इटालियन लक्झरी फॅशन हाऊस, प्राडा चे चाहते जगभरात आहेत. 1913 मध्ये मिलानमध्ये मारियो प्रादा यांनी स्थापन केलेला हा ब्रॅण्ड जगातील सर्वात जुना ब्रॅण्ड आहे. आज 112 वर्षानंतरही या ब्रॅण्डच्या लेदर हँडबॅग्ज, ट्रॅव्हल अॅक्सेसरीज, शूज, रेडी-टू-वेअर आणि इतर फॅशन अॅक्सेसरीज वापरणे हा स्टेटसचा भाग समजले जाते. प्राडा हा एक लक्झरी ब्रँड म्हणून ओळखला जातो. याच प्राडाच्या फॅशन शो ला बघण्यासाठी लाखोंचे तिकीट असते. फॅशन नगरी म्हणून ओळखल्या जाणा-या मिलानमधील प्राडाच्या फॅशन शो मधून जगभरातील फॅशनची दिशा समजते, असे सांगितले जाते. पण याच फॅशनमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या कोल्हापूरची अस्सल कोल्हापूरी चप्पल दिसली आणि एकच गोंधळ उडाला. कोल्हापूरच्या चप्पलेला GI मानांकन मिळालेले आहे. याचा अर्थ असा की कोल्हापूर येथे बनवलेल्या चपलेला एक खास भौगोलिक ओळख आहे आणि ती फक्त याच भागातून येते. पण याच चप्पलेसाखी चप्पल मिलान फॅशन शो मध्ये दिसली आहे. प्राडा फॅशन हाऊसमधील उत्पादने दाखवतांना एका मॉडेलनं घातलेल्या चप्पलेची डिझाईन कोल्हापूर चप्पलेसारखीच आहे. त्यामुळे प्राडानं कोल्हापूरी चप्पलेची डिझाईन चोरल्याची ओरड होऊ लागली आहे. (Milan)
फॅशनच्या क्षेत्रात गूची, लुई वुतॉन, अर्मेज़, शनेल आणि प्राडा हे मान्यवर ब्रॅण्ड आहेत. जगभरातील फॅशन क्षेत्रात अत्यंत महागडे ब्रॅण्ड म्हणून या ब्रॅण्डचे नाव घेतले जाते. यातही प्राडा या ब्रॅण्डची स्थापना होऊन शंभरी उलटली असली तरी या ब्रॅण्डचा दबदबा कायम आहे. प्राडा या ब्रॅण्डच्या लेदरच्या वस्तूंची कमीत कमी किंमत एक लाखापासून सुरु होते. याच प्राडा फॅशन हाऊसचा एक फॅशन शो इटलीच्या मिलान शहरात झाला. पुरुषांचे उन्हाळी कपडे यातून दाखवण्यात आले. पण या कपड्यांसोबतच प्राडा ब्रॅण्डच्या चप्पलाही सादर कऱण्यात आल्या. या चप्पलांमध्ये कोल्हापूरी चप्पलांसारख्या चप्पलाही दाखवण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय फॅशन शोमध्ये कोल्हापूरी चप्पल ठळकपणे सादर करण्याची ही पहिलीच वेळ होती. प्राडाच्या शोमध्ये सादर केलेली चप्पल भारतीय कारागिरांनी बनवलेल्या अस्सल कोल्हापूरी चप्पलसारखीच होती. त्यामुळे या प्राडा ब्रॅण्डच्या चप्पलांवरुन सोशल मिडियामध्ये चर्चा सुरु झाली. कोल्हापूरी चप्पलांची एक स्वतंत्र ओळख आहे. या चप्पलांचा रंग, त्यांची विशिष्ट बांधणी, आकार शिवाय पायाचा अंगठाही वैशिष्टपूर्ण असतो. तसाच आकार प्राडानं सादर केलेल्या चप्पलांचा होता. (Latest News)
कोल्हापूर चप्पलांना जीआय मानांकन आहे. 100 वर्षाहून अधिक काळ जुन्या असलेल्या या चप्पला हातांनी तयार केल्या जातात. कोल्हापूरातील अनेक घरात वंशपरंपरागत ही चप्पल बनवण्याची कला जोपासण्यात आली आहे. 2019 मध्ये या कोल्हापूरी चप्पलेला भौगोलिक संकेत म्हणजेच जीआय टॅग देण्यात आला. महाराष्ट्राची जेव्हा ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर करुन देण्यात येते, तेव्हा महाराष्ट्रातील वस्तूंचीही ओळख सांगितली जाते. त्यात या कोल्हापूरी चप्पलेलाही मान आहे. अशा या कोल्हापूरी चप्पलेसारखीच चप्पल प्राडा सारख्या मातब्बर ब्रॅण्डनं तयार केल्यामुळे वाद सुरु झाला आहे. कोल्हापूरी चप्पल आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली ही अभिमानाची गोष्ट आहे. मात्र या चप्पलेच्या डिझाईनची चोरी करण्यात आली असून प्राडा सारख्या ब्रॅण्डनं याबाबत कोल्हापूर किंवा भारताचे कुठलेही नाव घेतलेले नाही. याबद्दल सोशल मिडियाच्या माध्यमातून प्राडावर टीका कऱण्यात येत आहे. कोल्हापूरमध्ये तयार होणा-या कोल्हापूरी चप्पला देशभर उपलब्ध आहेत. अनेक पर्यटन स्थळांमध्ये या चप्पला मिळतात. (Milan)
=============
हे ही वाचा : Kolhapuri Chappal: इटालियन ब्रँडच्या कलेक्शनमध्ये कोल्हापुरी चप्पलला स्थान, भारतीय संतप्त
कांजीवरम आणि बनारसी साडीमधील फरक माहितेय का?
============
कोल्हापुरी चप्पलेचा इतिहास 13 व्या शतकाचा असल्याचे सांगितले जाते. संपूर्णपणे हातानं तयार केलेली ही चप्पल चालण्यासाठी आरमदायी असते. कडक उन्हाळ्यातही ही चप्पल पायाला थंडावा देते. ब-याचवेळा यातून येणारा विशिष्ट आवाजच या चप्पलेबद्दल बरच बोलून जातो. चामड्याच्या या चप्पलसाठी चांगल्या दर्जाचे चामडे वापरले जाते. ही चप्पल करण्यासाठी कुठलेही मशीन वापरले जात नाही. हातानं ही चप्पल शिवण्यात येते. एवढी सगळी वैशिष्ट असलेल्या या कोल्हापूरी चप्पलेवर आता प्राडाचा टॅग बसणार आहे. एरवी सर्वसामान्यांना परवडेल अशा किंमतीत असणारी कोल्हापूरी चप्पल या प्राडाच्या नावासह लाखभर रुपयांना विकण्यात येणार आहे. सेलिब्रिटी स्टायलिस्ट अनैता श्रॉफ अदाजानिया यांनी प्राडाच्या शोचा व्हिडिओ शेअर करुन ही कोल्हापूरी चप्पल असल्याचे म्हटले आहे. तर अन्य एका मॉडलनं “मेड इन फ्रान्स” आणि “मेड इन इटली” या उत्पादनांच्या नावाखाली युरोपमध्ये भारतीय उत्पादने विकली जात असल्याचे सांगितले आहे. तसेच यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणीही केली आहे. (Latest News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics