Home » Odisha : भगवान जगन्नाथाचे रहस्यमयी स्वयंपाकघर !

Odisha : भगवान जगन्नाथाचे रहस्यमयी स्वयंपाकघर !

by Team Gajawaja
0 comment
Odisha
Share

भगवान जन्नाथांची रथयात्रा सुरु होण्यासाठी काही दिवसांचा अवकाश आहे. या वर्षी ही यात्रा 27 जून रोजी सुरू होईल. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी सुरू होणारी ही यात्रा पुढचे 9 दिवस उत्साहात चालू असते. या रथयात्रेत सामिल होण्यासाठी ओडिशातील पुरी नगरीमध्ये मोठ्या संख्येनं भाविक येत आहेत. या सर्व भाविकांना भगवान जगन्नाथाच्या दर्शनाची जशी ओढ असते, तशीच भगवान जगन्नाथांच्या प्रसादाचीही असते. रोज भगवान जगन्नाथांना अनेक पदार्थांचा भोग चढवला जातो. भगवान जगन्नाथांच्या मंदिराबाबत अनेक रहस्य सांगितली जातात, तशीच रहस्य या मंदिराच्या स्वयंपाकघराबाबतही आहेत. (Odisha)

या स्वयंपाकघरात रोज लाखो भक्तांसाठी प्रसाद तयार करण्यात येतो. भगवान जगन्नाथ यांना जो नैवेद्य दाखवण्यात येतो, तो साक्षात लक्ष्मीदेवी तयार करते, अशी मान्यता आहे. स्वतः महालक्ष्मी ज्या स्वयंपाकघरात नांदते, त्या स्वयंपाकघराबाबतही अनेक रहस्य असून त्यांचा अद्याप उलगडा झालेला नाही. भगवान जगन्नाथांचे शहर म्हणून आळखले जाणारे पुरी हे शहर सध्या रथयात्रामय झाले आहे. भगवान जगन्नाथ रथयात्रा 27 जून पासून सुरु होणार आहे. त्याआधी होणा-या धार्मिक विधींची आता मंदिरात सुरुवात झाली आहे. यानंतर भगवान जगन्नाथ, त्यांचा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांना त्यांच्या रथावर बसवून मंदिराबाहेर आणण्यात येईल. ही रथयात्रा श्रद्धा, भक्ती आणि भारतीय संस्कृतीचा मिलाफ मानण्यात येतो. ही रथयात्रा 12 व्या ते 16 व्या शतकापासून सुरु झाल्याची माहिती आहे. राजा इंद्रद्युम्नने केलेल्या या रथयात्रेची परंपरा आजही त्याच पद्धतीनं पार पाडली जाते. (Latest News)

या सर्वात सामिल होण्यासाठी जगभरातून लाखो भाविक पुरी येथे येतात. या सर्व भाविकांना जगन्नाथ भगवान यांचे दर्शन घ्यायचे असते, आणि त्यांच्या स्वर्गिय प्रसादाचा आस्वाद घ्यायचा असतो. भगावन जगन्नाथातंना रोज 56 पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. देवाचा हा सर्व प्रसाद कोणी दुसरं करीत नाही, तर साक्षात महालक्ष्मी करते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे भगवान जगन्नाथांचे दर्शन झाल्यावर हजारो भाविक या प्रसादगृहामध्ये येतात. रोज हजारो भाविकांसाठी भोजन व्यवस्था तयार करणा-या या देवाच्या स्वयंपाकघराबाबत अनेक रहस्य सांगण्यात येतात. पुरी येथील जगन्नाथ मंदिरातील स्वयंपाकघर हे जगातील सर्वात मोठे स्वयंपाकघर मानले जाते. तिथे दररोज हजारो भाविकांसाठी प्रसाद तयार केला जातो. जगन्नाथ मंदिरात मिळणाऱ्या प्रसादाला ‘महाप्रसाद’ म्हटले जाते. कारण देवी लक्ष्मी स्वतः हा प्रसाद करतांना उपस्थित असते, असे येथील पुजारी सांगतात. (Odisha)

