Home » Bollywood : कोरिओग्राफर गीता कपूरने बॉलीवूडला ठोकला कायमचा रामराम

Bollywood : कोरिओग्राफर गीता कपूरने बॉलीवूडला ठोकला कायमचा रामराम

by Jyotsna Kulkarni
0 comment
Bollywood
Share

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी करियर चांगले चालू असताना देखील विविध कारणांमुळे या क्षेत्राला रामराम ठोकला आहे. आता या यादीत अजून एक नाव सामील झाले आहे. हे नाव आहे, हिंदी सिनेविश्वातील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका म्हणजेच कोरिओग्राफर गीता कपूर अर्थात गीता माँ. हो रियॅलिटी शो मध्ये कायम जजच्या भूमिकेत दिसणाऱ्या गीता माँने बॉलिवूडमधून संन्यास घेतला असल्याचे सांगितले आहे. एका मुलाखतीमध्ये तिने स्वतःच याबद्दल खुलासा केला आहे. (Marathi News)

गीताने एका मुलाखतीमध्ये ती आता बॉलिवूडमध्ये काम करणार नसल्याचे जाहीर केले असून, याचे कारण देखील तिने यावेळी सांगितले. गीता कपूर बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध चेहरा आहे. बॉलिवूडमध्ये तिने तिच्या कारकि‍र्दीची सुरुवात असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून केली होती. गीताने ‘कुछ कुछ होता है’ आणि ‘दिल तो पागल है’ सारख्या चित्रपटांच्या गाण्यांमध्ये प्रसिद्ध आणि लोकप्रिय कोरिओग्राफर असलेल्या फराह खानला असिस्ट केले होते. याशिवाय तिने अनेक बॉलिवूडमधल्या अनेक गाजलेले चित्रपटांमधील गाण्यांना कोरिओग्राफ केले आहे. (Todays Marathi Headline)

गीताला सर्वात जास्त ओळख दिली ती टीव्ही इंडस्ट्रीने गेल्या अनेक वर्षांपासून गीता कपूर टेलिव्हिजन डान्स रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून काम पाहत होती. ‘डान्स इंडिया डान्स’ या शो मुळे तिला कमालीची लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली. यानंतर तिने अनेक डान्स रियॅलिटी शो मध्ये जज म्हणून काम केले. ‘गीता माँ’ या नावाने ती घराघरात पोहोचली आहे. याच ‘गीता माँ’ने आता आपण बॉलिवूडमध्ये परत येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. (Top Marathi Headline)

Bollywood

मागील बरीच काळापासून गीताने बॉलिवूडमध्ये जास्त काम केलेले नाही. तिला तिच्या बॉलिवूडमधील कमबॅकबद्दल जेव्हा विचारले गेले तेव्हा तिने सांगितले की, “आज इंडस्ट्रीत कामाची खूपच कमतरता आहे. अशा परिस्थितीत आपण इतर नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. त्यांना तंगीमध्ये देखील काम मिळाले पाहिजे. आजकाल, आमच्या काळात जसे चित्रपट बनवले जायचे तसे सध्या बनत नाही. पूर्वीच्या चित्रपटांमध्ये एका सिनेमात ८ ते १० गाणी असायची. एवढी गाणी असूनही प्रत्येक गाणं मोठं असायचे. मुख्य म्हणजे सर्वच गाणी डान्स असलेली असायची. मात्र आता काळ बदलला आणि परिथिती देखील बदलली आहे. आताच्या चित्रपटांमध्ये आधीच गाणी कमी आणि छोटी असतात त्यामुळे एवढ्या कमी कामात आपण काम मिळवण्यासाठी झडप घालायची आणि इतरांना काम करण्याची संधी द्यायची नाही हे मला पटत नाही. त्यामुळे इतरांना संधी द्या. मी जिथे आहे, तिथे आनंदी आहे.” (Marathi Latest News)

गीता कपूरनं पुढे सांगितले की, “मला कोणत्याही बंधनात काम करायचे नाही. शिवाय मला कॉपी-पेस्ट असलेले देखील काम करायचे नाही. मला चांगले आणि माझा ठसा उमटेल असे काम करायचे आहे. मला वाटते की प्रत्येक माणसाने एक पाऊल मागे हटायला पाहिजे आणि नवीन प्रतिभावान लोकांना पुढे जाण्याची संधी दिली पाहिजे. आता इतरांनी पुढे जाण्याची आणि आपले करियर घडवण्याची वेळ आहे. आम्हाला या इंडस्ट्रीने काम, पैसा, प्रसिद्धी, सर्वच बाबतीत कायम ब्लेस ठेवले आहे. मात्र जर भविष्यात मला अशी संधी आली की, ते काम मला खूपच जास्त मनाला भिडते आणि मला वाटले की ही संधी मी नाही सोडली पाहिजे, तेव्हा कदाचित मी पुन्हा काम करेन. मात्र सध्या तरी मी अशा कोणत्याही विचारात नाही. (Top Stories)

==========

हे देखील वाचा :  Salman Khan : सलमान खान अनेक वर्षांपासून करतोय ‘या’ गंभीर आजाराचा सामना, स्वतःच केला खुलासा

==========

दरम्यान गीता कपूरच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, तिने वयाच्या केवळ १७ व्या वर्षी तिच्या करियरला सुरुवात केली. पुढे ती फराह खानच्या ग्रुपमध्ये सामील झाली. फराहसोबत गीताने अनेक चांगली हिट गाणी कोरिओग्राफ केली. गीताने ‘फिजा’, ‘अशोका’, ‘साथिया’, ‘हे बेबी’, ‘तीस मार खां’, ‘तेरे नाल लव हो गया’ आदी अनेक चित्रपटांमध्ये कोरिओग्राफी केली आहे. यासोबतच ती टीव्हीवर ‘डांस इंडिया डांस’, ‘डीआईडी लिल चँप्स’ आणि ‘इंडियाज डांसिंग सुपरस्टार’ आदी अनेक डान्स शोजच्या जजच्या भूमिकेत देखील दिसते. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.