बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री असलेल्या करिश्मा कपूरचे पूर्वाश्रमीचे पती आणि व्यावसायिक संजय कपूर यांचे १२ जून रोजी रात्री वयाच्या ५३ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने इंग्लंडमध्ये निधन झाले. पोलो खेळत असताना संजय कपूर यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. पोलोची मॅच सुरू असतानाच ही घटना घडली आणि त्यांना लगेचच वैद्यकीय उपचार देण्यात आले, पण त्यांना वाचवण्यात यश आले नाही. संजय कपूर प्रसिद्ध अशा सोना स्टारचे अध्यक्ष होते. संजय कपूर यांच्या अकस्मात मृत्यूने केवळ बॉलिवूड नव्हे, तर संपूर्ण उद्योगजगतात मोठा शोककळा पसरली आहे. (Sanjay Kapoor)
संजय आणि करिश्मा यांचे लग्न २००३ मध्ये झाला होते. या जोडप्याला मुलगी समायरा आणि मुलगा कियान ही दोन मुले आहेत. लग्नानंतर काही वर्षांटच दोघांमध्ये मतभेद सुरू झाले. करिश्माने संजयवर अनेक गंभीर आरोप लावले होते. २०१४ मध्ये दोघांनी घटस्फोटासाठी कोर्ट अर्ज दाखल केला होता. त्यानंतर २०१६ मध्ये कोर्टाने त्यांना घटस्फोट दिला. या दोघांचा घटस्फोट खूपच वादग्रस्त ठरला होता. घटस्फोटानंतर संजय करिश्माला मुलांचा सांभाळ करण्यासाठी दर महिन्याला लाखो रुपये देत होते. तसेच तिला पोटगी म्हणून देखील मोठी रक्कम दिली. (Marathi News)
प्राप्त माहितीनुसार संजय यांच्या तोंडात एक माशी शिरली आणि त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना श्वास घेण्यास देखील त्रास होऊ लागला. संजय कपूरच्या मृत्यूमुळे केवळ कुटुंबच नव्हे तर व्यवसाय विश्वालाही मोठा धक्का बसला आहे. करिश्माला घटस्फोट दिल्यानंतर संजय यांनी २०१७ साली प्रिया सचदेवशी दुसरे लग्न केले. गेल्या आठ वर्षांपासून ते संसार करत होते. घटस्फोटानंतर करिश्मा आणि संजय अनेक वर्ष एकमेकांना भेटले नाहीत. पण २०२३ मध्ये ते अचानक एका डिनर आउटिंगवर दिसले आणि त्यांचे फोटो, व्हिडिओ कमालीचे व्हायरल झाले होते. संजय कपूरने दुसरे लग्न केले असले तरी पण करिश्माने दुसरे लग्न केले नाही. (Todays Marathi Headline)
कोण होते संजय कपूर?