1682 ते 1713 च्या दरम्यान, सध्याचे स्वयंपाकघर तत्कालीन राजा दिव्य सिंहदेव यांनी बांधल्याची माहिती आहे. या भल्यामोठ्या स्वयंपाकघरात तब्बल 500 स्वयंपाकी आहेत. तर 300 सहाय्यक उपस्थित असतात. येथे स्वयंपाक कुठल्याही धातूच्या भांड्यात नाही, तर मातीच्या भांड्यात तयार होतो. यासाठी येथे 752 चुली मांडण्यात आलेल्या आहेत. या चुलींवर मातीच्या भांड्यात रोज 56 पदार्थ बनवले जातात. हे पदार्थ कधीही कमी होत नाहीत, की जास्त होत नाहीत. रोज मंदिरात किती भाविक येतील याचा नेमका आकडा नसतो. मंदिरात लाखो भाविक येतात, त्या सर्वांना हा प्रसाद बरोबर पुरतो, यातील कुठलाही पदार्थ वाया जात नाही, की कमीही पडत नाही. हा प्रसाद तयार होतो, त्याची पद्धतीही रहस्यमय आहे. प्रत्येक चुलीवर एकमेकांच्या वर 9 भांडे ठेवून प्रसाद तयार होतो. 9 ही संख्या नवग्रह, 9 धान्य आणि 9 दुर्गा यांचे देखील प्रतिनिधित्व करते. (Latest News)

असेच पदार्थ अन्य स्वयंपाकघरात तयार केले, तर आधी खालच्या भांड्यातील अन्न शिजेल. पण हे भगवान जगन्नाथांचे स्वयंपाकघर आहे, इथे सर्वात आधी वरच्या भांड्यातील अन्न शिजते. मग हळूहळू सर्वात खालच्या भांड्यातील अन्न तयार होते. हा एक चमत्कारच मानण्यात येतो, त्यावरुनही या स्वयंपाकघरात माता लक्ष्मीचा वावर असल्याचे सांगण्यात येते. हा सर्व प्रसाद तयार करतांना फक्त मंदिराजवळील गंगा-जमुना नावाच्या दोन विहिरींमधील पाण्याचा वापर करण्यात येतो. असा हा तयार झालेला प्रसाद प्रथम विमलादेवी नावाच्या माता पार्वतीच्या मंदिरात अर्पण केला जातो. यानंतर हा 56 पदार्थांचा प्रसाद भगवान जगन्नाथाला अर्पण केले जातो. त्यानंतर हा प्रसाद भक्तांना महाप्रसाद म्हणून वाटला जातो. अशापद्धतीन तयार झालेला नैवेद्य भगवान जगन्नाथाला दिवसातून सहा वेळा अर्पण केला जातो. देवाच्या प्रसादाबाबत आणखी एक वैशिष्ट म्हणजे प्रसादासाठी रोज नवी मातीची भांडी वापरली जातात. एकदा का एका भांड्यातील प्रसाद संपून ते भांडं खाली झालं, की त्याला फोडण्यात येतं. (Odisha)

===========

हे देखील वाचा :  Odisha : भगवान जगन्नाथ मावशीच्या घरी का जातात !

भगवान जगन्नाथ यांना रोज 56 पदार्थांचा नैवेद्य चढवला जातो. यात काही पदार्थ हे नेहमी बनवले जातात. त्यात पाखल, खीर, डाळ यांचा समावेश असतो. शिवाय देवासाठी रोज 10 प्रकारच्या मिठाई तयार केल्या जातात. भाज्यांमध्ये मुळा, स्थानिक बटाटा, केळी, वांगी, पांढरा आणि लाल भोपळा, कंद, परवल, मनुका आणि आर्वी यांचा वापर केला जातो. भगवान जगन्नाथांना जो नैवेद्य दाखवला जातो त्यात लवंग, बटाटे, टोमॅटो, लसूण, कांदे आणि फुलकोबी यांचा वापर नसतो. हजारो वर्षापासून हे स्वयंपाकघर म्हणजे, एक रहस्य बनून गेलेलं आहे. (Latest News)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.