विजय सेथुपथी आणि आर. माधवन यांचा दाक्षिणात्य ब्लॉकबस्टर चित्रपट विक्रम वेधा आता हिंदीमध्ये येत आहे. यात ऋतिक रोशन (Hrithik Roshan) ‘वेधा बेताल’ या खलनायकाच्या भूमिकेत असणार आहे. ऋतिकचे, विक्रम वेधामध्ये तिन वेगवेगळे लूक आहेत. मूळ तामिळ ॲक्शन थ्रिलर ‘विक्रम वेधा’ चित्रपटानं कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडले होते.
बाहुबली चित्रपटासारखे विक्रम वेधाला यश मिळालं. आता हिंदी रिमेकमध्ये ऋतिक रोशन (Hrithik Roshan) खलनायकाच्या भूमिकेत असल्यानं त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. ऋतिक रोशन (Hrithik Roshan) बरोबर सैफ अली खान आणि राधिका आपटे प्रमुख भुमिकेत असणार आहे. कोरोनामुळे चित्रपाटाच्या शुटींग शेड्युलला पुढे करण्यात आले असले, तरी ३० सप्टेंबर २०२२ रोजी विक्रम वेधा प्रदर्शित होईल, असं निर्माते पुष्कर-गायत्री यांनी सांगितले.
‘सुपर 30’ या चित्रपटासाठी ऋतिक रोशननं खूप मेहनत घेतली होती. युपी-बिहारची बोली भाषा यामध्ये होती. त्याचा भरपूर सराव ऋतिकला करावा लागला होता. तोच सराव विक्रम वेधासाठी कामी येणार आहे. विक्रम वेधाची कथा कानपूरभोवती गुंफण्यात आली आहे. त्यामुळे तेथील भाषेचा लहेजा पुन्हा एकदा ऋतिकच्या बोलण्यात दिसणार आहे.

दाक्षिणात्य विक्रम वेधानं बॉक्स ऑफीसवर तुफान यश मिळवले. कमाईत जगभारत उच्चांकी आकडा ओलांडल्याचे सांगण्यात येते. याशिवाय विक्रम वेधाने प्रत्येकी चार फिल्मफेअर पुरस्कार मिळवले आहेत. नॉर्वे मध्येही या चित्रपटाचा गौरव झाला आहे. अशा चित्रपटाचा हिंदी रिमेक चित्रपटाच्या टीमसाठी आव्हानात्मक असणार आहे.
दोन वर्षापूर्वी विक्रम वेधाच्या रिमेकची घोषणा झाली होती. मात्र या चित्रपाटामागेही कोरोनाचे संकट लागले आहे. गेल्या वर्षी चित्रपटाचा काही भाग उत्तर प्रदेशमध्ये चित्रीत करण्यात येणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे ते शक्य झाले नाही. मुंबईत कानपूर सारखा सेट उभारण्यात आला, पण तिथेही लॉकडाऊनचे नियम लागले. परिणामी तो सेट सोडून भोपाळमध्ये काही शुटींग केल्यावर चित्रपटाचे संपूर्ण युनिट अबुधाबीमध्ये गेले.
मूळ विक्रम वेधा चित्रपटामध्ये आर माधवन इंस्पेक्टरच्या भूमिकेत आहे. माधवन सध्या मुलाच्या शिक्षणाच्या निमित्तानं दुबईमध्ये असल्यानं त्यांनी हिंदी रिमेकसाठी विशेष मेहनत घेतली. ऋतिक रोशनला त्यांनी या चित्रपटासाठी अनेक टिप्स दिल्या आहेत.
कोरोनामुळे विक्रम वेधाचे शेड्यूल पार कोसळले आहे. मुंबईमधील शुटींगला कोरोनाचा फटका बसल्यावर आता अमेरिकेलाच बाकीचे सर्व शुट पूर्ण करण्याचा निर्णय निर्मांत्यांनी घेतला आहे. मात्र, तेथेही सध्या कोरोना रुग्णांचा विक्रमी आकडा असल्यानं शूट पुढे करण्यात आलं आहे.
सन २०१८ मध्येच निर्माते पुष्कर-गायत्री यांनी विक्रम वेधाच्या हिंदी रिमेकची घोषणा केली होती. सैफ अली खान पोलीस अधिकारी, तर अमिर खान गॅंगस्टर असे कास्टिंगही झाले होते. दरम्यान अमिर खाननं या चित्रपटाला नकार दिला आणि ही भूमिका ऋतिकला मिळाली.
ऋतिक रोशनच्या करीअरमध्येही विक्रम वेधा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून ऋतिकने २००० साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ऋतिक रोशन (Hrithik Roshan) आता पन्नाशीच्या जवळ पोहचला आहे. तरीही त्याची लोकप्रियता अद्यापही कायम आहे.
संजय जाधव पहिल्यांदाच करणार ऐतिहासिक प्रेमकहाणीचे छायांकन!!
सन २२ वर्षांच्या करिअरमध्ये त्याने अनेक चांगल्या चित्रपटांना नकार दिला. हे सर्व चित्रपट सुपरहिट ठरले. यामध्ये विशेष उल्लेखनीय चित्रपट म्हणजे, लगान आणि स्वदेश आणि बाहुबली. साऊथचे स्टारमेकींग दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे एसएस राजामौली बाहुबलीसाठी पहिल्यांदा ऋतिककडेच आले होते. ऋतिकनं बाहुबलीला नकार दिला आणि प्रभास बाहुबली म्हणून हिट ठरला.
आता करीअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर ऋतिकनं विक्रम वेधा मध्ये वेगळी रंगछटा असलेली भूमिका स्विकारल्याचे बोलले जात आहे. ऋतिकच्या या विक्रमची तुलना विजय सेथुपथीबरोबर नक्कीच होणार आहे. मात्र त्यासाठी सप्टेंबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे.
– सई बने