संजय कपूर हे Sona BLW Precision Forgings Ltd. अर्थात Sona Comstar या कंपनीचे चेअरमन होते. ही कंपनी ऑटोमोटिव्ह कंपोनेंट मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात कार्यरत आहे. यासोबतच संजय कपूर यांची रिअल इस्टेटमध्येही मोठी गुंतवणूक होती. संजय कपूर हे भारतातील ऑटो उद्योगातील प्रणेते होते. त्यांनीच सोनो ग्रुपची स्थापना केली. या कंपनीमध्ये ऑटोमोटिव्ह भाग बनविले जातात. संजय कपूर यांनी त्यांच्या कंपनीला मोठा नावलौकिक मिळवून दिला. संजय यांची कंपनी इलेक्ट्रिक २ चाकी आणि ३ चाकी भाग बनवते.(Latest Marathi News)
संजय कपूर सोना कॉमस्टेटर कंपनीचे अध्यक्ष झाले. त्यांच्या नेतृत्वात, या कंपनीने भारतासोबतच परदेशातही मोठा नाव कमावले. संजय कपूर यांनी देहरादूनमधील दून स्कूलमधून मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमध्ये अभ्यास केला. नंतर ते परदेशात अभ्यासासाठी गेले. त्यांनी लंडन येथे कॉर्पोरेट रणनीती आणि एचआरपर्यंत बीबीए केले. इतकेच नव्हे तर संजयने एमआयटी आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून उच्च शिक्षण घेतले. (Top Marathi News)
संजय कपूर हे ACMA (ऑटो कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन) चे माजी अध्यक्ष होते. त्याचबरोबर ते प्रसिद्ध दून स्कूलचे ट्रस्टी देखील होते. याशिवाय, संजय कपूर यांची नुकतीच भारतीय उद्योग परिसंघ (CII) च्या उत्तर विभागाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. त्यांनी उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड या सात राज्यांमध्ये आणि चंदीगड, जम्मू आणि काश्मीर, लडाख या तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये CII नॉर्थ सेक्टर चे नेतृत्व करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. (Top Marathi Headline)
संजय कपूर यांना पोलो खेळण्याची खूप आवड होती. ते अनेकदा पोलो खेळताना आणि त्यांच्या घोड्यांसह वेळ घालवताना दिसायचे. त्यांच्या आवडीचा पोलो खेळ खेळत असतानाच संजय यांनी आपला जीव गमावला. संजय कपूर यांनी व्यावसायिक आयुष्यात खूप मोठे नाव कमावले. मात्र त्यांचे वैयक्तिक आयुष्य कायम वादात आणि चर्चेत राहिले. (Social Updates)
संजय कपूर यांनी तीन वेळा लग्न केले. त्यांचे पहिले लग्न डिझाइनर नंदिता महातानीशी झाले होते. मात्र लग्नानंतर काही वर्षांनी २००० साली त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर, २००३ मध्ये संजय कपूर यांनी अभिनेत्री करिश्मा कपूरशी लग्न केले. त्यांना दोन मुलं देखील झाले. मात्र हे नाते देखील जास्त काळ टिकले नाही आणि २०१६ मध्ये करिश्मा आणि संजय यांचा घटस्फोट झाला.(Top Stories)
बॉलिवूडमधील अतिशय चर्चित जोडी म्हणून करिश्मा आणि संजय ओळखले जायचे. घटस्फोटानंतरही संजय त्यांच्या मुलांना भेटायचे त्यांच्यासोबत वेळ घालवायचे. घटस्फोटानंतर संजय कपूरने करिश्मा आणि त्यांच्या दोन मुलांच्या नावावर 14 कोटी रुपयांचे बाँड खरेदी केले होते. याशिवाय करिश्मा कपूरला संजयच्या वडिलांचे घरही देण्यात आलं. एवढंच नाही तर, आजपर्यंत संजय कपूर प्रत्येक महिन्याला करिश्माला १० लाख रुपये देत होता. संजय मुलांच्या शिक्षणाचा देखील खर्च देत होता. (Marathi Trending News)
===========
हे देखील वाचा : Plane Crash : ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्सच सांगतो अपघाताचे कारण
Plane Crash: विमान कोसळण्यापूर्वी पायलटचा Mayday कॉल, मात्र Mayday म्हणजे काय?
===========
संजय कपूर यांची संपत्ती
२०२५ सालातल्या फोर्ब्सच्या अहवालानुसार संजय कपूर यांची एकूण संपत्ती १.१ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी होती. रिअल-टाईम बिलियनेयर्स इंडेक्सनुसार संजय कपूर यांच्याकडे १.१८ अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती होती, तर ब्लूमबर्गच्या अंदाजानुसार ती १.१५ अब्ज डॉलर्स होती. शिवाय त्यांच्याकडे दिल्ली, मुंबई आणि लंडनमध्ये कोट्यवधींची मालमत्ता असल्याचेही सांगितले जात आहे. (Top Marathi News)