Home » India : दिल्ली नौदल भवनामध्ये सापडला पाकिस्तानचा गुप्तहेर

India : दिल्ली नौदल भवनामध्ये सापडला पाकिस्तानचा गुप्तहेर

by Jyotsna Kulkarni
0 comment
India
Share

भारताने पाकिस्तानविरोधात राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदुर’नंतर भारतातून अनेक लोकांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. यात अनेक नामचीन आणि प्रसिद्ध लोकांचा देखील समावेश आहे. आता पुन्हा अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजधानी दिल्लीत स्थित नौसेना भवनमधून एका हेराला अटक करण्यात आली आहे. नौसेना भवनात अपर डिव्हिजन क्लर्क (UDC) म्हणून कार्यरत असलेल्या विशाल यादवला पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी करत असल्याच्या आरोपाखाली राजस्थान पोलिसांच्या गुप्तचर विभागाने अटक केली आहे. (Indian Navy)

या घटनेमुळे देशाच्या सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. राजस्थान सीआयडी इंटेलिजन्सने ही मोठी कारवाई केली आहे. गुप्तचर शाखेच्या म्हणण्यानुसार, विशाल सोशल मीडियावर एका पाकिस्तानी महिलेला संरक्षणाशी संबंधित महत्त्वाची माहिती पाठवत होता. या महिलेचे अकाउंट प्रिया शर्मा नावाने बनवले गेले होते. मात्र प्रत्यक्षात ही महिला आयएसआयची एजंट होती. हरियाणामधील पुनसिका गावचा रहिवासी विशाल यादव याला २५ जून रोजी शासकीय गुप्त बात अधिनियम १९२३ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. (Marathi News)

विशाल यादव हा नौदलाच्या मुख्यालयात ‘डॉकयार्ड डायरेक्टरेट’मध्ये क्लार्क म्हणून नोकरी करत होता. तो मूळचा हरियाणाचा राहणारा आहे. अनेक महिने त्याच्यावर पाळत ठेऊन राजस्थान पोलिसांच्या इंटेलिजन्स शाखेने त्याला ताब्यात घेतले.

याबद्दल पोलिस महानिरीक्षक (सीआयडी-सुरक्षा) विष्णूकांत गुप्ता यांनी माहिती देत सांगितले, “यूडीसी विशाल यादवला बुधवारी २५ जून रोजी अटक करण्यात आली. यादव हा हरियाणा राज्यातील पुंसिका रेवाडी येथील रहिवासी आहे. राजस्थान पोलिसांचे ‘सीआयडी-गुप्तचर’ पाकिस्तानी गुप्तचर संस्थांच्या हेरगिरी कारवायांवर सतत लक्ष ठेवून होते. त्यानुसार, आता ही कारवाई करण्यात आली आहे. विशाल हा सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानला माहिती पाठवत असायचा. तो सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या एका महिला हँडलरशी सतत संपर्कात असल्याचे समोर आले.” (Todays Marathi HEadline)

India

इंटेलिजेंस विंगच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल यादवला ऑनलाइन गेमिंगचे व्यसन होते आणि यामध्ये त्याने मोठी रक्कम गमावली होती. याच दरम्यान तो सोशल मीडियावर प्रिया शर्मा नावाच्या महिलेच्या संपर्कात आला. आपल्याला झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी आणि आर्थिक समस्यांवर मात करण्यासाठी, विशाल यादवने या प्रिया शर्मा नामक महिलेला देशाच्या संरक्षणाशी संबंधित महत्त्वाची माहिती देण्यास सुरुवात केली. (Top Trending News)

ही महत्वाची आणि गुप्त माहिती देण्याच्या बदल्यात विशाल यादवला क्रिप्टोकरन्सी आणि थेट बँक ट्रान्सफरद्वारे भरपूर पैसे मिळू लागले. याच काळात राजस्थानच्या सीआयडी इंटेलिजेंस युनिटला विशालवर संशय आला आणि या युनिटने त्याच्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. अनेक महिने पाळत ठेवल्यानंतर युनिटला त्याच्याविरुद्ध पुरावे सापडले आणि त्याच पुराव्यांच्या आधारावर विशाल यादवला अटक करण्यात आली. त्याच्या मोबाईल फोनमध्ये देखील अनेक संवेदनशील कागदपत्रे आणि संदेश देखील सापडले असून, यावरून त्याने आयएसआयला महत्त्वाची माहिती पाठवल्याचे उघड झाले आहे. (Marathi Top Headline)

तपासात असे दिसून आले आहे की विशाल एका पाकिस्तानी हँडलरच्या ऑनलाइन संपर्कात होता. सध्या जयपूरमध्ये अनेक गुप्तचर संस्थांकडून त्याची चौकशी सुरू आहे. मात्र विशालच्या मोबाइलमधून मोठी धक्कादायक माहिती मिळाली आहे. विशाल यादवच्या मोबाईलची फॉरेंसिक तपासणी केल्यानंतर समजले की, त्याच्या मोबाईलमधून मिळालेल्या चॅट्स आणि दस्तऐवजांद्वारे हे स्पष्ट झाले आहे की, त्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यानही नौसेना आणि अन्य संरक्षण विषयक गोपनीय माहिती संबंधित पाक महिला हँडलरला दिली होती. यावरून सिद्ध होते की विशाल मागील बऱ्याच काळापासून या गुप्तचर रॅकेटचा सक्रिय भाग होता. (Marathi Latest News)

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले आणि भारतीय गुप्तचर संस्थांनी देशभरात सुरक्षा व्यवस्था कडक केली. गेल्या महिन्याभरात देशातील राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात आणि पंजाबमध्ये हेरगिरीशी संबंधित अनेक अटक करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच हरियाणातील हिसार येथील प्रसिद्ध ट्रॅव्हल ब्लॉगर आणि युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली होती. ज्योतीवर पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात राहण्याचा आणि व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅटद्वारे संवेदनशील माहिती शेअर करण्याचा आरोप आहे. (Top Stories)

=========

हे देखील वाचा : Health Tips: शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे? तर सेवन करा ‘हे’ पदार्थ 

Ashadh : आषाढ तळणीच्या खास परंपरेबद्दल तुम्हाला माहित आहे का?

==========

त्यानंतर राजस्थानमधील शकूर खान नावाच्या सरकारी अधिकाऱ्याला देखील अटक करण्यात आली आहे. शकूरवर सोशल मीडिया आणि अन्य माध्यमांचा वापर करत पाकिस्तानी गुप्तचर संस्थेशी संबंध ठेवल्याचा आरोप आहे. त्यानंतर पंजाब पोलिसांनी २२ जूनला ISI साठी हेरगिरी करणाऱ्या दोघांना अटक केली होती. गुरप्रीत सिंग उर्फ गोपी फौजी आणि साहिल मशीहा अशी त्यांची नावे होती. गुरप्रीत २०१६ साली सैन्यात होता आणि पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI एजेंट राणा जावेदच्या तो संपर्कात असायचा. गुरप्रीत सिंगने भारतीय सैन्याची संवेदनशील माहिती ISI ला दिली होती. पेन ड्राईव्हच्या माध्यमातून तो संवेदनशील माहिती शेअर करत होता. (Social Updates)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.