अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडलेल्या युद्धबंदी प्रस्तावाला इस्रायल आणि इराणने स्विकारल्याचे ट्रम्प यांच्यातर्फे जाहीर करण्यात आले. यामुळे पश्चिम आशियातील 12 दिवसांचे युद्ध तूर्तास शांत झाले आहे. मात्र या युद्धबंदीवर हे दोन्ही देश किती ठाम रहातात यावर ही शांती अवलंबून रहाणार आहे. या युद्धामुळे इराणमधील सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला खामेनी यांच्या वर्चस्वालाही धक्का लागला आहे. इराणमध्ये खामेनी यांनी कट्टरवादामुळे अनेक अपराध केले आहेत, त्याचेच फळ आता त्यांना मिळत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या सर्वात 16 वर्षाची, अतेफाह सहलेहचे नाव पुढे आहे. (Atefeh Sahaaleh)
इराणच्या या निष्पाप मुलीला खामेनी यांनी अशी शिक्षा दिली की, जगभरात संताप व्यक्त करण्यात आला. याशिवाय जीना महसा अमिनी या तरुणीच्या हत्येमुळेही इराणचे खामेनी टीकेचे धनी झाले होते. अमिनीच्या हत्येमुळे 1979 च्या क्रांतीनंतर इराणमध्य़े पहिल्यांदाच मोठी निदर्शने झाली. यात महिलांचा समावेश जास्त होता. यातील सहभागी महिलांनाही खामेनी यांच्या रक्षकांनी अत्यंत क्रूरपणे शिक्षा दिली. याच सर्व तरुणींचे शाप इराणला लागल्याचे बोलले जात आहे. इराणमधील महिला स्वातंत्र्याचा लढा, याबाबत जेव्हा बोलले जाईल, तेव्हा पहिल्यांदा नाव घेतले जाईल, ते 16 वर्षाच्या अतेफाह सहलेह या मुलीचे. अतेफाह हिला 15 ऑगस्ट 2004 रोजी नेका शहरात एका मोबाईल क्रेनवर ‘अनैतिकतेच्या’ आरोपाखाली फाशी देण्यात आली. यावेळी हजारोंची गर्दी होती, मात्र खामेनी यांच्या या निर्णयाविरुद्ध एकानंही आवाज काढला नाही. (International News)
या अतेफाहची कहाणी अत्यंत दुःखदायक आहे. तिच्या आईचे एका अपघातात निधन झाले, तेव्हा ती लहान होती. वडिलांना ड्रग्जचे व्यसन असल्यानं तिच्या आजी-आजोबांनी तिची जबाबदारी घेतली. मात्र त्यांचीही परिस्थिती चांगली नव्हती. दिवसभर लहान अतेफाहला घरी ठेऊन ते मजूरीच्या कामावर जात असत. वयाच्या 13 व्या वर्षी तिला पहिल्यांदा एका धार्मिक गुन्ह्यात पकडण्यात आले. त्यात तिला 100 फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली. यावेळी तुरुंगात अतेफाहचा लैंगिक छळही करण्यात आला. त्यानंतर पन्नास वर्षाच्या एका शेजारच्या माणसानं अतेफाहवर बळजबरी केली. शिवाय तिला कोणाला सांगितल्यास मारण्याची धमकी दिली. हा प्रकार खूप दिवस चालला. शेवटी अतेफाहनं ही गोष्ट आपल्या आजीला सांगितली. या कुटंबानं घाबरतच पोलीसांमध्ये या माणसाची तक्रार दिली. पण पोलीसांनी त्या व्यक्तिला अटक करण्याऐवजी अतेफाहलाच अटक केली. तिच्यावर त्या माणसाला बळजबरी करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा आरोप लावण्यात आला. यात 16 वर्षाच्या अतेफाहला आपली बाजू मांडण्याची संधीही मिळाली नाही. (Atefeh Sahaaleh)
