Home » Varicose Veins : पायावर लाल, निळ्या रंगाच्या दिसणाऱ्या नसा असू शकते ‘या’ आजाराचे लक्षण

Varicose Veins : पायावर लाल, निळ्या रंगाच्या दिसणाऱ्या नसा असू शकते ‘या’ आजाराचे लक्षण

by Jyotsna Kulkarni
0 comment
Varicose Veins
Share

आपण अनेकदा ऐकले असेल की, बैठे काम, किंवा सतत उभे राहून केलेले काम आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच वाईट असते. अनेकदा अशा कामाच्या पद्धतीनेमुळे आपल्याला शरीराला विविध आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशा कामाच्या पद्धतीमुळे पोटाचे विकार, पाठीचे त्रास, मान आणि डोळ्यांना होणारे त्रास, पायांचे विकार आदी अवयवांना विविध गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. यासाठी आपण पाहिले असेल की, डॉक्टर देखील सांगतात की, बैठे काम असेल तर थोड्या थोड्या वेळाने फेऱ्या मारा, उभे राहून काम असेल तर थोड्या वेळाने बसा. कारण असे केले नाही तर त्रास होण्याची शक्यता अधिक असते. (Varicose Veins) 

खासकरून बैठ्या कामामुळे होणारा एक आजार म्हणजे, व्हेरिकोज व्हेन्स. बैठ्या कामामुळे पाय दुखीचा आजार बळावू शकतो. लोक या पायदुखीकडे दुर्लक्ष करतात, पण असे केल्याने याचा धोका आणखी वाढू शकतो. सतत बसल्यामुळे पाय दुखत असतील किंवा सूज येत असेल तर ते व्हेरिकोज व्हेन्समुळे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पायांमध्ये दिसणाऱ्या निळ्या-जांभळ्या किंवा लाल नसांना व्हेरिकोज व्हेन्स म्हणतात. (Marathi News)

आपले शरीर हे विविध प्रकारच्या नसांचे एक जाळे आहे. आपल्या शरीरात लाखो नसा असून, याच नसांनी आपले शरीर बनले आहे. संपूर्ण शरिरात पसरलेल्या रक्तवाहिन्या सर्कुलेटरी सिस्टिमचा एक भाग आहे. याच नसांच्या माध्यमातून रक्त, ऑक्सिजन आणि न्यूट्रिशियन पूर्ण शरिरात पाठवण्याचे काम पार पडले जाते. अनेक लोकांच्या पायावर कमी जास्त प्रमाणात निळ्या, हिरव्या आणि वांगी रंगाच्या नसा स्पष्ट दिसून येतात. जवळपास सर्वच लोकं याकडे मुकामार असेल असे समजून किंवा इतर कारणाने दुर्लक्ष करतात. मात्र ही इतकी सोपी आणि दुर्लक्ष करता येणारी बाब नाहीये. या अशा रंगांच्या नसांना व्हेरिकोज व्हेन्स म्हटले जाते. (Todays Marathi HEadline)

व्हेरिकोज व्हेन्स नावाचा एक आजार आहे. नसांच्या भींती कमजोर होतात तेव्हा या अशा स्वरूपाची लक्षणे दिसतात. व्हेरिकोज व्हेन्स बहुतकरून करुन पायांमध्ये दिसून येतात. यामुळे नसांमध्ये स्वेलिंग होते आणि त्या जाड, निळ्या आणि वाकलेल्या दिसतात. हा आजार तास गंभीर आणि जीवघेणा नसला तरी वेळेवर उपचार करणे आवश्यक आहे. कारण असे केले नाही तर भविष्यात चालणे-फिरणे कठीण होऊन जाते. काही केसेसमध्ये तर थेट सर्जरीची देखील वेळ येते. या आजारावर कपिंग थेरेपी, लीच थेरेपी, मिट्टी लेप सारख्या थेरेपी गुणकारी ठरतात. आज आपण या लेखात व्हेरिकोज नसांची लक्षणे काय आहेत? ते कसे ठीक करायचे? याबद्दल जाणून घेऊया. (Latest Marathi News)

व्हेरिकोज व्हेन्सची कारणे कोणती?

वाढते वय, लठ्ठपणा, बराच वेळ उभे राहणे किंवा बसणे, जन्मापासून खराब झालेले व्हॉल्व्ह, रजोनिवृत्तीनंतर गर्भनिरोधक गोळ्या घेणे, हार्मोनल बदल, चालण्यामुळे पायांवर येणारा ताण, सतत उभे राहावे लागणे, व्यायामाचा अभाव, गरोदरपणातही हा त्रास होऊ शकतो.

Varicose Veins

व्हेरिकोज व्हेन्सची लक्षणे कोणती?
– पायांमध्ये तीव्र वेदना आणि सूज
– पायांना सतत दुखणे आणि सूज येणे
– संध्याकाळी पाय जड पडणे
– रात्री पायात गोळे येणे
– संध्याकाळी पाय दुखणे
– व्हेरिकोज व्हेन्स लालसर होणे
– व्हेरिकोज व्हेन्स फुगून झालेल्या गाठींना इजा होवुन रक्तस्त्राव
– व्हेरिकोज व्हेन्स फुगून झालेल्या गाठी जवळील त्वचा कोरडी पडणे
– व्हेरिकोज व्हेन्स फुगून झालेल्या गाठींमध्ये सूज

==========

हे देखील वाचा :  वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय, तुळस करेल मदत

केसांच्या तेलकट मूळांमुळे होऊ शकते केसगळती, वाचा कारणे आणि उपाय

==========

व्हेरिकोज व्हेन्ससाठी उपाय कोणते?
व्हेरिकोज व्हेन्स ठीक करण्यासाठी सर्वानीच आपल्या दैनंदिन आयुष्यात आणि लाईफ स्टाइलमध्ये बदल करणे आवश्यक आहे. रोजच्या जेवणात हिरव्या पालेभाज्या खाल्याने नसा डॅमेज होण्याचा धोका कमी असतो. हिरव्या भाज्या खाल्ल्यामुळे नसांमध्ये फॅट आणि कॅल्शियम जमण्यापासून रोखले जाते. यामुळे सर्कुलेटरी सिस्टिम चांगली कार्य करते. मुख्य सर्वांनीच आपले वजन नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. मिठ आणि साखर यांचे आहारातले प्रमाण अतिशय कमी ठेवावे. खूप घट्ट कपडे घालू नका. यासोबतच एप्पल सायडर विनेगर आणि जैतूनचे तेल आपल्या पायाला लावून त्याने मसाज करावा. शिवाय पोहणे, चालणे, सायकलिंग करावे. विविध योगासने केल्याने देखील या व्हेरॉकज व्हेन्स आजारात आराम मिळतो.(Top Marathi HEadline)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.