अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टनमधील ज्यू संग्रहालयातून सारा आणि यारॉन हे प्रेमी जोडपं हातात हात घालून बाहेर पडत होतं. दोघांचेही चेहरे आनंदी होते, पुढच्या आठवड्यात त्यांचे लग्न होणार होते. यारॉननं सारासाठी एक महागडी अशी हि-याची अंगठीही खरेदी केली होती. सारासह भावी आयुष्याची सुंदर स्वप्न बघत असतांनाच बंदुकीच्या गोळीचा आवाज आला आणि पुढच्या क्षणी एक गोळी यारॉनच्या मर्मस्थानी लागली. काय होतंय हे समजायच्या आतच आणखी एक गोळी आली आणि तिनं साराचा वेध घेतला. एका प्रेमकहाणीचा हा क्रूर शेवट होता. बंदुकीच्या दोन गोळ्यांनी एक प्रेमकहाणी संपवली. ही प्रेमकहाणी होती, इस्रायल दूतावासात काम करणा-या यारॉन लिश्चिन्स्की आणि सारा मिलग्रीम यांची. (Sarah and Yaron)
उज्ज्वल आयुष्याचे स्वप्न त्यांच्यापुढे होतं. पण हे आयुष्य सुरु होण्यापूर्वीच एका माथेकरुनं त्यांना ठार केलं. वॉशिंग्टनमधील इस्रायली दूतावासातील या दोन कर्मचाऱ्यांची हत्या झाल्यावर आता त्याचा निषेध करण्यात येतोय. अमेरिकन पोलीसांनी या माथेफिरू आरोपीला घटनास्थळावरुनच अटक केली आहे. मात्र सारा आणि यारॉन हे आपल्यात नाहीत, यावर त्यांच्या नातेवाईकांचा विश्वासच बसत नाही. एका प्रेमकहाणीचा हा करुण अंत या दोघांच्या मित्रपरिवाला दुःखात लोटून गेला आहे. दोन दिवसापूर्वी अमेरिकेच्या वॉशिंग्टन मधील इस्रायली दुतावासातील यारॉन लिश्चिन्स्की आणि सारा मिलग्रीम या दोन कर्मचा-यांच्या हत्यनं मोठी खळबळ उडाली आहे. सारा आणि यारॉन यांची हत्या ही ज्यू संग्रहालयाजवळच करण्यात आली. हा सर्वच भागात कायम मोठा पोलीस बंदोबस्त असतो. हायप्रोफाईल अशा भागातून अशा प्रकारचे हत्याकांड झाल्यानं अमेरिकेतील सुरक्षा यंत्रणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (International News)
या सर्वात एका प्रेमकहाणीचा दुःखद शेवट झाल्याचीही हळहळ व्यक्त होत आहे. अमेरिकेतील इस्रायली दूतावासात यारॉन लिश्चिन्स्की आणि सारा मिलग्रीम हे दोघंही काम करत होते. सारा आणि यारॉन हे एकमेकांच्या प्रेमात होते. सध्या या दोघांचीही गडबड सुरु होती, ती लग्नाची. पुढच्या काही दिवसात हे दोघंही इस्रायलला जाणार होते. नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या गोतावळ्यात लग्न करण्यासाठी त्यांची तयारी सुरु होती. दोघंही लग्नाच्या खरेदीला लागले होते. यारॉननं तर सारासाठी एक महागडी अशी हि-याची अंगठीही खरेदी केली होती. या हत्याकांडापूर्वीच ही हि-याची अंगठी त्यांनी आपल्या मित्रमंडळींना दाखवली होती. हिच अंगठी खिशात असतांना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. इस्रायली दूतावासातील प्रत्येक कर्मचा-याला या हत्याकांडानं हादरुन सोडलं आहे. यारॉन लिश्चिन्स्की आणि सारा मिलग्रीम हे जोडपं सर्वांचं लाडके होते . दोघेही हुशार आणि प्रतिभान म्हणून ओळखले जात होते. अमेरिकेतील इस्रायली राजदूत येशिएल लीटर यांनाही या घटनेमुळे जबर धक्का बसला आहे. (Sarah and Yaron)
या दोघांच्या लग्नासाठी आम्ही तयारी करत होतो, आमच्या कुटुंबातील हा लग्नसोहळा होता, पण अशाचवेळी या प्रेमी जोडप्यांना मारण्यात आलं. ही घटना आम्ही कधीही विसरु शकणार नाही, या शब्दात लीटर यांनी आपले दुःख व्यक्त केले आहे. सारा आणि यारॉन हे पुढच्याच आठवड्यात आपल्या मायभूमीत जाणार होते. तिथे जेरुसलेममध्ये साराला अंगठी देऊन यारॉन लग्नाचा प्रस्ताव देणार होता. पण त्याआधीच साराचाही गोळीबारात मृत्यू झाला आहे. सारा मिलग्रीम ही इस्रायली दूतावासाच्या सार्वजनिक राजनैतिक विभागात काम करत होती. सारानं अमेरिकन विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय अभ्यासात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली होती. याशिवाय, साराने संयुक्त राष्ट्रांच्या शांती विद्यापीठातून नैसर्गिक संसाधने आणि शाश्वत विकास या विषयात पदव्युत्तर पदवी देखील घेतली होती. (International News)
==========
हे देखील वाचा : Admission : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची नवीन तारीख जाहीर
Kim Jong Un : किमची युद्धनौका फुस्स !
==========
यारॉन हा सुद्धा इस्रायली दूतावासात राजनैतिक विभागात काम करत होता. लवकरच त्याची बढती होणार होती, त्यामुळे या दुहेरी आनंदात असतांना त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या दोघांवर ज्यांनी गोळ्या झाडल्या त्याचे नाव एलियास रॉड्रिग्ज असे आहे आणि तो शिकागोचा रहिवासी आहे. सारा आणि यारॉनच्या हत्येनंतर अमेरिकेतील इस्रायली नागरिकांनी निषेध मोर्चा काढला आणि आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. सारा आणि यारॉनच्या प्रेमकहाणीचा असा करुण अंत झाल्यानं सर्वांना मोठा धक्का बसला आहे. जिथे हे दोघंही आपल्या लग्नासाठी पुढच्या आठवड्यात जाणार होते, त्याच इस्रायलच्या शहरात आता त्यांचे मृतदेह पाठवण्यात येत आहेत. आता या प्रेमी जोडप्यावर एकत्र अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. एका माथेफिरुनच्या बंदुकीतून झाडलेल्या गोळीनं दोन प्रेमी जीवांचे आयुष्य मात्र हरवून नेले आहे. (Sarah and Yaron)
सई बने