एकदा कोर्टात तिनं आपली बाजू मांडण्यासाठी हिजाब काढण्याचा प्रयत्न केला. हा अजून एक मोठा गुन्हा ठरला. त्यामुळे कट्टरपंथीय असलेल्या न्यायाधिशांनी अतेफाहला भर कोर्टात धर्माविरुद्ध वागणूक केल्याबद्दल फटकारले. कोर्टात तिचे वय 22 वर्ष दाखवण्यात आले आणि धर्माविरुद्ध वागणूक केल्याबद्दल तिला जाहीर फाशी देण्याची शिक्षा झाली. अतेफाहला मग सर्वांसमोरुन फरफटत नेण्यात आले, आणि भर चौकात तिला एका मोबाईल क्रेनला फासावर लटकवण्यात आले. अतेफाहच्या या घटनेनं इराणच्या महिलांना मोठा धक्का बसला. तेव्हापासून इराणमधील महिला संघटना आक्रमक झाल्या. अतेफाहसारखी वेळ देशातील कुठल्याही महिलेवर कधीही येणार असल्याची जाणीव या महिलांना झाली. खामेनीविरुद्ध तेव्हाच महिलांना पहिल्यांदा आवाज उठवला. आता 20 वर्षानंतर यात अतेफाहची पुन्हा आठवण इराणमध्ये काढली जात आहे. सोबतच जीना महसा अमिनी या तरुणीनं लावलेल्या क्रांतीचीही आठवण काढण्यात येत आहे. जीनाच्या मृत्युमुळे झालेल्या क्रांतीमुळे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या नेतृत्वाला पहिल्यांदा आव्हान मिळाले (International News)
अमिनीचा एकमेव दोष एवढाच होता की तिने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खमेनी यांनी ठरवलेल्या मानकांनुसार हिजाब घातला नाही. 16 सप्टेंबर 2022 रोजी इराणच्या गश्त-ए इर्शाद म्हणजेच पोलीसांच्या ताब्यातील अमिनीचा मृत्यू झाला. पण तिला या पोलीसांनी प्रचंड मारहाण केल्याचे स्पष्ट झाले. तिच्या डोक्यावर जबर वार करण्यात आले. त्यात अमिनाचा मृत्यू झाला. अमिनीच्या मृत्युमुळे इराणमध्ये पुन्हा अतेफाहची आढवण काढण्यात आली. आणि इराणमध्ये “जिन, जियान, आझादी,” नावाची घोषणा सर्वबाजुनी देण्यात आली. याची अर्थ म्हणजे, महिला, जीवन आणि स्वातंत्र्य. अमिनीच्या मृत्यूमुळे कुर्द महिलांच्या हत्येविरुद्ध कुर्दांमध्ये दशकांपासून चाललेली चळवळ पुन्हा पेटली. (Atefeh Sahaaleh)
=============
हे ही वाचा :
Banu Mustaliq : आत्महदहन ते बुकर प्राइजपर्यंत; वाचा बानू मुश्ताक यांच्या संघर्षाची प्रेरणादायी कथा
Mangala Bai Maravi : जंगलातून जगभरात पोहोचलेली टॅटू आर्टिस्टची प्रेरणादायी यशोगाथा
==============
अमिनीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी महिला त्यांच्या डोक्यावरील हिजाब काढून घोषणा देत होत्या. यानंतर इराणमधील हजारो महिला रस्त्यावर आल्या. निदर्शने झाली. ही निदर्शने रोखण्यासाठी इराणच्या पोलीसांनी अनेक महिलांवर लाठीहल्ला केला. शिवाय गोळीबारही कऱण्यात आला. ही आंदोलने एवढी चिघळली होती की, खामेनी यांची सत्ता जाणार अशी चर्चा सुरु झाली होती. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी इराणला कट्टरपंथीयांच्या ताब्यात दिले आहे. संपूर्ण इराण रूढीवादी विचारसरणीच्या विळख्यात सापडला असतांना आता युद्धामुळे सर्वसामान्यांचे जीणे बेहाल झाले आहे. खामेनी यांनी ज्या तरुणींना क्रूरपणे मारले, त्याच्याच शापाचे हे परिणाम असल्याची चर्चा इराणमध्ये सुरु आहे. (International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics