अमर, अकबर, अँथनी या Movie मध्ये एक Scene आहे. ज्यामध्ये अमर, अकबर, अँथनी हे तिन्ही जण आपल्या आईला मिळून रक्त देतात. ते पण कोणत्याही मशीनने नाही तर फक्त Saline च्या Bottles ने आता ते कितीही illogical असलं तरी त्यात महत्त्वाची गोष्ट होती रक्तदान! जगभरात दरवर्षी लाखो लोकांना रक्ताची गरज भासते – अपघातात रक्त गमावल्यामुळे, Operation दरम्यान किंवा Emergency Situations मध्ये रक्ताची गरज जास्त भासते. पण अमर, अकबर, अँथनी Movie मध्ये दाखवल्या सारखी Technology नसल्यामुळे रक्ताचा तुटवडा आणि रक्तगट जुळवण्याचं टेन्शन यामुळे अनेकांचा जीव जातो. खासकरून जपानसारख्या देशात, जिथे दिवसंदिवस लोकसंख्या कमी होतेय आणि रक्तदान करणारेही कमी होतायत. पण आता काळाची गरज म्हणून जपानमधले वैज्ञानिक एक असा चमत्कार घडवतायत, जो रक्ताच्या या समस्येवर कायमचा उपाय ठरू शकतो ते म्हणजे कृत्रिम रक्त! हे कृत्रिम रक्त काय आहे? ते कसं बनतं? आणि ते कधी वापरात येणार? हे जाणून घेऊ. (Artificial Blood)
तर जपानमधल्या वैज्ञानिकांनी एक असं रक्त बनवायला सुरुवात केली आहे, ज्याला रक्तगटाची गरज नाही. म्हणजे कोणालाही, कधीही, कुठेही हे रक्त देता येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे, हे रक्त खराब होत नाही – ते तब्बल दोन वर्षं सामान्य तापमानात टिकू शकतं. सामान्य म्हणजे खरं रक्त फक्त एक महिना टिकतं, पण हे कृत्रिम रक्त दोन वर्ष. हे रक्त Emergency Situations ना गेमचेंजर ठरू शकतं. (International News)
जपानमधल्या नारा मेडिकल युनिव्हर्सिटीमधले प्रोफेसर हिरोमी साकाई आणि त्यांची टीम यावर गेल्या अनेक वर्षांपासून काम करतायत. त्यांनी रक्तातला हिमोग्लोबिन – जो ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करतो – त्याचा वापर करून छोट्या छोट्या कृत्रिम रक्तपेशी बनवल्या आहेत. या पेशी बनवण्यासाठी त्यांनी expired झालेल्या रक्तातून हिमोग्लोबिन काढलं आणि त्याला एका खास आवरणात बंद केलं. यामुळे हे रक्त विषाणूंपासून सुरक्षित आहे आणि कोणत्याही रक्तगटाशी जुळतं. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ती गोष्ट ऐकण्याआधी गाजावाजाला subscribe करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा! तरच तुमच्या पर्यंत इंटरेस्टिंग व्हिडिओज पोहचतील. तर कृत्रिम रक्ताची सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे कृत्रिम रक्त जांभळ्या रंगाचं आहे.(Artificial Blood)
दुसरीकडे, चुओ युनिव्हर्सिटीमधले प्रोफेसर तेरुयुकी कोमात्सु यांनीही असंच एक कृत्रिम रक्त बनवलंय, जे रक्तदाब स्थिर ठेवण्यासाठी आणि रक्तस्त्राव किंवा स्ट्रोकसारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी वापरता येईल. त्यांनी प्राण्यांवर केलेल्या चाचण्यांमध्ये यश मिळालंय, आणि आता ते माणसांवर चाचण्या करण्याच्या तयारीत आहेत. (Top Stories)
या संशोधनाची सुरुवात छोट्या चाचण्यांपासून झाली. 2022 मध्ये वैज्ञानिकांनी या कृत्रिम रक्ताच्या छोट्या पेशींची चाचणी केली आणि त्यातून त्यांना खात्री पटली की हे रक्त सुरक्षित आहे आणि ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम उत्तम करतं. आता, जुलै 2024 मध्ये नारा मेडिकल युनिव्हर्सिटीने जाहीर केलंय की मार्च 2025 पर्यंत ते निरोगी लोकांवर या रक्ताची चाचणी सुरू करतील. या चाचणीत 100 ते 400 मिलिलिटर कृत्रिम रक्त लोकांना देण्यात येईल. जर यात काही दुष्परिणाम दिसले नाहीत, तर पुढच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर चाचण्या होतील.(Artificial Blood)
=================
हे देखील वाचा : Vitamin D : उन्हाळ्यात व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी खा हे पदार्थ, रहाल तंदुरुस्त
=================
वैज्ञानिकांचं असं म्हणणं आहे की 2030 पर्यंत हे कृत्रिम रक्त प्रत्यक्षात हॉस्पिटल्समध्ये वापरता येईल. जर हे यशस्वी झालं, तर जपान हा असा पहिला देश ठरेल, जिथे कृत्रिम रक्त खऱ्या अर्थाने वापरलं जाईल.
जपानमध्ये लोकसंख्या कमी होतेय, रक्तदान करणाऱ्या लोकांची संख्या कमी होतेय, आणि Emergency Situations मध्ये रक्त मिळणं कठीण आहे. भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये किंवा दुर्गम भागात, जिथे रक्तगट जुळवणं आणि रक्त साठवणं हे मोठं आव्हान आहे. त्यामुळे हे कृत्रिम रक्त या सगळ्या समस्यांवर चांगला उपाय ठरेल.(Artificial Blood)
जपानचं हे संशोधन फक्त टेक्नॉलॉजीचा चमत्कार नाही, तर लाखो लोकांचा जीव वाचवण्याची एक मोठी आशा आहे. जर हे यशस्वी झालं, तर भविष्यात रक्ताचा तुटवडा किंवा रक्तगट जुळवण्याची गरजच उरणार नाही. जपानच्या या प्रयत्नांमुळे वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडून एक नवं पर्व सुरू होऊ शकतं.