Home » Bicycle : सायकल चालवण्यामुळे शरीराला होतात ‘हे’ मोठे लाभ

Bicycle : सायकल चालवण्यामुळे शरीराला होतात ‘हे’ मोठे लाभ

by Jyotsna Kulkarni
0 comment
Bicycle
Share

बऱ्याच काळापूर्वी जेव्हा पेट्रोलवरच्या गाड्या नव्हत्या तेव्हा सायकल हेच वाहतुकीचे साधन होते. जुन्या काळी ज्या घरासमोर सायकल उभी असायची तो श्रीमंत समजला जायचा. सायकल म्हणजे प्रतिष्ठेचे प्रतीक समजले जायचे. जवळ लांबच्या प्रवासासाठी सायकलचा वापर केला जायचा. मात्र काळ बदलत गेला तशी सायकलसोबतच अनेक नवनवीन वाहनं बाजारात आली आणि सायकल हळू हळू मागे पडू लागली. आजकाल रस्त्यांवर सायकल कमी आणि आलिशान महागड्या गाड्यांचा वापर प्रवासासाठी होत असून सायकलचा वापर केवळ व्यायामासाठी, निरोगी शरीरासाठी केला जातो. (Bicycle)

पूर्वीचे लोकं अनेक मैल सायकलने प्रवास करायचे. त्यामुळे त्यांचा फिटनेस कमालीचा होता. आता मात्र सकाळची जागा आलिशान गाड्यांची घेतली आणि त्यांच्या आरोग्यावर याचा परिणाम दिसू लागला. आजच्या काळात सायकलचा वापर प्रवासासाठी कमी फिटनेससाठी जास्त केला जात आहे. सायकल चालवण्यामुळे केवळ शारीरिक आरोग्य चांगले राहत नाही, तर मानसिक आरोग्य देखील सुधारते. आजकाल गरीब श्रीमंत सर्वच सर्रास सायकल चालवत आपला फिटनेस जपतात. (Marathi News)

सर्वांना करता येणारा व्यायाम सायकल चालवण्याचा व्यायाम सोपा आणि कोणीही सहज करू शकतो असा आहे. व्यायामाची सुरुवात करणारा तसंच आजारातून उठलेल्या व्यक्तीही सायकलिंगपासून व्यायामाची सुरुवात करू शकतात. दररोज २० ते २५ मिनिटे सायकल चालवल्याने शरीर अनेक गंभीर आजारांपासून सुरक्षित राहते.  दिवसभरात जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा कमीतकमी २० ते २५ मिनिटे सायकल चालवावी. मात्र यातही सकाळी सायकल चालवण्याचे फायदे जास्त आहेत कारण संध्याकाळपेक्षा सकाळी जास्त ऊर्जा शरीराला मिळते. आज जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊया सायकलिंगचे फायदे. (Top Stories)

Bicycle

मेंदूसाठी चांगले
एका अभ्यासानुसार, ज्या लोकांना स्मरणशक्तीशी संबंधित समस्या आहेत, अशा लोकांनी सायकल चालवणे लाभदायक ठरते. सायकल चालवण्यामुळे स्मरणशक्ती तीक्ष्ण होते. संशोधनात असे दिसले की जे लोक सायकल चालवत नाहीत त्यांची स्मरणशक्ती सायकल चालवणाऱ्यांच्या तुलनेत कमी असते.

चांगली झोप लागते
दररोज 25 ते 30 मिनिटे सायकल चालवल्यास रात्री चांगली झोप लागते. सायकल चालवल्याने शरीराचे स्नायू ताणले जातात त्यामुळे शरीर थकते. आणि छान झोप लागते. (Top Marathi Headlines)

वजन कमी करण्यास फायदेशीर
वजन कमी करण्यासाठी जीममध्ये सायकलिंग करायला सांगितले जाते. मात्र तुम्ही जिममध्ये न जाता दररोज अर्धा तास सायकलिंग केली तर नक्कीच तुमचे वजन नैसर्गिक पद्धतीने कमी होईल. सायकल चालवल्याने शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न होतात, त्यामुळे वजन कमी होते.

त्वचेवर ग्लो येतो
सायकलिंग केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत राहते आणि त्यामुळे त्वचेच्या पेशींना चांगले पोषक तत्व मिळतात. यामुळे त्वचेवर चमक येते आणि तुम्ही तरुण राहता. (Todays Marathi Headline)

रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते
सायकलिंग शरीरात आवश्यक प्रथिनांचे उत्पादन वाढवून, पांढऱ्या रक्त पेशींना उत्तेजित करून आपली प्रतिकारशक्ती सुधारू शकते. सायकलिंग केल्याने माणसाची सहनशक्तीही वाढते.

हृदय, श्वसन संस्थेचे कार्य सुधारते
सायकलिंग केल्यामुळे हृदयाचे आणि श्वसन संस्थेचे कार्य सुधारते. त्यामुळे भरपूर व्यायाम केला, तरी शरीर तो व्यायाम सहन करू शकतं. सायकलिंगमुळे फुप्फुसाचं कार्य सुधारण्यावर देखील सकारात्मक परिणाम होतो. (Social Updates)

=========

मानसिक आरोग्य सुधारते
सायकल चालवण्यामुळे मानसिक आरोग्य चांगलं राहत. मोकळ्या वातावरणात रम्य ठिकाणी सायकलवरून रपेट मारल्यानं मेंदूवरचा ताण कमी होतो. राग, चिडचिड, नैराश्य कमी होऊन शांतता मिळते, असे एका अभ्यासात दिसून आले आहे.

अनेक आजारांना प्रतिबंध
दररोज २० मिनिटं सायकल चालवण्यामुळे हृदयविकार, स्ट्रोक, कर्करोग, मधुमेह, ऑस्टिओआर्थ्रायटिस, लठ्ठपणा अशा आजारांचा धोका कमी होतो.

टीप :- हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.