हिंदू धर्मामध्ये एकादशीला खूपच महत्व आहे. खासकरून वारकरी संप्रदायाची तर एकादशी अतिशय खास तिथी असते. संपूर्ण वर्षभरात २४ एकादशी येतात. या सर्वच एकादशी विविध कारणांसाठी अतिशय महत्वाच्या असतात. हिंदू पंचांगाप्रमाणे महिन्यातला दोन पंधरवड्यांत प्रत्येकी एक अशा किमान दोन एकादशी येतात. एकादशीला उपवास करण्याची परंपरा आहे. एकादशी आणि एकादशीचा उपवास करणाऱ्यांमध्ये स्मार्त आणि भागवत असे दोन भेद आहेत. त्यासाठी दोन प्रकारच्या एकादशी मानल्या जातात. भागवत धर्म पाळणारे, वारकरी इत्यादी लोक भागवत एकादशी, तर स्मृतींना मानणारे स्मार्त एकादशी पाळतात. (Ekadashi)
आज वैशाख महिन्यात येणारी अपरा एकादशी साजरी केली जात आहे. अपरा एकादशी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र दिवस आहे, जो ज्येष्ठ कृष्ण पक्षातील एकादशीला येतो. जो २३ मे ला येत आहे याला “अजला एकादशी” असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूच्या आणि देवी लक्ष्मीच्या पूजा, उपासनेला विशेष महत्त्व आहे. असे केल्याने यासोबतच व्यक्तीचे दुःख दूर होतात, त्याला मोक्ष मिळतो. अपरा एकादशी तिथी शुक्रवार, २३ मे रोजी पहाटे १.१२ वाजता सुरू होईल. या तिथीची समाप्ती २३ मे रोजी रात्री १०.२९ वाजता होईल. उदयतिथीनुसार, अपरा एकादशीचे व्रत शुक्रवार, २३ मे रोजी पाळले जाईल. (Marathi Top News)
अपरा एकादशी व्रताचे पूजन
अपरा एकदशीचे व्रत आचरणाऱ्यांनी पहाटे लवकर उठावे. आपले नियमित नित्यकर्म आटोपून, श्रीविष्णूंच्या पूजनाचा संकल्प करावा. श्रीविष्णूंचे आवाहन करून त्यांची स्थापना करावी. श्रीविष्णूंना पंचामृताचा नैवेद्य दाखवून अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर गंध, अक्षता, तुळशीची पाने, फुले, फळे अर्पण करावीत. त्यानंतर धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी. नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. या दिवशी यथाशक्ती दान करावे. या दिवशी फळे खा आणि धान्य खाऊ नका. दुसर्या दिवशी उपोषण केल्यानंतर ब्राह्मणांना भोजन द्या आणि दान द्या. (Marathi Top News)
अपरा एकादशीचे महत्व
अपरा एकादशीचे व्रत केल्याने पापांचा नाश आणि मोक्षप्राप्ती मिळते अशी मान्यता आहे. या व्रताच्या प्रभावाने ब्रह्महत्या, गोहत्या आणि निंदा यासारख्या पापांपासून मुक्तता मिळते. या दिवशी भगवान विष्णूच्या वामन रूपाची पूजा केली जाते. शिवाय या दिवशी अपरा एकादशीची कथा ऐकल्याने आणि वाचल्याने एक हजार गाई दान केल्याचे पुण्य मिळते. (Marathi Latest News)
अपरा एकादशी – कथा १
प्राचीन काळी एक ब्राह्मण धर्मभ्रष्ट होऊन वागत होता. त्यामुळे प्रायश्चित्त म्हणून समाजाने त्याला बहिष्कृत केले. परिणामी तो जंगलात जाऊन राहू लागला. कालांतराने तिथे तो आजारी पडला. त्याच काळात हळूहळू वाट फुटेल तिथे जात असताना तो देवल ऋषींच्या आश्रमात आला. देवलांची तपश्चर्या, त्यांचे तेज:पुंज व्यक्तिमत्त्व पाहून तो प्रभावित झाला. त्याने देवलांना शरण जाऊन सर्व वृत्तांत सांगून उद्धारासाठी उपाय विचारला. त्यावेळी देवलांनी त्याला हे अपरा एकादशीचे व्रत सांगितले. त्याप्रमाणे त्याने हे व्रत केले. कालांतराने या व्रताच्या प्रभावामुळे प्रतिकुलता संपून त्याला परत समाजाने स्वीकारले. पुढे तो सुखी जीवन जगू लागला आणि विष्णुलोकी गेला. (Social News)
=========
हे देखील वाचा : Temple : नरेंद्र मोदींनी भेट दिलेल्या करणी माता मंदिराची वैशिष्ट्ये
=========
कथा २
प्राचीन काळी महीध्वज नावाचा राजा पृथ्वीवर राज्य करत होता. अतिशय चारित्र्यसंपन्न अशा या राजाला त्याच्या वज्रध्वज नावाच्या अत्यंत दुष्ट अशा धाकट्या भावाने ठार मारले. नंतर त्याचे प्रेत एक पिंपळाच्या वृक्षाखाली पुरले. पिशाच बनलेला महिध्वज लोकांना फार त्रास देऊ लागला. एकदा धौम्य ऋषी योगायोगाने पिंपळाच्या झाडाखाली ध्यानाला बसले. त्यावेळी त्यांनी राजाचे पिशाच पाहिले. दयाळूवृत्तीने धौम्य ऋषींनी त्या पिशाचाला सद्गती मिळावी म्हणून त्याच्यासाठी स्वत: अपरा एकादशीचे व्रत केले. त्यामुळे राजा महिध्वजाला सद्गती मिळाली. (Marathi Trending News)