Home » IPL : विजेता बनल्यानंतर आरसीबीला मिळाली कोट्यवधींची बक्षिसे, अंबानी देखील मालामाल

IPL : विजेता बनल्यानंतर आरसीबीला मिळाली कोट्यवधींची बक्षिसे, अंबानी देखील मालामाल

by Jyotsna Kulkarni
0 comment
IPL
Share

आयपीएल सुरु होऊन तब्बल १८ वर्ष झाली मात्र या १८ वर्षांमध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाला एकदाही ही ट्रॉफी जिंकता आली नाही. मात्र २०२५ हे वर्ष विराटाचे आणि आरसीबीचे ठरले. यांच्याच्या आयपीएलच्या १८ व्या हंगामाचे विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पटकावले आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. हा अंतिम सामना जिंकत आरसीबीने इतिहासच घडवला आहे. अंतिम सामन्यात आरसीबीनेपंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करून हा ऐतिहासिक विजय मिळवला. आरसीबीचा स्टार खेळाडू असलेल्या विराटने ३५ चेंडूत ४३ धावांची खेळी खेळली. मात्र बंगळुरूने दमदार गोलंदाजीच्या जोरावर आयपीएल २०२५ चे विजेतेपद पटकावले. (IPL)

जिथे सामने असतात, हार जीत असते तिथे बक्षिसं देखील असतातच. आरसीबीने हा मोठा विजय मिळवल्यानंतर त्यांच्यावर देखील बक्षिसांचा मोठा वर्षाव झाला आहे. केवळ आरसीबीच नाही तर पंजाब किंग्स, मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या तीन संघाना देखील भरघोस बक्षिसे देण्यात आली आहे. जाणून घेऊया आयपीएल १८ च्या शेवटी कोणत्या खेळाडूला, संघाला कोणती बक्षिसे दिली गेली आहेत. (Marathi News)

IPL

आयपीएल 2025 मधील प्राइज मनी

• विजेता टीम (रॉयल चॅलेंजर्स बँगलोर )- 20 कोटी रुपये

• उप-विजेता (पंजाब किंग्स)- 13 कोटी रुपये

• तिसऱ्या स्थानी असलेली वाली टीम (मुंबई इंडियन्स )- 7 कोटी रुपये

• चौथ्या स्थानावरची टीम (गुजरात टायटन्स)- 6.5 कोटी रुपये

• सीझनमध्ये सर्वाधिक धावा (ऑरेंज कॅप)- साई सुदर्शन (७५९ धावा) 10 लाख रुपये

• सीझनमध्ये सर्वाधिक विकेट (पर्पल कॅप)- प्रसिद्ध कृष्णा (25 विकेट) 10 लाख रुपये

• सुपर स्ट्रायकर ऑफ द सीजन- वैभव सूर्यवंशी Tata Curv ईवी कार

• सीझनमध्ये सर्वाधिक सिक्स- निकोलस पूरन 10 लाख रुपये

• सीझनमध्ये सर्वाधिक डॉट बॉल- मोहम्मद सिराज 10 लाख रुपये

• सीझनमधील सर्वोत्तम कॅच- कामिंदु मेंडिस 10 लाख रुपये

• इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीजन- साई सुदर्शन 10 लाख रुपये

• मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द सीजन- सूर्यकुमार यादव 15 लाख रुपये

• सीझनमध्ये सर्वाधिक चौकार- मोहम्मद सिराज 10 लाख रुपये, साई सुदर्शन 10 लाख रुपये

• फेअर प्ले अवॉर्ड: चेन्नई सुपर किंग्स

• पिच अँड ग्राउंड अवॉर्ड : DDCA (दिल्ली डिस्ट्रिक्ट एंड क्रिकेट एसोसिएशन) 50 लाख रुपये

दरम्यान आरसीबी टीमने आयपीएल १८ या पर्वाचे विजेतेपद पटकावले आणि त्यांच्यावर बक्षिसांची लयलूट करण्यात आली. असे असले तरी IPL 2025 च्या फायनलने केवळ BCCI च नाही, तर जियो हॉटस्टारवर देखील पैशांचा पाऊस पाडला. यावर्षी जियो हॉटस्टारवर अंतिम सामना तब्बल ६४.३ कोटी प्रेक्षकांनी पहिला. मागच्यावर्षी ६०.२ कोटी क्रिकेट प्रेमींनी जियो सिनेमावर आयपीएल फायनल पाहण्याचा आनंद लुटला होता. यंदा हा रेकॉर्ड मोडीत निघाला. Royal Challengers Bengaluru आणि Punjab Kings यांच्यातील अंतिम सामन्यातून अंबानी यांनी भरपूर पैसा कमावला. हॉटस्टार आणि जियो सिनेमाच्या मर्जरनंतर जियो हॉटस्टारमध्ये मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा ६३.१६ टक्के हिस्सा आहे. फायनल मॅच दरम्यान जबरदस्त व्यूअरशिप मिळाली. (Top Marathi Headline)

IPL

===============

हे ही वाचा : IPL : आरसीबी आयपीएल चॅम्पियन, विराटचे १८ वर्षांचे स्वप्न अखेर साकार

================

मुकेश अंबानी या मॅचमधून पैसा कसा कमवतात?
मॅच पाहण्यासाठी लोकं जियो हॉटस्टारच सब्सक्रिप्शन विकत घेतात. त्यातून जियो हॉटस्टारला पैसा मिळतो. सब्सक्रिप्शन प्लान्समधून रेवेन्यू वाढतो आणि मुकेश अंबानी बक्कळ पैसा कमवतात. केवळ सब्सक्रिप्शन प्लान्स नाही, मॅचच्या लाइव स्ट्रीमिंग दरम्यान दाखवल्या जाणाऱ्या जाहीरातींमधून देखील मुकेश अंबानी तगडी कमाई करतात. रिपोर्टनुसार आयपीएल मॅच दरम्यान १० सेकंदाच्या जाहीरातीसाठी १८ ते १९ लाख रुपये चार्ज केले जातात. यावेळी त्यात २० ते ३० टक्के वाढू होऊ शकते. (Top Marathi News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.