निरोगी आयुष्य राहण्यासाठी किंवा ते मिळवण्यासाठी कायमच सर्वच लोकं प्रयत्नशील असतात. आजार कोणालाही नकोसेच वाटतात. त्यामुळे स्वतःला आजारापासून दूर ठेवण्यासाठी सर्वच विविध उपाय करत, व्यायाम, डाएट करत निरोगी राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र आपण कायम ऐकले आहे, वाचले आहे की निरोगी राहण्याचा सर्वात सोपा आणि अतिशय उत्तम मार्ग म्हणजे भरपूर पाणी पिणे. पाणी पिणे आपल्या शरीराच्या आणि पर्यायाने आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच उत्तम आहे. (Water)
पाणी प्यायल्यामुळे आपण अनेक आजारांपासून दूर राहतो, शिवाय अनेक आजार बरे देखील करू शकतो. पाण्यातून पोषकद्रव्य शरीराला मिळण्यासोबतच निरुपयोगी पदार्थांचे शरीरात वहन होते. आपल्या शरीरात पाण्याच प्रमाण ७० टक्के असते. शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आणि शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी पाणी महत्तवाची भूमिका बाजावतो. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. शिवाय किडनी स्टोनसारख्या समस्याही उद्भवत नाहीत. मात्र पाणी जास्त प्यायचे म्हणजे नक्की किती प्यायचे? याबद्दल देखील काही माहिती असेल ना? कारण आपल्याकडे एक म्हण आहे ‘अति तिथे माती’. जरी पाणी शरीरास चांगले असले तरी अति पाणी प्यायल्यास त्याचा शरीराला काही त्रास होत नाही ना? जास्त पाणी पिण्याचे देखील काही दुष्परिणाम आहेत का? (Marathi News)
प्रत्येक व्यक्तीने दिवसभरात किती पाणी प्यावे हे त्या त्या व्यक्तीच्या उंची, वजन, वयानुसार, दिवसभरात किती हालचाल होते आणि इतर घटकांवर अवलंबून असते. शरीराला आवश्यक असलेल्या द्रवपदार्थांच्या प्रमाणाचा अंदाज घेऊन दररोजच्या पिण्याच्या पाण्याचे प्रमाण निश्चित केले जाऊ शकते. तज्ज्ञांच्या मते एका दिवसात ८ ग्लास म्हणजे किमान दोन लिटर पाणी पिणे बंधनकारक आहे. परंतु एकाच वेळी जास्त पाणी पिऊ नये, हळू हळू एक एक घोट पाणी प्यावे. पुरूषांनी दिवसाला ३.५ लिटर पाणी प्यायला पाहिजे. तर महिलांनी दिवसातून २.५ ते ३ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. मासिक पाळी दरम्यान, गर्भवती किंवा स्तनदा मातांनी अधिक पाणी प्यायले पाहिजे. (Todays Marathi HEadline)
=========
हे देखील वाचा : Blood : ‘गोल्डन ब्लड’ आहे जगातील सर्वात महागडा रक्तगट, जगात केवळ ४५ लोकांकडे आहे हे ब्लड
=========
जेव्हा तुम्हाला तहान लागेल तेव्हा पाणी प्या. याव्यतिरिक्त, लघवीचा रंग आणि लघवीची वारंवारता देखील तुमचे हायड्रेशन दर्शवू शकते. जे लोक शारीरिक मेहनत करतात, जसे की व्यायाम करतात किंवा गरम भागात राहतात त्यांना घामातून गमावलेले पोषक द्रव्य पुन्हा मिळवण्यासाठी अधिक पाणी पिण्याची आवश्यकता असू शकते. अशा वेळी शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाण्याचे प्रमाण वाढवणे आवश्यक असते. मात्र हे देखील लक्षात घ्या जे लोक जास्त पाणी पितात त्यांच्या शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी होऊ लागते. शिवाय पेशींमध्ये सुद्धा पाण्याचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे जळजळ वाढते. याला मेडिकल टर्ममध्ये हायपोनाट्रेमिया असे म्हटले जाते. हा आजार खासकरून मेंदूचे नुकसान करतो. (Marathi Latest News)
हायपोनाट्रेमियाची मुख्य लक्षणे डोकेदुखी, थकवा, ऊर्जेची कमतरता, मळमळ, उलट्या, कमी रक्तदाब, मसल्स क्रॅम्प, अस्वस्थता, राग ही लक्षणे असतात. कधी कधी गंभीर व्यक्ती कोमातही जाऊ शकते. जेव्हा शरीरात जास्त पाणी असते तेव्हा सोडियमची पातळी कमी होते. त्यामुळे पेशींमध्ये जास्त पाणी पोहोचते आणि सूज येते. (Top Trending News)
वजनानुसार व्यक्तींनी किती पाणी प्यावे घ्या जाणून
५० किलो वजनाच्या व्यक्तीने दररोज सुमारे १.७ लिटर पाणी प्यावे.
६० किलो वजनाच्या व्यक्तीने दररोज सुमारे २.१ लिटर पाणी प्यावे.
७० किलो वजनाच्या व्यक्तीने दररोज सुमारे २.४ लिटर पाणी प्यावे.
८० किलो वजनाच्या व्यक्तीने दररोज सुमारे २.८ लिटर पाणी प्यावे.
=========
हे देखील वाचा : पायांना येणाऱ्या दुर्गंधीवर घरगुती उपाय, वाचा टिप्स
पावसाळ्यात कोरड्या केसांसाठी कोणते हेअर मास्क लावावेत?
=========
जाणून घ्या आयुर्वेदाप्रमाणे पाणी पिण्याचे नियम
> आरोग्यासाठी पाणी चांगले आहे म्हणून गॅलनभर पाणी पिण्याची गरज नाही. आयुर्वेदानुसार पाणी पचणे देखील महत्त्वाचे आहे.
> घाम येणे, बद्धकोष्ठता, कोरडे तोंड आणि लघवी गडद पिवळे झाल्यास पाणी जास्त प्यावे.
> जेवण करण्यापूर्वी किंवा नंतर ३० मिनिटांनी पाणी प्या.
> वातग्रस्त व्यक्तीने जेवणानंतर ३० मिनिटांनी पाणी प्यावे आणि कफाचा त्रास असलेल्या जास्त वजनाच्या
> व्यक्तीने जेवणाच्या ३० मिनिटे आधी पाणी प्यावे.
> उभे राहण्यापेक्षा बसून पाणी प्या कारण मग पाणी तुमच्या शरीराद्वारे चांगले शोषले जाते.
> एक एक घोट पाणी प्या आणि पाणी कधीही घटाघटा गिळू नका.
> फ्रीजमधून थंड पाणी कधीही पिऊ नका कारण थंड पाणी तुमची पचनशक्ती कमी करते.
> पाणी साठवण्यासाठी मातीची किंवा तांब्याची किंवा किमान स्टीलची भांडी वापरा.