचे अलौकिक रूप ‘डेमचोक’ बौद्धांमध्ये पूजनीय आहे. कैलास पर्वत हे जैन धर्माचे तीर्थंकर आदिनाथ ऋषभदेव यांचे निर्वाण स्थान आहे, ज्याला ‘अष्टपद‘ म्हणतात. हिंदू धर्माचे अनुयायी मानतात की, कैलास पर्वत हा मेरू पर्वत आहे जो विश्वाचा अक्ष आहे आणि हेच भगवान शंकराचे मुख्य निवासस्थान आहे. असे म्हटले जाते की, कैलास पर्वत किंवा मानसरोवर तलावाच्या परिसरात ध्यान लावल्यास डमरुचा आवाज किंवा ओमच्या स्वर कानी पडतो. या सर्वांमुळेच कैलास मानसरोवर यात्रेसाठी भाविक उत्सुक असतात. यावर्षी 750 यात्रेकरुंना ही परवानगी मिळाली आहे. (Kailash Mansarovar Yatra)
==============
हे देखील वाचा : China : चीनच्या आणखी एका जैविक शस्त्राची जगभर दहशत !
===============
कैलास मानसरोवर यात्रेचा खर्च अंदाजे 3 लाखांपर्यंत येतो. त्यात फिटनेस टेस्ट, चिनी व्हिसा, इमिग्रेशन शुल्क, घोड्याचे भाडे, जेवण, सामानाची वाहतूक, कैलास, मानसरोवर आणि मंदिरासाठी प्रवेश तिकिटे आणि तिबेटमधील निवास यांचा समावेश आहे. कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करण्यासाठी अंदाजे 22 दिवस लागतात. त्यापैकी 14 दिवस भारतात आणि 8 दिवस तिबेटमध्ये वास्तव्य करावे लागते. (Latest Updates)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics